1. बातम्या

अवकाळी पावसाचा शेतकरी वर्गाला बसला जोरदार फटका, जोडव्यवसाय सुद्धा संकटात

गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम तसेच फळबागा याचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग चांगल्याच अडचणीत सापडला आहे.गेल्या 2 दिवसात राज्यात प्रत्येक ठिकाणी पाऊस पडत आहे. पावसाबरोबर ढगाळ वातावरणामुळे आणि धुक्यांमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच कांद्याची, लागण आणि रोपे पाण्यामुळे नासुन गेली आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
rainfall

rainfall

गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम तसेच फळबागा याचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग चांगल्याच अडचणीत सापडला आहे.गेल्या 2 दिवसात राज्यात प्रत्येक ठिकाणी पाऊस पडत आहे. पावसाबरोबर ढगाळ वातावरणामुळे  आणि धुक्यांमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच कांद्याची, लागण आणि रोपे पाण्यामुळे नासुन गेली आहेत.

राज्यात प्रत्येक ठिकाणी पाऊस पडत आहे:

खरीप हंगामापासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाला चांगलेच  अडचणीत  आणले आहे. अवकाळी  पावसाने हाताशी आलेलं पीक राणातच  सडून  जात  असल्याचे शेतकरी वर्गाला खूप दुःख झाले आहे.बऱ्याच शेतकरी वर्गाने उन्हाळी कांद्याची लागण केली होती परंतु अवकाळी पावसाने कांदा लागणीच नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आणि फलबागांवर वेगवेगळ्या रोगराई पसरलेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

सातारा मध्ये स्ट्रॉबेरी चे नुकसान:-

ऐन हंगामाच्या वेळी अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोना आणि अवकाळी पावसामुळे आधीच नुकसान झाले होते आणि त्यात ऐन पीक काढणीच्या वेळी ही नुकसानीची भर पडल्यामुळे शेतकरी नाराज झाला आहे.


द्राक्ष बागांचे नुकसान:-

ऐन तोडणीच्या सुरवातीला अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या घडात पाणी साचल्यामुळे द्राक्ष खराब झालेली आहेत तसेच द्राक्षे चे उत्पन्न नुकसनामुळे मोठ्या प्रमाणात घटले आहे. बागांमध्ये घातलेला पैसा सुध्दा निघत नसल्याने तसेच अपार केलेले कष्ट वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे.

अवकाळी पावसाचा, खराब वातावरणाचा आणि गारठ्याचा परिणाम फक्त पिकांवर आणि फळबागांवर च झालेला नाही तर याचा परिणाम शेतकरी वर्गाच्या जोडव्यवसायावर  सुद्धा  झाला आहे.खराब वातावरण आणि गारठ्यामुळे शेळ्या, मेंढ्या आणि करडे यांच्या मृत्यू चे प्रमाण वाढले आहेत तसेच  जनावरांना  वेगवेगळ्या रोगांची  लागण होत आहे. त्यामुळं  जोडव्यवसाय करणाऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्या सोबतच या वातावरनाचा परिणाम दुग्धव्यवसाय यावर सुद्धा झाला आहे.  वातावरणामुळे दूध उत्पादनात सुद्धा घट झालेली आपल्याला दिसून येते.

English Summary: Untimely rains hit on farming crops farmers in big trouble Published on: 03 December 2021, 10:20 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters