1. बातम्या

हळद 15 हजार पार, आवक झाली कमी..

सध्या देशातील महत्वाच्या बाजारांमधील हळदीची आवक कमी आहे. त्यातच मागणी चांगली असल्याचा आधार बाजाराला मिळत आहे. देशात यंदा हळदीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे दर तेजीत राहतील.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Turmeric (image google)

Turmeric (image google)

सध्या देशातील महत्वाच्या बाजारांमधील हळदीची आवक कमी आहे. त्यातच मागणी चांगली असल्याचा आधार बाजाराला मिळत आहे. देशात यंदा हळदीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे दर तेजीत राहतील.

बाजारातील आवकही सरासरीपेक्षा ५५ टक्क्यांनी कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर स्टाॅकमधील मालही कमी झाला. त्यामुळे हळदीच्या तेजीला आधार मिळत आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

दराचा विचार करता सर्वाधिक भाव १५ हजार रुपयांचा होता. पण हा भाव मुंबई बाजारात एका लाॅटला मिळाला.  सांगली बाजारातही याचदरम्यान कमाल भावपातळी पाहायला मिळाली.

विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा गोठ्यात तडफडून मृत्यू झाला..

हळदीचे ऑगस्टचे वायदे आज १२ हजार १५० रुपयांवर होते. तर ऑक्टोबरचे वायदे १२ हजार ७९२ हजार रुपये प्रतिक्विंटलवर होते. डिसेंबरचे वायदे १२ हजार ८२६ रुपयांवर होते.

मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप, शेडनेट यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

हळदीच्या दराने वायद्यांमध्ये १२ हजारांचा टप्पा पार केल्यानंतर बाजार समित्यांमध्येही १० हजारांची पातळी पार केली. हळदीला मागणी चांगली असून पुरवठा मात्र कमी आहे.

जनावरांचा संतुलित आहार, जाणून घ्या ते बनवण्याची संपूर्ण पद्धत आणि फायदे
'सरकारचा एक दिवस बळीराजासाठी, बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी'
ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारी कर्ज कसे घ्यायचे? सर्वकाही जाणून घ्या..

English Summary: Turmeric crossed 15,000, inflow decreased.. Published on: 20 July 2023, 09:29 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters