1. बातम्या

शासकीय कामासाठी आवश्यक असलेल्या आधार कार्डाचे तीन प्रकार

अत्यंत महत्वाच्या शासकीय कामांसाठी आणि कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ओळखीचा आणि रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्डवरील क्रमांकाशिवाय क्यूआर कोडची सुविधामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होते. आधार कार्डचे तीन प्रकार आहेत. ते कोणते हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
आधार कार्डचे तीन प्रकार

आधार कार्डचे तीन प्रकार

अत्यंत महत्वाच्या शासकीय कामांसाठी आणि कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ओळखीचा आणि रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्डवरील क्रमांकाशिवाय क्यूआर कोडची सुविधामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होते.

आधार कार्डचे तीन प्रकार आहेत. ते कोणते हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. आपल्याकडे असलेल्या आधार कार्ड कोणत्या प्रकाराचे आहे हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. याविषयीची माहिती युआयडी आईन आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे माहिती दिली. चला तर याने खात्याबद्दल माहिती घेऊ.

 आधार कार्डचे प्रकार

      साधे आधारकार्ड

 आधार कार्डचे सगळ्यात बेसिक वर्जन आहे. या प्रकारामध्ये तुम्ही आधार कार्ड बनवाल आणि ते आधार कार्ड पोस्टद्वारे आपल्या घरी येते. बहुतेक लोकांकडे अशी आधार कार्ड आहेत. आणि तसे पाहिले तर सुरुवातीपासूनच आधार कार्ड बनवले गेले आहेत. या प्रकारांमध्ये आधार कार्ड प्लास्टिक कॉटेड कागदावर प्रिंट केलेले असते. सर्वसाधारण कागदाप्रमाणेच ते आपल्या घरी येते.

हेही वाचा  : आधार कार्डला लिंक करा तुमचा मोबाईल नंबर; कोरोनाचे लसीकरणासाठी आवश्यक आहे आधार

ई  -आधार कार्ड

 हा एक ऑनलाईन आधार कार्डचा प्रकार आहे. म्हणजे या प्रकारामध्ये आधार कार्ड मुद्रित केली जात नाही. या प्रकारामध्ये आधार कार्ड फोन किंवा संगणकात जतन केलेल्या असते. आपल्या साध्या आधार कार्डसारखे हे आधार कार्ड दिसते. तुम्ही आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ई आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर, नाव नोंदणी क्रमांकवर टाकावा लागतो. तसेच या प्रकाराची आधार कार्ड उघडण्यासाठी एक पासवर्डदेखील आवश्यक असतो.

  

पीव्हीसी आधार कार्ड

 आधार कार्ड मध्ये पी व्हीसी कार्ड मटेरियल चा देखील समावेश आहे. हे कार्ड अगदी सामान्य सामान्य आधार कार्ड सारखेच असते. परंतु ते सिपर पेपर वर प्रिंट केलेले असते. हे आधार कार्ड एटीएम कार्डचा आकाराचे असून हे कार्ड प्लास्टिक मटेरियल मुळे ते कार्ड खराब होत नाही. तसेच पावसात भिजून फाटण्याची शक्यता नसते. या कार्डसाठी तुम्हाला ५० रुपये फी भरावी लागते.

हेही वाचा : आधार कार्डशिवाय मिळेल एलपीजी सिलिंडरवरील अनुदान; पण करा 'हे' काम

  या तीनही प्रकारांपैकी कोणते कार्ड वैध आहे?

 युआयडीएआय या तीन प्रकारच्या आधार कार्ड संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हे तीन ही कार्ड तितकीच वैध आहेत. युआयडीएआय आपल्या ट्विटरवर लिहिले आहे की, सर्व प्रकारच्या आधार, ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा म्हणून तितकेच व्हॅलिड आहेत. देशातील नागरिक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही प्रकारचा वापर करू शकता. त्यामुळे हे स्पष्ट होते की तिने प्रकारापैकी कोणत्याही प्रकारच्या आधार कार्ड आपण वापरू शकतो.

English Summary: Three types of Aadhaar cards required for government work Published on: 23 January 2021, 05:14 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters