Millionaire Farmers of India Award 2023 Sponsored by Mahindra Tractors : देशातील शेतकऱ्यांना एक वेगळी ओळख देण्यासाठी अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरणने सुरू केलेला 'मिलिनिअर फार्मर्स ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 स्पॅांन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टर्स' कार्यक्रम 6,7 आणि 8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या अतुलणीय योगदानाची ओळख करून देण्यासाठी आणि कृषी समुदायाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची कबुली देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या तीन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील श्रीमंत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात 40 हून अधिक कंपन्या सहभागी आहेत. या सर्व कंपन्यांनी त्यांचे स्टॉलही लावले होते. तसेच आज (दि.8) रोजी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
आज (दि.८) केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला उपस्थित होते. यावेळी भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी राजाराम त्रिपाठी (छत्तीसगड) आणि रत्नम्मा गुंडमंथा (कर्नाटक) यांना केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील सर्व श्रीमंत शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर या शेतकऱ्यांना कृषी जागरण आणि महिंद्रा ट्रॅक्टरकडून ब्राझील दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्याठिकाणी या शेतकऱ्यांना शेतीतील संपूर्ण नवनवीन मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आचार्य देवव्रत-गुजरातचे राज्यपाल, नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, परषोत्तम रूपाला- मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास मंत्री, पी.सथसिवम - भारताचे सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल, प्रताप सारंगी- लोकसभा सदस्य ओडीशा, महेंद्रसिंग सोळंकी - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती, पोचा ब्रम्हानंदा - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती - आंध्रप्रदेश, शंकर लालवानी - लोकसभा सदस्य -इंदोर हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात देशभरातील ७५० कृषी विज्ञान केंद्र (KVK) सहभागी झाले होते. त्याचबरोबर हजारो शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यातील ५० पेक्षा जास्त बिलिनीयर शेतकरी, ६०० पेक्षा जास्त मिलिनीयर शेतकरी, ७८७ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमेध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कृषी जागरणच्या मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवाॅर्ड 2023 प्रायोजक महिंद्रा ट्रॅक्टर्स कार्यक्रमाचे उद्घाटन दि.6 डिसेंबर रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यासोबतच त्यांनी 'MFOI' ने सुरू केलेल्या किसान भारत यात्रेला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार किसान भारत यात्रेला सुरुवात होणार आहे.
MFOI किसान भारत यात्रेचे उद्दिष्ट -
MFOI किसान भारत यात्रेचे उद्दिष्ट डिसेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशातील जास्तीत जास्त अंतर पार करून, १ लाख पेक्षा जास्त शेतकर्यांपर्यंत पोहचणे हे आहे. तसेच ४ हजार पेक्षा जास्त ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ही यात्रा २६ हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करणार आहे.या यात्रेचे प्राथमिक उद्दिष्ट शेतकर्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी वाढवून त्यांना सक्षम करणे आहे. त्याचबरोबर कृषी समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या वचनबद्धतेला नवीन स्वरूप देणे हे आहे.
"प्रत्येक शेतकरी करोडपती होण्याची आकांक्षा बाळगतो आणि ज्यांनी ही कामगिरी केली त्यांचा सन्मान केला पाहिजे. लोकांचा शेतकरी आणि शेतीबद्दलचा विचार बदलणे हा त्यांचा उद्देश आहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडीलही शेतकरी होते आणि त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत शेतीही केली होती.जेव्हा जेव्हा त्यांनी शेती सोडून इतर क्षेत्रांकडे पाहिले तेव्हा कोणी ना कोणी रोल मॉडेल म्हणून सादर केले. पण, कृषी क्षेत्रात ना कुठला रोल मॉडेल आहे ना तो मोठ्या प्रमाणावर मांडला जात आहे. हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मी वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नाला ‘MFOI पुरस्कार’ असे नाव देण्यात आले आहे. कृषी जागरण भविष्यात शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक पुरस्कार शो आयोजित करेल. तसेच आगामी काळात शेतकऱ्यांनी शेतीत बदल करणे गरजेचे आहे. शेतीतील उत्पादन खर्च कमी करुन त्यांचे उत्पन्न अधिक वाढले पाहिजे, अशी आशा मला आहे.
एम.सी.डोमॅनिक, कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक
“गेल्या काही दशकांमध्ये कृषी क्षेत्रातील महिलांची भूमिका झपाट्याने वाढली आहे. महिला शेतकऱ्यांनी या क्षेत्रात प्रत्येक पावलावर आपले योगदान दिले आहे, तरीही महिला या क्षेत्रात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. मला आशा आहे की, 'द मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-2023' मध्ये त्या महिला शेतकऱ्यांना पुरस्कृत केल्याने ज्यांनी कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनून चांगली कामगिरी केली आहे, महिला शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता बदलेल. तसेच हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात येत आहे.”
शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक – कृषी जागरण
Share your comments