1. बातम्या

आघारकर संशोधन संस्थेच्या चार सोयाबीन जातींना मान्यता

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांची गरज ओळखून आघारकर संशोधन संस्थेने यंत्राद्वारे काढण्यास योग्य, बी द रोबो किड्स प्रतिरोध आणि पोषण दृष्टीने महत्त्व असणाऱ्या तसेच कमी कालावधीत येणाऱ्या चार नवीन जाती प्रसारित केल्या.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
चार सोयाबीन जातींची होणार लागवड

चार सोयाबीन जातींची होणार लागवड

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांची गरज ओळखून आघारकर संशोधन संस्थेने यंत्राद्वारे काढण्यास योग्य, बी द रोबो किड्स प्रतिरोध आणि पोषण दृष्टीने महत्त्व असणाऱ्या तसेच कमी कालावधीत येणाऱ्या चार नवीन जाती प्रसारित केल्या. या जातींना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या कृषी पिकांची मानके,  अधिसूचना आणि वाणांचा प्रसार या केंद्रीय उपसमितीने शेतकऱ्यांच्या शेतावर लागवडीसाठी अधिसूचित करून प्रसारित करण्यास मान्यता दिली आहे. याचे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे.  या जातींचे बियाणे खरीप 2022 मध्ये उपलब्ध होतील.  या जातीविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

एमएसीएस 1520

  • या जातीची शिफारस प्रामुख्याने भारतातील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील मराठवाडा,  विदर्भात करण्यात आली आहे.

  • या जातीचे सोयाबीन कमीत कमी 100 दिवसांत काढणीस तयार होते.

  • या जातीच्या झाडांची उंची ही सरासरी 56 सेंटीमीटर असून त्या झाडास तीन ते चार फादया  असतात.

  • या जातीच्या सोयाबीन झाडाच्या पानांचा रंग गर्द हिरवा,  एका झाडास जवळजवळ 48 शेंगा असतात. शेंगांवर लव असते व प्रत्यक्ष शेंगांमध्ये तीन दाणे असतात.

  • दाण्याचा आकार हा मध्यम गोल आकार रंग पिवळा असतो.

  • या जातीच्या शेंगा चे वैशिष्ट्य म्हणजे काढणीस जरी उशीर झाला तरी या शेंगा फुटत नाहीत.

  • चार्कॉल रोट,  चक्री भुंगा, पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणारी आळी, तुडतुडे इत्यादी कडीना हैवान प्रतिकारक्षम आहे.

  • या वाणाचे प्रति हेक्‍टरी 21 ते 29 क्विंटल उत्पादन येते.

    हेही वाचा : जमिनीच्या पोतनुसार निवडा तुरीचे वाण, वाचा वाणांची माहिती

 एम ए सी एस 1407

 

  • या वाणाची शिफारस प्रामुख्याने भारतातील आसाम, पश्चिम बंगाल,छत्तीसगड तसेच पूर्वी राज्यांमध्ये लागवडीसाठी केली आहे.

  • या वाणाच्या झाडाची उंची 58 सेंटीमीटर पर्यंत असून एकशे चार दिवसात काढणीस तयार होते.

  • या जातीच्या शेंगा मधील तीन दाणे  असून ती पिवळ्या रंगाचे व मध्यम गोलाकार असतात.

  • पानांचा आकार त्रिकोणी लांबुळका असून शेंगांवर लव असते व पक्वतेच्या वेळी रंग तपकिरी असतो.

  • शेंगा जमिनीपासून 7 सेंटीमीटर उंची पासून लग्ना सुरुवात होते. हे वान यंत्राद्वारे कापणी करता येते. शेंगा फुटत नाहीत.

  • चक्री भुंगा,  पाने खाणारी व गुंडाळणारी आळी, खोडमाशी,  मावा, तुडतुडे सारखे रसशोषक किडी त्यांना प्रतिकारक्षम हे वान आहे.

  • हेक्‍टरी 20 ते 30 क्विंटल उत्पादन या वानापासून मिळते.

   एम ए सी एस 14 60

  • दक्षिण पूर्व आणि उत्तर पूर्वीय पर्वते प्रदेशासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक,  आंध्र प्रदेशआणि तामिळनाडू मध्ये 89 दिवसांमध्ये काढण्यास तयार होते.

  • या जातीच्या झाडांची उंची ही बे 40 ते 45 सेंटिमीटर असून झाडास तीन ते चार फांद्या असतात.

  • बिया गोलाकार,  मध्यम आकाराच्या आणि फिक्कट काळ्या  रंगाच्या असतात.

  • शेंगा जमिनीपासून जवळजवळ 7 सेंटीमीटर उंची  पासून लागत असल्याने यंत्राद्वारे कापणी शक्य असते.

  • खोडमाशी मावा, पाने पोखरणारी आणि गुंडाळणारी आळी त्यांना प्रतिकारक्षम वान आहे.

  • या वाणाचे हेक्टरी  22 ते 28 क्विंटल उत्पादन येते.

 

 एम एसी एस- एन आर सी 16 67

  • या जातीची शिफारस लागवडीसाठी दक्षिण भारतासाठी करण्यात आली आहे.

  • अन्नप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त असे जात आहे.

  • जवळजवळ 95 दिवसांत काढणीस तयार होते. ही जात मध्यम कालावधीत जात आहे.

  • या जातीच्या झाडास तीन ते चार फांद्या असून झाडाची उंची 56 सेंटीमीटर इतकी असते.

  • एका झाडाला सरासरी 48 शेंगा लागतात. शेंगांवर लव असते व प्रत्यक्ष शेंग  मध्ये तीन बिया असतात.बिया मध्यम गोलाकार व पिवळ्या रंगाच्या असतात.

  • पक्वतेच्या वेळी शेंगांचा रंग तपकिरी होतो व काढणीस उशीर झाल्यास फुटत नाहीत.

  • शेंगावरील करपा, बियांवरील जांभळे डाग रोगांना प्रतिकारक्षम ही जात आहे.

  • या जातीच्या झाडाचे खोड जाड व शेंगा जमिनीपासून उंचावर लागत असल्याने यंत्राद्वारे कापणी शक्य होते.

  • या जातीचे उत्पन्न प्रति हेक्टरी  20 क्विंटलपर्यंत येते..

English Summary: Recognition of four soybean varieties of Agharkar Research Institute Published on: 16 April 2021, 02:12 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters