गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणीत आल्या. कांदा पावसात भिजल्याने त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. असे असताना थोडाफार कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता. त्याला सुरुवातीला चांगला बाजारभाव देखील मिळाला, मात्र आता यामध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.
महिनाभरापूर्वी दिवासाला वाढणारे दर आता एका रात्रीतून कसे घसरतात हे (Onion Market) कांदा बाजारपेठेत बघायला मिळाले आहे. महिन्याभरापूर्वी 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेला (Onion Rate) कांदा आता थेट हजाराच्या आतमध्ये आला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये काय होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजार आवारात कांद्याच्या बाजार भावात उतरण झाली आहे. बुधावारी लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात 425 रुपयांची प्रति क्विंटल मागे घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा दराचे चित्र झपाट्याने बदलत असून अजून उन्हाळी हंगाम पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. त्यामुळे भविष्यात हे दर अजूनच खाली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या राज्यातील नाशिक, अहमदनगर व पुणे सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची आवक ही लाल कांद्याच्या बरोबरीने येत असल्याने याचा थेट परिणाम दरावर होऊ लागला आहे. दे कमी होण्याचे हे मुख्य कारण मानले जात आहे. तसेच सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे नुकसान होण्यापेक्षा शेतकरी थेट विक्रीला प्राधान्य देत आहेत.
तसेच मागणी कमी आवक जास्त याचा हा परिणाम आहे. दीड महिन्यापूर्वी आवक अधिकची असतानाही दर टिकून होते, कारण मागणीही त्याच प्रमाणात होती. शिवाय केवळ खरिपातील कांदाच शेतकऱ्यांकडे होता. आता उन्हाळी हंगमातील कांदाही दाखल होऊ लागला आहे. यामुळे दराचे गणित कोलमडले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे आता खर्चही निघणे आवघड झाले आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! शेतकऱ्याने वासराचे धुमधडाक्यात घातलं बारसं! बारशाला जमलं आख्ख गाव..
शेतकऱ्यांना दिलासा! आता दूध व्यवसाय परवडेल, दुधाच्या दरात सरसकट लिटरमागे 3 रुपयांची वाढ
होळीच्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफीची खास भेट, 34,788 शेतकऱ्यांना होणार लाभ
Share your comments