1. बातम्या

Maharashtra MFOI Update : सोलापुरात 'MFOI समृद्ध किसान उत्सव' संपन्न; शेतकऱ्यांचा सन्मानही थाटामाटात

सोलापुरात आयोजित या 'समृद्धी किसान उत्सवा'त शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या मिलेनीयर शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या शेतकऱ्यांमध्ये परमेश्वर राऊत, अमोल रणदिवे, प्रशांत भोसले, जगन्नाथ-तात्या, गणेश सावंत, बाळासाहेब भोसले, संदीप पवार, सिद्धेश्वर माने, प्रकाश, भोपालसिंग पावज, विवेक माने, अंकुश गोरे, राजाराम दत्तू, विठ्ठल, अजितदाम, प्रताप थिटे यांचा समावेश आहे. याशिवाय धानुका येथील समाधान भोसले आणि अनिल तुकाराम देशमुख या दोन शेतकऱ्यांना मिलियनेअर फार्मर ट्रॉफी आणि फार्मर किट देऊन गौरविण्यात आले.

Maharashtra MFOI Update

Maharashtra MFOI Update

MFOI Samridh Kisan Utsav 2024 : कृषी पत्रकारितेत ओळखले जाणारे कृषी जागरण गेल्या २७ वर्षांपासून सातत्याने शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करत आहे. कृषी जागरणच्या वतीने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळ कृषी जागरण देशभरात MFOI समृद्ध किसान उत्सव २०२४ चे आयोजन करत आहे. MFOI समृद्ध किसान उत्सवाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. जेणेकरून शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवू शकतील, शेतीच्या नवनवीन तंत्रांसह शेतीशी संबंधित माहिती मिळवू शकतील आणि आपल्या कल्पनाही मांडू शकतील.

याशिवाय समृद्ध किसान उत्सवादरम्यान कृषी जागरणच्या विशेष उपक्रम 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' पुरस्काराबाबतही शेतकऱ्यांना जागरूक केले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना MFOI बद्दल अधिक माहिती मिळू शकेल. इतकंच नाही तर 'समृद्ध किसान उत्सवा'दरम्यान शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या मिलेनियर शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात येत आहे. 7 मार्च रोजी सोलापूरमधील मोहोळ कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिंद्रा ट्रॅक्टर्स, धानुकासह कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्या, अनेक कृषी तज्ज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि अनेक प्रगतीशील शेतकरी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

मिलेनियर शेतकऱ्यांचा गौरव

सोलापुरात आयोजित या 'समृद्धी किसान उत्सवा'त शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या मिलेनीयर शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या शेतकऱ्यांमध्ये परमेश्वर राऊत, अमोल रणदिवे, प्रशांत भोसले, जगन्नाथ-तात्या, गणेश सावंत, बाळासाहेब भोसले, संदीप पवार, सिद्धेश्वर माने, प्रकाश, भोपालसिंग पावज, विवेक माने, अंकुश गोरे, राजाराम दत्तू, विठ्ठल, अजितदाम, प्रताप थिटे यांचा समावेश आहे. याशिवाय धानुका येथील समाधान भोसले आणि अनिल तुकाराम देशमुख या दोन शेतकऱ्यांना मिलियनेअर फार्मर ट्रॉफी आणि फार्मर किट देऊन गौरविण्यात आले.

MFOI पुरस्कारांमध्ये सामील होण्यासाठी या गोष्टी करा

शेतकऱ्यांव्यतिरिक्त, कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्या आणि इतर देखील MFOI पुरस्कार आणि MFOI समृद्ध किसान उत्सव २०२४ चा भाग असू शकतात. यासाठी कृषी जागरण आपणा सर्वांना निमंत्रित करत आहे. MFOI २०२४ किंवा समृद्ध किसान उत्सव दरम्यान स्टॉल बुक करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रायोजकत्वासाठी, तुम्ही कृषी जागरणशी संपर्क साधू शकता. त्याच वेळी, पुरस्कार शो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, हा Google फॉर्म भरा- https://forms.gle/sJdL4yWVaCpg838y6. अधिक माहितीसाठी MFOI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://millionairefarmer.in/. याशिवाय, तुम्ही दिलेल्या क्रमांकांवर देखील कॉल करू शकता - कृषी जागरण: ९७१११४१२७०. परीक्षित त्यागी : ९८९ १३३ ४४२५ | हर्ष कपूर: ९८९ १७२ ४४६६.

MFOI कार्यक्रम कुठे होणार?

'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-२०२३' च्या यशानंतर आता कृषी जागरण MFOI २०२४ चे आयोजन करणार आहे. जे १ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केले जाईल. MFOI २०२४ ची तयारी आधीच सुरू झाली आहे. कृषी जागरण देखील किसान भारत यात्रा (MFOI किसान भारत यात्रा) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना याबाबत जागरूक करत आहे. हा प्रवास देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांना MFOI बद्दल जागरूक करेल आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठ्या अवॉर्ड शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित करेल. सध्या किसान भारत यात्रा सुरू असून ही यात्रा तुमच्या शहरात, गावागावातही येऊ शकते. त्यामुळे यासंबंधित प्रत्येक माहितीसाठी कृषी जागरणच्या वेबसाइट आणि सोशल मीडियाशी कनेक्ट रहा.

English Summary: Maharashtra MFOI Update MFOI Samridh Kisan Utsav 2024 concluded in Solapur mfoi event solapur Published on: 08 March 2024, 10:15 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters