गेल्या काही वर्षात कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मोठा पूर येत आहे. यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होत आहे. पुराचे महत्वाचे कारण म्हणजे कर्नाटक राज्यात असणाऱ्या अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसतो.
परंतू यंदा हा धोका टळण्याची शक्यता आहे. यंदा अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे नद्यांची पातळी कमी होण्यास मदत होईल.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका होऊ नये यासाठी धरणातील पाणी साठ्यांचा विसर्ग होण्याची मोठी गरज असते. सध्या कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत असून धरणातून पाणी सोडले आहे.
जावं तिथं फक्त अश्रूंचा बांध फुटतोय..! नि:शब्द झालोय..!
महाराष्ट्रातील कोयना व अन्य धरणांतून होणाऱ्या विसर्गावर कर्नाटक पाटबंधारे विभाग लक्ष ठेवून असतो. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.
यामुळे कोयना आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पाण्याचा थेट परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पिकांवर होतो. यामुळे कोयना आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पाण्याचा थेट परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पिकांवर होतो.
दरम्यान, मागच्या दोन दिवसांपासून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे. धरण परिसरात होणारा पाऊस लक्षात घेता अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
कापूस दरात ३०० रुपयांची वाढ, वाढ कायम राहण्याची शक्यता..
मोत्यांची शेती करून शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या
देशात पावसाचा हाहाकार! २२ हून अधिक राज्यांमध्ये भयानक स्थिती, पुढील ३ दिवस मुसळधार..
Share your comments