1. बातम्या

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत 1631 भूमिहीनांना जमिनी

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मधील असलेल्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांचे आर्थिक प्रगती व्हावी व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा,

KJ Maharashtra
KJ Maharashtra
dadasaheb sablikaran yojna

dadasaheb sablikaran yojna

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मधील असलेल्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांचे आर्थिक प्रगती व्हावी व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा,

अशा कुटुंबांचे मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायम स्वरूपी  उत्पन्नाचे साधन मिळावे या उद्देशाने ही योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत नाशिक विभागातील जवळजवळ  1631 भूमिहीन शेतमजुरांना जमिनी मिळाल्या आहेत. यामध्ये नाशिक विभागातील जळगाव व धुळे जिल्हा आघाडीवर आहे.

 या योजनेअंतर्गत जमीन वाटपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. या समितीत समाजकल्याण संचालक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भूमी अभिलेख अधिकारी, सहनिबंधक, नोंदणी शुल्क व मूल्यांकन सहाय्यक संचालक इत्यादी सदस्य असतात. या योजनेंतर्गत गावाच्या परिसरात असलेल्या उपलब्ध नवीन परिसरात राहणारे भूमिहीन शेतमजूर यांच्या नावाने चिठ्या टाकून संबंधित समिती लाभार्थ्यांची निवड करते.

या योजनेअंतर्गत लाभार्थींना चार एकर कोरडवाहू  किंवा दोन एकर बागायती जमीन दिली जाते. नाशिक विभागाने खरेदी केलेल्या सर्व जमीन लाभार्थींना देण्यात आले आहेत. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना शेतजमीन असलेल्या संबंधित  भागात पंधरा वर्ष वास्तव्याची अट आहे. भूमिहीन शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांची नावे दारिद्र रेषेखालील आहे. त्यांना दारिद्र्यरेषेखाली चे कार्ड मिळवणे संयुक्तिक ठरणार आहे. त्यांची मिळकत दारिद्र्यरेषेखाली असली पाहिजे.

English Summary: karmveer dadasaheb gaikwad sablikaran yojna give land under povertiline labour Published on: 26 July 2021, 11:36 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters