गेल्या काही दिवसांपासून शिरूर येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडून सुमारे २५ कोटी रुपये हे कामगारांचे थकीत देणे आहे. यामुळे आता कामगार आक्रमक झाले आहेत. आता हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला आहे. त्यांनी याबाबत आता सूचना दिल्या आहेत.
आता कामगारांचा एक पगार देण्याबरोबरच भविष्यनिर्वाह निधीची रक्कम तत्काळ द्यावी. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याबाबत साखर आयुक्तांनी कारखाना व्यवस्थापन व कामगारांचा सामंजस्य करार करून त्यानुसार याविषयी पूर्तता करण्याच्या सूचना अजित पवार यांनी साखर आयुक्तांना दिल्या. यामुळे आता तरी हा विषय मिटणार का हे समजणार आहे.
बैठक साखर संकुल याठिकाणी झाली. या बैठकीस पवार यांच्यासह राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, भविष्य निर्वाह निधी आयुक्त, कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, आमदार अशोक पवार व संचालक मंडळ उपस्थित होते. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता सातबारा उताऱ्यावर आता महिलेचेही नाव, लक्ष्मी योजनेची झाली सुरुवात...
अजित पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी या कारखान्याचे काही सभासद आणि कामगार मला भेटले होते. तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही भेटले. त्या कारखान्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असून, कामगारांच्या पगारापोटीचे २५ कोटी थकले आहेत.
मोठी बातमी! शेततळे गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश..
तेथे संप चालू असून, कारखाना कार्यालय बंद आहे. कारखान्यातून बाहेरचा माल येत नाही व आतील माल बाहेर जात नाही. सध्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यामुळे प्रश्न मिटणार आहे.
आता सातबारा उताऱ्यावर आता महिलेचेही नाव, लक्ष्मी योजनेची झाली सुरुवात...
गोकुळकडून जनावरांच्या लम्पी आजाराकडे, गोकुळचे चेअरमन, संचालकांना दौरा सोडून जाण्याची वेळ..
Share your comments