महागाईने सर्वसामान्यांचे जीवन जगण्यास त्रासदायक करून टाकले आहे. प्रत्येक दैनंदिन गरजेच्या बऱ्याचशा गोष्टी महाग झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे.
यामध्ये पेट्रोल, डिझेल तसेच गॅस सिलेंडर, खाद्यतेल तर किती दिवसापासून महागाईच्या शिखरावर होते. त्याच्यामध्ये आत्ता थोडाफार दिलासा मिळाला आहे.
तोही हवा तेवढा नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार असून पीठ, दही यासारखे पॅकबंद खाद्यपदार्थ येत्या 18 जुलैपासून महागणार असल्याची घोषणा
जीएसटी च्या 47 व्या परिषदेच्या नंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
नक्की वाचा:सोन्यासारखे पीक पिकवण्यासाठी शेतकऱ्यांवर सोनं गहाण ठेवण्याची आली वेळ
यामध्ये ताक, लस्सी, पनीर, पॅकेज केलेले दही, काही तृणधान्य, पापड, मध, अन्नधान्य, मांस आणि मासे( फ्रोजन वगळता) पफ केलेला तांदूळ आणि गुळ यासारखी कृषी उत्पादने प्री-पॅकेज्ड लेबलवर ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून 18 जुलैपासून या वस्तू महागणार आहेत.
याचा अर्थ त्यांच्या वरील कर वाढविण्यात आला असून सध्या ब्रांडेड आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थावरपाच टक्के जीएसटीहा केंद्र सरकारकडून आकारला जातो.
नक्की वाचा:"जगामध्ये अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बाजरी मोलाचे योगदान देऊ शकते"
राज्यांच्या महसूली तुटीबाबत निर्णय नाही
एक जुलै 2017 रोजी जीएसटी लागू केल्या गेला तेव्हा राज्यांना जुने 2022 पर्यंत महसुली तुटीचे आश्वासन देण्यात आले होते. निर्माण झालेली ही महसुली तूट जीएसटी लागू झाल्यामुळे होती.
परंतु राज्यांना याबाबत कुठल्याही प्रकारची भरपाई देण्याबाबत जीएसटी परिषदेच्या बैठकीत कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेण्यात आलेला नसून त्याची मुदत देखील 30 जूनला संपत आहे.
Share your comments