1. बातम्या

कौतुकास्पद! कामाच्या थोड्याशा बदलाने घडवून आणला सकारात्मक परिणाम, वाचा माहिती

शासकीय काम असो की कुठलेही काम यामध्ये वेळ हा जातो. एकाच पद्धतीने जर काम करत राहिले तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. परंतु कामांमध्ये थोडेसे स्मार्ट वर्क म्हणजेच थोडेसे डोके लावून वेगळ्या पद्धतीने काम केले तर त्याचे अनपेक्षित परिणाम बघायला मिळतात. कामाच्या पद्धतीतील बदल हा बऱ्याचदा खूप सकारात्मक परिणाम देऊन जातात. आपल्याला माहित आहेच कि पीएम किसान योजनेसाठी केवायसी ही बंधनकारक करण्यात आले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
kyc for pm kisan

kyc for pm kisan

 शासकीय काम असो की कुठलेही काम यामध्ये वेळ हा जातो. एकाच पद्धतीने जर काम करत राहिले तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. परंतु कामांमध्ये थोडेसे स्मार्ट वर्क म्हणजेच थोडेसे डोके लावून वेगळ्या पद्धतीने काम केले तर त्याचे अनपेक्षित परिणाम बघायला मिळतात. कामाच्या पद्धतीतील बदल हा बऱ्याचदा खूप सकारात्मक परिणाम देऊन जातात. आपल्याला माहित आहेच कि पीएम किसान योजनेसाठी केवायसी ही बंधनकारक करण्यात आले आहे.

नक्की वाचा:शिंदे सरकार जनतेला देणार झटका! वीज दरात वाढ होण्याची शक्यता

 परंतु यामध्ये शेतकऱ्यांची  टक्केवारी पाहिली तर ती खूपच कमी होती. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन दिवस विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरांचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला की अवघ्या 48 तासांच्या काळातच वर्धा जिल्ह्यातील तब्बल पंधरा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची केवायसी पूर्ण झाले.  यामुळे केवायसीचा टक्का तर वाढलाच परंतु शेतकऱ्यांचे होणारे नुकसान देखील टळले.

नक्की वाचा:कृषी जागरणचे २६ व्या वर्षात पदार्पण, देशातील शेतकऱ्यांचे हित जोपासणारा पहिला मीडिया हाऊस..

7 सप्टेंबर ही केवायसीची अंतिम मुदत

 पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कायम मिळण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठीची अंतिम मुदत आता सात सप्टेंबर असून या मुदतीत शेतकऱ्यांनी ई-सेवा केंद्रात जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईल वरून केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी जर वेळीच केवायसी केली नाही तर शासनाकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यपासून मुकावे लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेस केवायसी करणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:कोट्यवधी रुपये दिले तरी जमिनी देणार नाही! पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध

English Summary: in vardha distric 15 thousand farmer complete kyc in 48 hours by special camp Published on: 06 September 2022, 10:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters