1. बातम्या

बैलगाडा शर्यतीनंतर भीषण अपघात; १ ठार तर चार जखमी

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या लोणी परिसरात पाबळ-लोणी रस्त्यावर बैलगाडा घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला. काल संध्याकाळी पिकअप टेम्पो या वाहनाचा मागील टायर फुटल्याने टेम्पो पलटी होऊन हि दुर्घटना घडली. अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या लोणी परिसरात पाबळ-लोणी रस्त्यावर बैलगाडा घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला. काल संध्याकाळी पिकअप टेम्पो या वाहनाचा मागील टायर फुटल्याने टेम्पो पलटी होऊन हि दुर्घटना घडली. अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शिरापूर ता. पारनेर जि.अहमदनगर येथील दत्ता अशोक चाटे हे त्याच्या पिकअप टेम्पो मधून दोन बैल, एक घोडी व एकूण १३ जणांना घेऊन पुणे मावळ येथे बैलगाडा शर्यतीसाठी गेले होते. शर्यत पार पडल्यावर राजगुरुनगर, पाबळ मार्गे त्यांच्या गावी शिरापूर येथे जात असताना लोणी गावाच्या हद्दीत हाँटेल परंपरा समोर बैलगाडा असलेल्या गाडीचा टायर फुटल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. गाडी चालक अपघाताची खबर न देता तसेच जखमीची विचारपूस न करता गाडीचा टायर बदलून टेम्पो घेवून पळून गेला. अपघातात गाडीच्या हुडावर आणि  केबिनवर बसलेले गाडा शौकीन खाली पडले. यामध्ये आकाश राजू लोणकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर रविंद्र काशिनाथ माळी, रोशन सुभाष माळी, लखन भानुदास माळी हे तिघे जखमी झाले आहेत. 

अपघातग्रस्तांवर मंचर येथे उपचार सुरु असून गंभीर जखमी असलेल्या तरुणाला पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. गाडी चालक पळून गेल्याने जखमींना स्थानिक ग्रामस्थ उपचारासाठी मंचर येथे घेऊन गेले. 

English Summary: Horrific accident after a bullock cart race; 1 killed and 4 injured Published on: 14 February 2022, 02:23 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters