1. बातम्या

मराठवाड्यात ग्रेडर अभावी तूर, हरभरा, खरेदी मंद

लॉकडाऊनच्या काळात शेतीची कामे आणि शेती संबंधित असलेली कामे सुरळीत सुरू राहतील , असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. परंतु काही प्रमाणातच शेतीची कामे होताना दिसत आहेत. शेती संबंधिती बाजारपेठांवर लॉकडाऊनचा परिणाम जाणवत आहे. मराठावाड्यातील पाच जिल्ह्यात अशीच परिस्थिीती असून येथे ग्रेडर नसल्याने काही ठिकाणी खरेदी थांबली आहे.

KJ Staff
KJ Staff


लॉकडाऊनच्या काळात शेतीची कामे आणि शेती संबंधित असलेली कामे सुरळीत सुरू राहातील,  असं शासनाकडून सांगण्यात आले आहे. परंतु काही प्रमाणातच शेतीची कामे होताना दिसत आहे. शेती संबंधिती बाजारपेठांवर लॉकडाऊनचा परिणाम जाणवत आहे. मराठावाड्यातील पाच जिल्ह्यात अशीच परिस्थिीती असून येथे  ग्रेडर नसल्याने काही ठिकाणी खरेदी थांबली आहे. औरंगाबाद,. जालना. बीड, उस्मानाबाद लातूर या पाच जिल्ह्यातील तूर व हरभऱ्याच्या हमी दरातील खरेदीची गती मंदच आहे, यासंबंधीचे वृत्त ऍग्रोवनने दिले आहे.

काही ठिकाणी शेतकऱ्यांना हरभरा खरेदीसाठी अद्यावत पीक पेऱ्याच्या सातबाराची अडचण येत आहे. एफसीायच्या केंद्राना काही जिल्ह्यात ग्रेडर अभावी ब्रेक लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नाफेडतर्फे  तूर व हरभरा खरेदीची सहा केंद्रे मंजूर आहेत, या केंद्रावर १३७८ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली.  या सर्व शेतकऱ्यांना एसएमस पाठविण्यात आले. त्यापैकी ८७७  शेतकऱ्यांकडून ४ हजार ८० क्किंटल ५० किलो तुरीची खरेदी झाली. दुसरीकडे सहा केंद्रांपैकी गंगापूर, औरंगाबाद व खुलताबाद या तीनच केंद्रांवर ३३० शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या खरेदीसाठी नोंदणी केली. त्यापैकी खुलताबाद केंद्रावरील ४७ शेतकऱ्यांना एसएमएस करण्यात आले. त्यापैकी २१ शेतकऱ्यांकडून १३५ क्किंटल तुरीची खेरदी करण्यात आली.   जालन्यात सहा केंद्रांवर तुरीसाठी १२५ एप्रिलपर्यंत ७ हजार ३२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ६  हजार ८०२  शेतकऱ्यांना  एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी २ हजार ८२३  शेतकऱ्यांकडून २४ हजार ८८६ क्किंटल १५ किलो तुरीची झाली. १३ एप्रिलपर्यंतचे खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे दिले गेले.

हरभऱ्यासाठी ४ हजार  ५५२ शेतकऱ्यां नी नोंदणी केली. त्यापैकी ७४० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले. त्यापैकी ३४८ शेतकऱ्यांकडून जालना येथील केंद्रावरुन ८९९ क्किंटल ९० किलो, तर भोकरदन येथील केंद्रावरून २ हजार ८२२ क्किंटल ५० किलो हरभऱ्याची खरेदी झाली.  बीड जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदीची एफसीआयची १२ केंद्रे आहेत. लॉकडाऊन पासून जिल्ह्यातील तूर हरभरा खरेदीची  प्रक्रिया एक - दोन अपवाज वगळता ठप्प झाली.   लॉकडाऊनपुर्वी जिल्ह्यात १५ज क्किंटल तुरीची खरेदी  झाली. तुरीसाठी जवळपास १८२०० तर हरभऱ्साठी  १५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली.   तर काही केंद्राना ग्रेडर नसल्याने या केंद्रावरील खेरदी थांबलेली आहे. येत्या दोन दिवसात ही खरेदी पूर्ववत होण्याची असल्याची शक्यता आहे. 

English Summary: gram, tur pulses buying slow in marathwada's district market Published on: 23 April 2020, 01:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters