1. बातम्या

धोरणांमध्ये शेतीला महत्व द्या - आरबीआय गर्व्हनर

कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या अर्थव्यवस्थेला नवचेतना देण्यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकीसह अतिरिक्त कृषी उत्पादनाच्या विपणावर भर देण्याची आवश्यकता आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या अर्थव्यवस्थेला नवचेतना देण्यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकीसह अतिरिक्त कृषी उत्पादनाच्या विपणावर भर देण्याची आवश्यकता आहे. यासह धोरणांमध्ये  शेतीला महत्व देऊन ग्राहकांना योग्य दरात शेतमाल मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ झाली पाहिजे, असे मत आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले. भारतीय उद्योग संघाच्या (सीआयआय) सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशाला जोडण्यासाठी वेगवान रेल्वेतून पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. २०२३ पर्यंत देशाला पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी ४.५ ट्रिलियन डॉलरची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांना जोमात सुरुवात केल्यास अर्थव्यवस्थेला पुन्हा वैभव प्राप्त होईल. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी खासगी आणि सार्वजनिक हे मुख्य स्त्रोत आहेत. उत्तर - दक्षिण आणि पूर्व - पश्चिम वेगवान रेल्वे कॉरिडॉरसह द्रुतगती महामार्गपासून या कामाला सुरुवात करता येईल, हे दोन्ही प्रकल्प अर्थव्यवस्थेच्या आणि त्या भागातील इतर क्षेत्रातील उत्पादनपूर्व आणि उत्पादनानंतर संधी निर्माण करतील. तसेच व्यापारात कृषी क्षेत्राला महत्त्व दिल्यास शेतीत वेगवान बदल होतील आणि शेतमाल उत्पादनाचा पुरवठाही शाश्वतरित्या वाढेल. ग्राहकांना योग्य दरात शेतमाल मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ झाली पाहिजे, अशीच धोरणे राबवावी लागतील, असे दास म्हणाले.

English Summary: Give importance to agriculture in policies - RBI Governor Published on: 30 July 2020, 01:00 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters