1. बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे अंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन!

आंतरमहाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत पदव्युत्तर शिक्षण संस्थेचा दबदबा

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे अंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे अंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन!

आंतरमहाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत पदव्युत्तर शिक्षण संस्थेचा दबदबा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक कलागुणांना वाव देण्यासाठी विदर्भातील सर्वच शासकीय, अशासकीय, खाजगी कृषी महाविद्यालयांच्या सहभागातून आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन विविध

महाविद्यालयांच्या प्रक्षेत्रावर करण्यात येत आहे. विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, खो-खो कबड्डी, बुद्धिबळ Cricket, Hollyball, Football, Table Tennis, Badminton, Kho-Kho Kabaddi, Chessआदी क्रीडा प्रकारांचा समावेश असून अकोला मुख्यालयी बॅडमिंटन आणि बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन संपन्न होत आहे. दोन दिवसीय

अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा 2022 च्या आयोजन कृषी महाविद्यालय येथे करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉ. विलास भाले यांचे शुभ हस्ते बुद्धिबळ क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, सहयोगि अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला डॉ. प्रकाश

नागरे, बुद्धिबळ स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.संजय भोयर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, प्रा. डॉ. सुधीर दलाल,प्रा. डॉ. मोहन तोटावार, आयोजन समितीचे सर्व सदस्यांची उपस्थिती होती.सदर स्पर्धेत मुलांचे 32 संघ व मुलींचे 21 संघांनी भाग घेतला एकूण 212 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली स्पर्धा

चार फेऱ्यांमध्ये पार पडली मुलांमध्ये पदव्युत्तर शिक्षण संस्था अकोलाची चमू विजेता तर कृषी महाविद्यालय मुल मारोडा चमू उपविजेता ठरली. मुलींमध्ये कृषी महाविद्यालय अकोला संघ विजेता तर पदव्युत्तर शिक्षण संस्था अकोला संघानी उपविजेता वर समाधान मानले.स्पर्धा संपन्न झाल्या नंतर बक्षीस वितरण समारंभ डॉ.

पि.के .नागरे, सहयोगि अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला यांचे अध्यक्षतेत संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. डॉ. मोहन तोटावार, डॉ.अतुल वराडे, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. योगिता सानप, डॉ. प्रविणा सातपुते व सर्व चमुने अथक प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन डॉ.अतुल वराडे तर आभार डॉ. योगिता सानप यांनी मानले.

English Summary: Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola Organizes Inter College Sports Tournament 2022! Published on: 07 August 2022, 03:36 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters