1. बातम्या

तुम्हाला गृह विमा पॉलिसीविषयी माहिती आहे का ?

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. तसा प्रत्येकजण प्रयत्नही करताना दिसतात. आयुष्याची जमा केलेली पुंजी खर्च करून किंवा प्रसंगी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते. परंतु काही वेळा आपल्या स्वतःच्या घराचे मुसळधार पाऊस, आग, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड होते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

तेव्हा अशा प्रसंगी एखादी छानशी गृह विमा पॉलिसी असणे फायदेशीर असते. तेव्हा आपण या लेखामध्ये गृह विमा पॉलिसी बद्दल माहिती घेऊ.

 गृह विमा पॉलिसी नेमकी काय आहे?

 आपल्या घराला मुसळधार पाऊस, महापूर, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती तसेच एखादा जातीय हिंसाचार, दंगल, जाळपोळ,  इत्यादी मानवनिर्मित संकटांमुळे संरक्षण मिळावे त्यासाठी गृह विमा पॉलिसी असते.

गृह विमा पॉलिसीत समाविष्ट घटक

  • घर भाडे- जर आपल्या घराचे नुकसान झाले आणि तेथे राहण्यायोग्य राहिले नसेल तर संबंधित घराची पुनर्बांधणी होईपर्यंत किंवा त्याची पूर्ण डागडुजी होईपर्यंत घर मालकाला राजासाठी एखाद्या पर्यायी निवासाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था साठी लागणारे भाडे किंवा जर ते घर भाडेकरूंना भाड्याने देऊन उत्पन्न सुरू असेल तर त्या उत्पन्नाची देखील या पॉलिसीत तरतूद आहे.

  • घरातील साहित्य- या पॉलिसीमध्ये घरातील साहित्य,  फर्निचर, मौल्यवान वस्तू,  टीव्ही, फ्रिज,  वाशिंग मशीन, एयर कंडीशनर,  लॅपटॉप,कपडे, इतर वस्तू जसे प्लेट, ग्लास इत्यादी गोष्टींना देखील या पॉलिसी द्वारे संरक्षण मिळते.

  • बांधकाम खर्च- घराचे किंवा संबंधित फ्लॅटचे जर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित  घटकां मुळे नुकसान झाले तर असल्या ओढावं नाऱ्या संकटापासून संरक्षण मिळण्यासाठी गृह विमा असतो.

 

  • अपघात विमा आणि थर्ड पार्टी लायबिलिटी- घरातील सदस्य, घर काम करणारे नोकर यांच्याबरोबरच घरातील इतर काही कारणामुळे  तिऱ्हाईत व्यक्तीस अपघात झाल्यास त्यासाठी देखील या विमा पॉलिसी तरतूद आहे.

  • लॉकर  मधील दागिने- आग, भूकंप,  महापूर, घरफोडी आदी कारणांमुळे बँकेतील लॉकर मध्ये ठेवलेल्या दागिने आणि घरातील दागिन्यांच्या नुकसान झाल्यास या पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण मिळते.

 

English Summary: Do you know about a home insurance policy? Published on: 29 April 2021, 09:26 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters