1. बातम्या

Kardai Crop Update : करडईचे विविध वाण आणि त्यांची वैशिष्टे

करडईची मुळे ही जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे, हे पीक खालच्या थरातील अन्नांश व ओलाव्याचा उपयोग करुन घेते.या पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होते व प्रतिकुल परिस्थितीत हे पीक तग धरते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
kardai news update

kardai news update

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू

कोरडवाहु क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील तेलबियाचे पिक म्हणजे करडई होय. करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. करडईची मुळे ही जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे, हे पीक खालच्या थरातील अन्नांश व ओलाव्याचा उपयोग करुन घेते.या पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होते व प्रतिकुल परिस्थितीत हे पीक तग धरते.या पिकासाठी कमी मजुर लागत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो.त्यामुळे हे पीक कोरडवाहु साठी वरदान ठरले आहे.करडईच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या पिकापासुन अधिक फायदा मिळवता येतो.महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत करडई संशोधन प्रकल्प, सोलापुर येथे करडई चे विविध वाण कोरडवाहु क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत.

प्रसारित वाण व वैशिष्टे खालील प्रमाणे
भीमा :
प्रसारण वर्ष १९८२
 महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस
 अवर्षाणास प्रतिकारक ,
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 मर रोगास मध्यम प्रतिकारक
 तेलाचे प्रमाण २९-३० टक्के,
 फुलाचा रंग उमलताना पांढरा,वाळल्यावर फिक्कट पांढरा व मध्यभागी लालसर ठिपका
 पिकाचा कालावधी १३0-१३५ दिवस
 उत्पादकता :१३ - १५ क्विं./हे.

फुले कुसुमा :
प्रसारण वर्ष २००३
 कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली योग्य
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक,
 फुलाचा रंग उमलताना पिवळा ,वाळल्यानंतर लाल.
 तेलाचे प्रमाण ३० टक्के
 पिकाचा कालावधी १३५ -१४० दिवस
 उत्पादकता – कोरडवाहू : १३-१५ क्विं./हे.,बागायती: २०-२२ क्विं./हे.

एस.एस.एफ. ७०८
प्रसारण वर्ष २०१०
 पश्चिम महाराष्ट्र लागवडीसाठी योग्य,कोरडवाहू तसेच बागायती
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 फुलाचा रंग उमलताना पिवळा ,वाळल्यानंतर लाल
 तेलाचे प्रमाण ३१ टक्के
 पिकाचा कालावधी ११५-१२० दिवस
 उत्पादकता:कोरडवाहू : १३-१५ क्विं./हे.,बागायती: २०-२२ क्विं./हे.

फुले करडई(एस. एस. एफ. ७३३)
प्रसारण वर्ष २०११
 कोरडवाहू लागवडीसाठी
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 तेलाचे प्रमाण २९ टक्के,फुलाचा रंग उमलताना पांढरा,वाळल्यानंतर फिक्कट पंधरा , झाडांची उंची मध्यम
 पिकाचा कालावधी १२०-१२५ दिवस
 उत्पादकता:कोरडवाहू : १३-१५ क्विं./हे.

एस. एस. एफ. ७४८ (फुले चंद्रभागा)
प्रसारण वर्ष २०१२
 कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
 तेलाचे प्रमाण २९ टक्के,
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 फुले उमलताना पिवळी पडल्यावर लाल
 पिकाचा कालवधी १३०-१४० दिवस
 उत्पादकता: कोरडवाहू : १३-१५ क्विं./हे.,बागायती: २०-२२ क्विं./हे.

फुले भिवरा ( एस.एस.एफ. १३-७१)
अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
 पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक्षम
 तेलाचे प्रमाण २९.२ टक्के
 मर व मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 पिकाचा कालावधी १२५ -१२६ दिवस
 उत्पादकता :२० क्विं./हे

फुले निरा ( एस.एस.एफ. १२-४०)
प्रसारण २०२०
 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
 मावा किडीस व मर रोगास मध्यम प्रतिकारक
 पिकाचा कालवधी १२०-१२५ दिवस
 तेलाचे प्रमाण ३२.९ टक्के
 उत्पादकता: कोरडवाहू:१३-१५ क्विं./हे., बागायती: २०-२२ क्विं./हे.

फुले गोल्ड( एस.एस.एफ. १५-६५)
प्रसारण वर्ष २०२१
 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
 सर्वाधिक तेलाचे प्रमाण ३४.६ टक्के
 मर रोगास मध्यम प्रतिकारक
 पिकाचा कालावधी १२०-१२५ दिवस
 उत्पादकता: कोरडवाहू :१४-१६ क्विं./हे.,बागायती: २०-२२ क्विं./हे.

फुले किरण(एस.एस.एफ. १६-०२)
प्रसारण वर्ष २०२१
 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
 तेलाचे प्रमाण ३०.५ %
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 पिकाचा कालावधी १२५ - १३० दिवस
 उत्पादकता : कोरडवाहू :२०-२५ क्विं. /हे,बागायती: २४-२५ क्विं./हे.

पी.बी.एन.एस -१२
अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य
 मराठवाडा विभागास योग्य
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 पिकाचा कालावधी १३०-१३५ दिवस
 उत्पादन:१२-१५ क्विं./हे

पी.बी.एन एस. ८६ ( पूर्णा )
मराठवाडा विभागात कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी प्रसारित
 पिकाचा कालावधी १३०-१३५ दिवस
 उत्पादकता: कोरडवाहू :१४-१६ क्विं./हे.,बागायती: २०-२५ क्विं./हे.

आय एस एफ -७६४
मराठवाड्यासाठी शिफारस
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 पिकाचा कालावधी १२०-१२५ दिवस
 उत्पादन:१२-१५ क्विं./हे

अकोला पिंक
विदर्भात लागवडीसाठी प्रसारित
 पिकाचा कालावधी १३०-१३५ दिवस
 उत्पादन:१२-१५ क्विं./हे

डी. एस एच १८५ ( संकरित वाण)
अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 मर रोगास प्रतिकारक
 पिकाचा कालावधी १२०-१३५ दिवस
 उत्पादकता: कोरडवाहू :१२-१५ क्विं./हे.,बागायती: २०-२५ क्विं./हे.

आर व्ही एस ए एफ १८-१ (राज विजय)
अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य
 मावा किडीस मध्यम प्रतिकारक
 तेलाचे प्रमाण अधिक ३९ टक्के
 पिकाचा कालावधी १२०-१३० दिवस
 उत्पादन:१३-१६ क्विं./हे

बिन काटेरी वाण
एस.एस.एफ. ६५८
प्रसारण वर्ष २००८
 बिन काटेरी वाण
 अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
 मावा कीड व मर रोगास मध्यम प्रतिकारक
 तेलाचे प्रमाण २८ टक्के,
 फुलाचा रंग उमलताना पिवळा व वाळल्यावरविटकरी लाल
 पिकाचा कालावधी ११५ -१२० दिवस
 उत्पादकता : १२-१३ क्विं./हे.

नारी – ६
प्रसारण वर्ष २०००
 बिन काट्याची ,पाकळ्या गोळा करण्यास योग्य
 पिकाचा कालावधी १३०-१३५ दिवस
 उत्पादन :१०-१२ क्विं./हे

नारी एन एच १( संकरित वाण )
प्रसारण वर्ष २००१
 बिन काट्याचा वाण
 पाकळ्या गोळा करण्यास योग्य
 पिकाचा कालावधी १३०-१३५ दिवस
 उत्पादन :१२ -१४ क्विं./हे.

जे. एस ९७
बिन काट्याचा वाण
 पाकळ्यासाठी उपयुक्त
 पिकाचा कालावधी १२०-१३५ दिवस
 १२ -१४ क्विं./हे

करडई फुल/ पाकळ्यांचा औषधी गुण:
वैद्यक शास्त्रात औषधोपचार म्हणून करडई पाकळ्यांचा उपयोग केला जातो. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाच्या कार्यक्षमतेवर करडई फुलाचा इस्ट परिणाम होतो. रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा तसेच रक्तामध्ये प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढून रक्तवाहिन्यात गुठूल्या होण्याचे प्रमाण कमी होऊन टाकतात असलेल्या गुठूल्या विरघळतात. ह्र्दयरोग्यांच्या इलाजात करडई पाकळीयूक्त औषधाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.तसेच या औषधाची मात्र सलग चार आठवडे घेतल्यास उच्च रक्तदाब कमी होतो.चीनमध्ये ६२ प्रकारच्या विविध सांधेदुखी व स्नायुदुखीवर करडई पाकळ्यांचा मद्यार्कापासून निर्माण केलेली औषधे प्रभावीपणे कार्य करतात.मणक्याचे आजार(स्पॅाडलेसीस),मानदुखी,पाठदुखी इत्यादीवरील आयुर्वेदिक उपचारात करडईपाकळ्या इतर वनऔषधी सोबत वापरल्यास आराम मिळतो

करडई लागवड तंत्रज्ञान
जमिन - मध्यम ते भारी (खोल) जमीन
वाण - भीमा, फुले कुसुमा, , एसएसएफ ७०८, फुले करडई, फुले चंद्रभागा, बिगर काटेरी वाण: एसएसएफ ६५८, नारी-६, नारी एन एच -१
बियाणे - १० ते १२ किलो /हेक्टरी
पेरणीची योग्य वेळ - २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
पेरणीचे अंतर - ४५ x २० से.मी.
खते - शेवटच्या वखरणीच्या वेळी ५ टन शेणखत जमिनीत मिसळावे ५०:२५:०० नत्र:स्फुरद:पालाश किलो प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे दोन गोणी युरिया व तीन गोण्या एसएसपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे. बागायती करडई पिकास ६० किलो नत्र + ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.
बीजप्रक्रिया - प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन चोळावे.त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅकटर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.
कीड व रोग नियत्रण - करडई पिकास मुख्यत: मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुस-या पंधरवड्यात केली असता,या किडीचा प्रादुर्भाव बराच कमी होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी मावा दिसून आल्यानंतर डायमेथोएट (रोगार) ३०% प्रवाही ७२५ मिली. ५०० लिटर पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे. नविन शिफारशीनुसार २५ % थायोमेथोक्झाम १०० ग्रॅम किंवा २० % प्राईड १०० मिली + ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी फवारावे. बोंडे पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफास १००० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे. सरकोस्पोरा व अल्टरनेरीया या बुरशीमुळे होणा-या पानावरील ठिपक्यांसाठी डायथेन एम-४५, १२५० ग्रॅम किंवा काँपर आक्सिक्लोराईड १५०० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळुन प्रति हेक्टरी फवारावे

बियाण्याची उपलब्धता :
महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत करडई संशोधन प्रकल्प, सोलापुर येथून करडई चे विविध वाण कोरडवाहु क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत.त्यापैकी एस. एस. एफ. ७०८ हा कोरडवाहू व बागायती साठी शिफारशीत केलेला, तेलाचे प्रमाण ३१ टक्के असलेला,मावा किडीस मध्यम प्रतिकारक, सर्वसाधारणपणे कोरडवाहू क्षेत्रात १३-१५ क्विं./हे. व बागायती क्षेत्रात २०-२२ क्विं./हे. उत्पादन देणारा वाण विक्री साठी उपलब्ध करण्यात आला आहे.चार किलो च्या पिशवीची किंमत रु.४८० /-(रु.चारशे ऐंशी फक्त ) असून अ.भा.सं.करडई संशोधन प्रकल्प, विभागीय कृषि संशोधन केंद्र ,रविवार पेठ ,दयानंद महाविद्यालय जवळ, सोलापूर येथे (कार्यालयीन वेळेत,सुट्टीचे दिवस वगळून) उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी पुढील दूरध्वनी क्रमांकावर ०२१७-२३७३०४७,२३७२४०८, २३७३२०९, मो.९४२३३३३५६३१ संपर्क साधावा.

लेखक -
डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.९४०४०३२३८९
डॉ. अनिल राजगुरू ,करडई पैदासकार , अ.भा.सं. करडई संशोधन प्रकल्प,सोलापूर

English Summary: Different varieties of kardai and their characteristics indian agriculture Published on: 22 September 2023, 02:57 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters