1. बातम्या

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कापूस आणि सोयाबीनची भरपाई द्या: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात गेल्या महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेती पिकांचे आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याला विदर्भही अपवाद नाही. तिथल्या शेतकऱ्यांना अजूनही कुठलीही मदत मिळाली नाही, तसेच शेतमाल खरेदी सुद्धा अद्याप सुरू झालेले नाही.

KJ Staff
KJ Staff


महाराष्ट्रात गेल्या महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेती पिकांचे आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याला विदर्भही अपवाद नाही. तिथल्या शेतकऱ्यांना अजूनही कुठलीही मदत मिळाली नाही, तसेच शेतमाल खरेदी सुद्धा अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे अन्याय इतर काही बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात नमूद केले की, बोंड आळीमुळे यंदा विदर्भाच्या बहुतेक भागांमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जर या नुकसानीचा अनुमान पकडला तर ५० टक्क्यांच्या वर  नुकसान आहे, अजून ते वाढत होत जाणार आहे. बोंड आळीने कापूस पूर्णपणे नष्ट झालेला आहे. यंदा दुसरा कापूस पिकावरील मोठ संकट म्हणजे बोंड अळी बोंडे चांगली दिसतात व आतून पूर्णपणे कापूस सडलेला असतो. साधारणतः एकरी ६ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी १ क्विंटल ते दीड क्विंटलपर्यंत उत्पन्न फक्त आले आहे. तसेच गंभीर परिस्थिती ही सोयाबीनच्या आहे.


सोयाबीन पिकाचे जवळ-जवळ ८० टक्‍क्‍यांच्या आसपास नुकसान झालेले आहे. विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थितीसारखी आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेच सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे निर्देश देण्यात आलेले नाहीत. स्थानिक प्रशासन पंचनामे करीत असले तरी त्याचा कोणता फायदा होईल अशी स्थिती जाचक अटींमुळे नाही. अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी जो शासन निर्णय काढण्यात आला, त्यात विविध अटी ठेवल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. दुसरीकडे शेतीमालाची खरेदी अजूनही प्रारंभ झाले नाही. ओलसर आणि कापसाची प्रत चांगली नसल्यामुळे खासगी व्यापारी कापसाला चांगला भाव देत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे.


सोयाबीन सुद्धा ओल्या असल्याने ३ हजार रुपयांपेक्षा कमी भाव मिळत असल्याने खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकरी भरडला जातो आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही अशी स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये सुद्धा ५०% शेतमाल येणार नाही. अशी स्थिती असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्य सरकारने तातडीने विदर्भातील प्रशासनाला तात्काळ निर्देश देऊन दिवाळी सात दिवसांवर आले असताना तातडीने मदत करावी. अन्य अनावश्‍यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी प्राधान्य लक्ष द्यावे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

English Summary: Compensate for loss of cotton and soybean due to heavy rains - Devendra Fadnavis Published on: 07 November 2020, 01:54 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters