1. बातम्या

गरजेनुसार आयुर्विमा पॉलिसी निवडा ; 'या' कंपनीने सादर केला सरल जीवन विमा

एगॉन इन्शुरन्स हा अग्रगण्य डिजिटल जीवन विमा पुरवठादार कंपनीने एगॉन लाईफ सरल जीवन विम्याची (प्रमाणित सुलभ मुदत विमा योजना) घोषणा केली. या उत्पादनामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पॉलिसीची निवड करण्याची लवचिकता उपलब्ध राहील. या ऑनलाईन पॉलिसीच्या आधारे ग्राहकांना किमान वित्तीय तसेच वैद्यकीय आवश्यकतांसह गुंतागुंत-मुक्त प्रोसेसिंगचा लाभ घेता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
सरल जीवन विमा

एगॉन लाईफ सरल जीवन विमा ही सोपी विमा पॉलिसी असून पॉलिसीधारकाचा मृत्यू ओढावल्यास नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजे नॉमिनीला निश्चित रक्कम उपलब्ध करून देते. १८ ते ६५ वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीला रुपये ५ लाख ते रुपये २५ लाखांपर्यंतचा विमा घेता येईल. या विम्याचा कालावधी ५ ते ४० वर्षांपर्यंत राहील असे कंपनीने म्हटले आहे.

सहा कोटी कर्मचाऱ्यांना दिलासा ; PF व्याजासंदर्भात केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय एगॉन लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ सतीश्वर बालकृष्णन म्हणाले की, “सरल जीवन प्रमाणित कवच आणि किफायतशीर प्रीमियम उपलब्ध करून देते, हे आयआरडीएआयने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

यामुळे विमा केवळ खोलवर रुजण्यास मदत होणार नाही, तर डिजीटल मंचांवर त्याची उपलब्धता ऑनलाईन इन्शुरन्स खरेदी सुलभ, पारदर्शक आणि गुंतागुंत-मुक्त करण्यास साह्यकारी ठरेल.”

जीवन विमा उत्पादन ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने या डिजिटायजेशनसह आमची क्षमता आणि आमचा अनुभवासमवेत हे उत्पादन डिजिटल मंचावर पुढे करता येईल असे बालाकृष्णन यांनी सांगितले. एकसमान शब्द आणि प्रमाणित वैशिष्ट्ये विमा खरेदी दरम्यान होणारी गुंतागुंत आणि गोंधळाची स्थिती कमी करेल. 

त्यामुळे ज्यांना अपप्रसंगात आपल्या जीवलगांचे आयुष्य सुरक्षित करू इच्छिणाऱ्या तसेच पहिल्यांदा विमा खरेदी करणाऱ्यांच्या दृष्टीने हे उत्पादन साजेसे ठरणार आहे.

English Summary: Choose a life insurance policy as needed; Aegon Insurance company introduced simple life Published on: 05 March 2021, 02:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters