1. बातम्या

...हे योग्य नाही: मुख्यमंत्र्यांनी आता आवर घातला पाहिजे; अजित पवार कडाडले

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. याच पार्श्ववभूमीवर अजित पवार यांनी मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. यात अजित पवारांनी सरकारला चांगलेच फटकारलं आहे.

Chief Minister Eknath Shinde Ajit Pawar

Chief Minister Eknath Shinde Ajit Pawar

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. याच पार्श्ववभूमीवर अजित पवार यांनी मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. यात अजित पवारांनी सरकारला चांगलेच फटकारलं आहे.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जे आदेश देतात तेच नियम पाळत नाहीत, हे योग्य नाही असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे यावेळी त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीच नियमांचे पालन करत नाहीत.

हे ही वाचा: संजय राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये...

विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, राज्यातील काही भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊ केलेली नाही.

राज्यातील पूरग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यायला पाहिजे. राज्यात अनेक शेतकऱ्यांचे संसार पूरामुळे उघड्यावर आले आहेत. अनेकांचे नुकसान झालं आहे तरीही तिथे अजून पंचनामे झाले नाही. जेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा: आता राज्यात फक्त भाजप...!! भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने देशात खळबळ

राज्य सरकारने त्वरीत नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करून मदत देण्याची तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजारांची मदत देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी फळबागांच नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांची मदत करावी.

हे ही वाचा: अटकेपूर्वी संजय राऊतांनी केले होते मोदींचे कौतुक! पहा काय म्हणाले होते राऊत?

English Summary: Chief Minister Eknath Shinde Ajit Pawar Published on: 02 August 2022, 01:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters