1. बातम्या

भारत इन्सेक्टीसाईड्स लिमिटेड कंपनीची नवीन ओळख "भारत सर्टीस अ‍ॅग्रीसाइन्स लिमिटेड"

पीक संरक्षण उत्पादनांमध्ये तज्ञ असलेल्या मित्सुई अँड कंपनी, लि. (मित्सुई) या कंपनीच्या भारत इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड (बीआयएल) ने जाहीर केले की १ एप्रिल २०२१ पासून त्याचे नाव बदलून ‘भारत सर्टीस अ‍ॅग्रीसायन्स लिमिटेड असे नामकरण करण्यात आले.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
भारत सर्टीस अ‍ॅग्रीसाइन्स लिमिटेड

भारत सर्टीस अ‍ॅग्रीसाइन्स लिमिटेड

पीक संरक्षण उत्पादनांमध्ये तज्ञ असलेल्या मित्सुई अँड कंपनी, लि. (मित्सुई) या कंपनीच्या भारत इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड (बीआयएल) ने जाहीर केले की १ एप्रिल २०२१ पासून त्याचे नाव बदलून ‘भारत सर्टीस अ‍ॅग्रीसायन्स लिमिटेड असे नामकरण करण्यात आले.

‘सर्टीस’ हा ब्रँड मित्सुई चा जागतिक स्थरावर पीक संरक्षण उत्पादनाच्या  वितरण नेटवर्क साठी नाव वापरले जाते. जसे सर्टीस यूएसए, सर्टीस युरोप इत्यादी, आणि ' अ‍ॅग्रीसायन्स ' विज्ञानाने कृषी उद्योगाच्या उत्पादकता वाढीस हातभार लावण्याची कंपनीची वचनबद्धता दर्शवते.कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.  धर्मेश गुप्ता आणि सहव्यवस्थापकीय संचालक श्री.  किमिहिडे कोंडो यांच्या हस्ते संपूर्ण टीमच्या उपस्थितीत ‘भारत सर्टीस अ‍ॅग्रीसाइन्स लिमिटेड’ या नवीन कंपनी चिन्हाचे आज नवी दिल्लीत अनावरण झाले. कंपनीचे चिन्ह दर्शिविते भारत सर्टीस अग्रीसायन्स लिमिटेड ही अ‍ॅग्री सायन्स कंपनी मध्ये रूपांतरित आणि शाश्वत शेतीसाठी उपाय देण्याचे वचन देते. यात शेतीचे दोन मुख्य घटक आहेत - पाणी आणि वनस्पती. निळा रंग पाण्याचे प्रतीक आहे आणि हिरवेगार वनस्पती दर्शवितात. डावीकडील चिन्ह खुल्या वर्तुळावर पीक दर्शवितात. पीक ही कंपनीच्या उत्पादकांचा अनुप्रयोग क्षेत्राचे थेट प्रतिनिधित्व आहेत तर खुले मंडळ नाविन्यपूर्ण असीम शक्यतांचे प्रतिनिधित्व करते.

शेतकऱ्यांसाठी उत्तम समाधान देणाऱ्या पैकी एक प्रयत्नशील  कंपनी आहे म्हणून  कंपनीने नवीन दृष्टी आणि ध्येय  तयार केले आहे. दृष्टी  म्हणजे ‘ कृषीविज्ञाना सोबत घेऊन येणे स्मित हास्य  ’ आणि ध्येय  ‘शाश्वत शेतीच्या समाधानासाठी एक अभिनव व्यासपीठ असू ’.सप्टेंबर २०२० मध्ये भारत इन्सेक्टिसाईड्स लिमिटेडने मित्सुई आणि निप्पॉन सोडा कंपनी, लि. ( निसो ) यांच्याशी संबंध जोडला, तेव्हा  निसो आणि मित्सुई यांच्या सह-स्थापलेल्या एका विशेष उद्देशाच्या कंपनीमार्फत बीआयएलमध्ये ५६% भाग घेतला. या व्यवहाराचा परिणाम म्हणून, बीआयएल मित्सुईची एक गट कंपनी बनली. मित्सुई आणि निस्सो बरोबरचे संबंध भारत सर्टीस अ‍ॅग्रीसायन्स लिमिटेडची नाविन्यपूर्ण पीक संरक्षण उत्पादने वितरित करण्याची आणि भारताच्या कृषी क्षेत्राच्या शाश्वत वाढीस समर्थन देण्याची क्षमता मजबूत करेल.

भारत सर्टीस  अ‍ॅग्रीसाइन्स लि. (पूर्वी भारत इन्सेक्टीसाईड्स लि. म्हणून ओळखली जाणारी ) बद्दल

भारत इन्सेक्टीसाईड्स लि. ने  १९७७ मध्ये आपले काम सुरू केले आणि भारतीय बाजारात हळूहळू आपली उपस्थिती विकसित केली. भारत सर्टीस अ‍ॅग्रीसायन्स लि. ची  पूर्ण भारतात  उपस्थिती आहे आणि शेतकर्‍यांना उच्च प्रतीचे पीक संरक्षण उत्पादने आणि सेवा पुरवते. भारत सर्टीस अ‍ॅग्रीसायन्स लि. ची अनेक उत्पादने आहेत जी २६ गोदामांच्या नेटवर्कद्वारे, ४००० पेक्षा  अधिक वितरक आणि मोठ्या संख्येने किरकोळ विक्रेत्यांद्वारे शेतकऱ्यांना  उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. भारत सर्टीस अ‍ॅग्रीसायन्स लि. चे  कृषीशास्त्रज्ञांची टीम शेतकऱ्यांच्या जवळून कार्य करते आणि त्यांना पीक संरक्षणासंदर्भात पुरेसे सल्ला प्रदान करते जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन मिळू शकेल.

अधिक माहितीसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर भेट द्या   https://www.bharatcertis.com

 मित्सुई आणि कं., लि., बद्दल

मित्सुई अँड कंपनी, लि. ही जागतिक व्यापार आणि गुंतवणूक कंपनी असून वार्षिक उत्पन्न USD ६३ अब्ज डॉलर्स आहे. मित्सुईकडे वैविध्यपूर्ण व्यवसाय पोर्टफोलिओ आहे जो आशिया, युरोप, उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिका, मध्य पूर्व, आफ्रिका आणि ओशिनिया या देशांमधील अंदाजे ६५ देशांमध्ये विस्तारित आहे.

 

मित्सुईकडे, ४५६०० पेक्षा जास्त प्रतिभाशाली कर्मचारी तैनात आहेत आणि विश्वासू भागीदारांच्या जागतिक नेटवर्कच्या सहकार्याने व्यवसाय ओळखण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी जगभरात काम करतात. मित्सुईने खनिज व धातू संसाधने, उर्जा, यंत्रसामग्री व पायाभूत सुविधा आणि रसायनांचा उद्योग व्यापलेला एक मजबूत आणि वैविध्यपूर्ण मुख्य व्यवसाय पोर्टफोलिओ तयार केला आहे.आपल्या सामर्थ्याचा फायदा घेत, मित्सुईने नवीन क्षेत्रात विविध  मूल्य निर्माण करण्यासाठी आपल्या मुख्य उद्योगाच्या पलीकडे जाऊन नवीन उदयोग उभे केले जसे उर्जा उपाय , हेल्थकेअर आणि न्यूट्रिशन आणि नवीन-वाढणाऱ्या  आशियाई बाजारावर लक्ष केंद्रित करण्यासह नवीन क्षेत्रात प्रवेश केला.या धोरणाचा हेतू जगाच्या मुख्य मेगा-ट्रेंडपैकी काही वापरुन वाढीच्या संधी मिळविण्याचे आहे: शाश्वतपणा, आरोग्य आणि निरोगीपणा, डिजिटलायझेशन आणि ग्राहकांची वाढती शक्ती.

मित्सुईचा आशियात बराचसा मोठा वारसा आहे, जिथे त्याने व्यवसाय आणि भागीदारांचा वैविध्यपूर्ण आणि मोक्याचा  पोर्टफोलिओ स्थापित केला आहे जो जगातील सर्वात वेगवान वाढणार्‍या प्रदेशात सर्व जागतिक भागीदारांना अपवादात्मक प्रवेश प्रदान करतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पोर्टफोलिओ मजबूत करतो.मित्सुईने आपल्या ग्रुप कंपन्यांमार्फत कृषी उत्पादनांच्या उत्पादनात वाढ आणि कृषी उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास हातभार लावणाऱ्या  कृषी निविष्ठांच्या व्यवसायात जगभरातील ग्राहक आणि भागीदारांशी विश्वास-आधारित संबंध निर्माण केले आहेत: सर्टीस यूएसए (जैव कीटकनाशकांचा जागतिक कंपनी  ), जर्मनीमधील स्पाइस युरेनिया (तांबे उत्पादनांमध्ये जागतिक कंपनी ), सर्टीस युरोप आणि ओयो फिनो क्विमिका ब्राझील. मित्सुई पीक संरक्षण उत्पादनांच्या मध्यवर्ती व्यवसायामध्ये देखील सक्रिय भूमिका बजावते आणि आपल्या धोरणात्मक संबंधांद्वारे भारत आणि जागतिक स्तरावर अनेक पीक संरक्षण उत्पादनांच्या उत्पादकांशी जवळून कार्य करते.

अधिक  माहितीसाठी, कंपनीच्या संकेतस्थळावर भेट द्या. https://www.mitsui.com/

 

निप्पॉन सोडा कंपनी, लि. बद्दल

१९२० मध्ये स्थापनाझाल्यापासून निप्पॉन सोडामध्ये अद्वितीय तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान जमा झाले आहे आणि शेती, फार्मास्यूटिकल्स आणि वैशिष्ट्यपूर्ण रसायने अशा विविध क्षेत्रात अत्यंत कार्यशील आणि उच्च-मूल्यवर्धित रासायनिक उत्पादने प्रदान केली आहेत. रासायनिक द्रव्ये हाताळणारी कंपनी म्हणून आम्ही नेहमीच  काळजीपूर्वक लक्ष दिले आहे त्यापलीकडे जाऊन  पर्यावरण, सुरक्षा आणि आरोग्याकडे लक्ष देऊन व्यवसाय चालविला आहे.

पुढे जावून , निप्पॉन सोडा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पादनांद्वारे पुढच्या पिढीची स्वप्ने साकार करणाऱ्या समाजाच्या निर्मितीस हातभार लावेल.

अधिक  माहितीसाठी, कंपनीच्या संकेतस्थळावर भेट द्या. https://www.nippon-soda.co.jp/e/

 

English Summary: Bharat Insecticides Limited Company's New Introduction "Bharat Certis AgriScience Limited" 2 april Published on: 02 April 2021, 08:28 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters