1. बातम्या

महापुरामुळे झाले नुकसान तरीही सांगली जिल्ह्यातील 735 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त

यावर्षी सगळीकडे अतिवृष्टी आणि महापुराने अक्षरश थैमान घातले होते.मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात तर अतोनात नुकसान केले.या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला सांगली जिल्हा ही अपवाद नव्हता.परंतु याच सांगली जिल्ह्यातील 735 गावांची पीक पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त जाहीर झाले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
flood situation

flood situation

यावर्षी सगळीकडे अतिवृष्टी आणि महापुराने अक्षरश थैमान घातले होते.मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात तर अतोनात नुकसान केले.या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला सांगली जिल्हा ही अपवाद नव्हता.परंतु याच सांगली जिल्ह्यातील 735 गावांची पीक पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त जाहीर झाले आहे.

हीसुधारित पैसेवारी असून अंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.परंतु त्यानंतरही पैसेवारी अशीच राहिली तर शेतकरीअनेक  सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता जास्त आहे.

 सांगली जिल्ह्याची सुधारित पैसेवारी नुकतीच जाहीर करण्यात आला असून यामध्ये 735 गावांची पीक पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आहे.त्यामुळे अशा गावांना कोणतेही शासकीय लाभ मिळणार नाही.सांगली जिल्ह्यामध्ये यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच नद्यांना आलेल्‍या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज,वाळवा,पलूस आणि शिराळा सारख्या तालुक्यात महापुराने पिकांचे अतोनात नुकसान केले. तरी या संबंधित तालुक्याचे पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त निश्चित झाली आहे.

 सन 2019 मध्येदेखील मिरज, पलूस,शिराळाआणि वाळवा तालुक्यांमध्ये पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते.तेव्हा या तालुक्याची पिकांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती.त्यामुळे तेव्हा या तालुक्यांना शासकीय सवलती मिळाल्या होत्या.आता जाहीर झालेली पैसेवारी ही सुधारित असली तरीअंतिम पैसेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

मात्र या डिसेंबरमध्ये होणाऱ्या अंतिम पैसेवारी फारसे बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना महापुराच्या मदतीवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे.यावर्षी महापुराने पिकांचे अतोनात नुकसान झाले असले तरी पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त असल्यानेशासकीय सवलती मिळण्याच्या  आशा धूसर झाले आहेत.(स्त्रोत-अग्रोवन)

English Summary: 735 village in sangli district declare 50 more paisewari after flood situation Published on: 13 November 2021, 08:20 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters