1. फलोत्पादन

Water Soluable Grade: पिकांसाठी कोणती विद्राव्य खताची ग्रेड कशासाठी उपयोगी पडते,वाचा याबद्दल महत्वाची माहिती

पिकांच्या निरोगी आणि जोमदार वाढीसाठी व जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी बंधू विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करतात.यामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणून नत्र,स्फुरद आणि पालाश यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु पिकांना मुख्य अन्नद्रव्य इतकेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील निकोप वाढीसाठी तेवढीच गरज असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
various grade of water soluble fertilizer

various grade of water soluble fertilizer

पिकांच्या निरोगी आणि जोमदार वाढीसाठी व जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी बंधू विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करतात.यामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणून नत्र,स्फुरद आणि पालाश यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु पिकांना मुख्य अन्नद्रव्य इतकेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील निकोप वाढीसाठी तेवढीच गरज असते.

यामध्ये विद्राव्य खतांच्या माध्यमातून मुख्य अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो.परंतु विद्राव्य खतांमध्ये वेगळ्या प्रकारच्या ग्रेड येतात व त्यांच्या पिकांसाठी असणारा उपयोग देखिल वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. या लेखात आपण या बद्दलची माहिती घेऊ.

नक्की वाचा:Crop Veriety: शेतकरी बंधूंनो! गवारच्या 'हे'तीन वाण म्हणजे भरपूर उत्पन्नाचे आहे समीकरण,वाचा माहिती

 विद्राव्य खतांच्या विविध ग्रेड्स आणि त्यांचा पिकासाठी वापर

1- ग्रेड पहिली-19:19:19- या खताला स्टार्टर ग्रेड असेदेखील म्हटले जाते.  या ग्रेडमध्ये नत्र हा अमाईड, अमोनियम,नायट्रेट या तीनही स्वरूपामध्ये आढळतो. शेतकरी बंधुंनी या ग्रेडचा वापर पीक वाढीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत शाखिय वाढीसाठी केला तर उत्तम फायदा मिळतो.

2- ग्रेड दुसरी-0:52:34- या खतास किंवा या ग्रेडला मोनोपोटॅसियम फॉस्पेट असे देखील म्हटले जाते. या खतांमध्ये स्फुरद व पालाश या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचे प्रमाण खूप प्रमाणात असते.

शेतकरी बंधुंनी या ग्रेडचा वापर फुलधारणा होण्यापूर्वी वा फुलधारणा झाल्यानंतरच्या कालावधीसाठी करावा. फळबागेत फळांच्या योग्य पक्वतेसाठी व आकर्षक रंग यावा यासाठी विशेष करून हे खत वापरले जाते.

नक्की वाचा:Polyhouse Care Tips: 'पॉलिहाऊस फार्मिंग' मध्ये 'या' गोष्टींची काळजी म्हणजे हमखास नफा मिळण्याची हमी

3- ग्रेड तिसरी-12:61:0- या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट असे देखील म्हणतात. यामध्ये असलेल्या अमोनिकल स्वरुपातील नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. पिकांच्या नवीन मुळाच्या आणि पिकाच्या जोमदार शासकीय वाढीसाठी फुलांच्या योग्य वाढीसाठी याचा उपयोग होतो.

4- ग्रेड चौथी-13:0:45- या खतास पोटॅशियम नायट्रेट असे म्हणतात. या खतांमध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य असणाऱ्या पालाशचे प्रमाण खूप जास्त असते.

पिकांच्या फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्वता अवस्थेत या खताची आवश्‍यकता मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे या कालावधीत वापर करावा.दुसरे महत्त्वाचे या खताचे वैशिष्ट्य म्हणजे अवर्षण प्रवण स्थितीमध्ये पिके यामुळे तग धरायला सक्षम होतात.

नक्की वाचा:Leafy Vegetable Farming: उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असेल तर 'या' पालेभाज्यांची लागवड देईल कमी खर्चात चांगला नफा

English Summary: this is important fertilizer grade for healthy growth of crop Published on: 16 August 2022, 07:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters