1. आरोग्य सल्ला

खारीक खाण्याचे फायदे वाचाल तर तुम्ही नक्कीच तूम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी खरिकप्रेमी व्हाल

धष्टपुष्ट शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त फळ आहे. खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
खारीक खाण्याचे फायदे वाचाल तर तुम्ही नक्कीच तूम्ही खरिकप्रेमी व्हाल

खारीक खाण्याचे फायदे वाचाल तर तुम्ही नक्कीच तूम्ही खरिकप्रेमी व्हाल

धष्टपुष्ट शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त फळ आहे. खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते. खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते, कारण हे फळ वाळलेल्या स्वरुपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते.

खारीक खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.खारीक ही खजुराची बहीण असली तरी स्त्रियांच्या आरोग्यासंबंधात तिचं स्थान विशेष आहे. स्त्रियांच्या सर्व तक्रारींवर विशेषत: प्रसूतीनंतर खारीक आहारात असायला हवी असं सांगतात.

खारीक ही खजुराच्या जातीतील असली तरी स्त्रियांकरिता त्याचे वेगळे विशेष स्थान आहे. ज्या मुलींची मासिक पाळी साफ येत नाही त्यांनी नियमितपणे खारीक चूर्ण तुपाबरोबर खावे किंवा किमान एक खारीक रोज खावी. दोन-तीन महिने असा प्रघात ठेवला तर मासिक पाळी नियमित होते.

मासिक पाळीच्या त्रासामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांना नियमित खारीक खाल्ल्यामुळे दिवस राहतात.

खारीक खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही, तर खारकेसारखे शरीर खुटखुटीत व ताठपणे काम करणारे बनते.

वाईट कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी, शरीराला लोहाचा पुरवठा करण्यासाठी खारकेचा उपयोग होतो.

नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते. खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

खारकेत भरपूर फायबर, जीवनसत्त्व बी १, बी २, बी ३,बी ५ असून पोटॅशियमही आहे. योग्य प्रकारे वजन वाढण्यासाठी खारकेचा वापर करावा, लहान मुलांना उगाळून द्यावी, मोठय़ाने भिजवून किंवा पावडर करून खावी. खारकेची पूड दुधात शिजवून घेतली तर नक्कीच फायदा होतो.

बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर( १२५ मिलीग्रॅम) आणि आवश्यकतेनुसार साखर ५०० मि.ली दुधामध्ये उकळून घ्या. रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते.

खारकातील बिया काढून बारीक करून घ्या आणि २५० मिलीग्रॅम दुधामध्ये केळासोबत मिल्कशेक तयार करा. याचे नियमित सेवन केल्यास वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर राहतील.

खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणार्या रुग्णांना आराम मिळेल. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल.

भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.

सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल.

सर्दी, पडसे, खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दूधात पाच खारीक, पाच काळामिरीचे दाणे, वेलचीचे तुकडे एकत्र करून उकळावेत. या मिश्रणामध्ये चमचाभर तूप मिसळा. हे ड्रिंक सायनसच्या रूग्णांदेखील फायदेशीर.

खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होईल. दररोज रिकाम्या पोटी खारीक खावी.

पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसर्‍या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसर्‍या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन करावे. नपुंसकतेची समस्या दूर होईल.

खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल.

खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्‍त असते.

नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते.

खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

मधूमेहींसाठी खारीक गुणकारी ठरते. त्यामधील नैसर्गिक गोडवा रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारे बदल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांनाही खारीक फायदेशीर ठरते. यामध्ये पोटॅशियम घटक मुबलक असतात. दूधामध्ये खारीक मिसळून प्यायल्याने त्यामधील फायबर घटक पचनक्रियेला चालना देतात. त्यामुळे नियमित दूध – खारीकाचे मिश्रण एकत्र करून प्यावे.

पचनाचा त्रास, डायरिया, पोटदुखी अशा समस्यांवर खारीक आणि दूध फायदेशीर आहे. खारीकातील पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, मिनरल्स, मॅगनीज, सेलेनियम असे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हाडांना बळकटी देण्यासाठी खारीक आणि दूध फायदेशीर आहे. खारीकमधील फायबर घटक कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

खारीकमध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन बी मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे त्वचेला चकाकी येण्यास मदत होते. सोबतच शरीरात नव्या पेशींची निर्मिती होण्यास मदत होते.

खारकांचे बारीक तुकडे व तितकेच आल्याचे लहान तुकडे, भरपूर लिंबाचा रस व त्यात अष्टमांश प्रमाणात सुंठ, मिरे, पिंपळी, जिरे व बडीशेप असे चूर्ण, चवीपुरते मीठ व तुपावर भाजलेला हिंग असे लोणचे मुरल्यावर खावे. उत्तम रुची येते. भूक लागते.

रक्तपित्त विकारात खारीक व तूप खावे.

लहान मुलांचे दात बळकट व्हावयास हवे असतील तर रोज एक खारीक चावून, चघळून खावयास लावावी.

मुलांसह अबालवृध्दांना चॉकलेट व केकपेक्षा हा खुराक उत्तम आहे. रोज काही करुन खाता आले नाही तर खारिक खजूर नुसतेच खा दोन महीन्यात तुम्हाला तुमचे बदल जाणवतील.

English Summary: If you read about the benefits of eating Kharik, you will surely become a Kharik lover Published on: 29 March 2022, 05:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters