1. आरोग्य सल्ला

रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी साधा-सोपा उपाय

मित्रांनो आज आपणाला जो उपाय सांगणार आहोत हा उपाय तुम्ही फक्त दिवसातून एकदा केला तरी तुमच्या बोटापासून डोक्यापर्यंत सर्व नसा क्षणात मोकळ्या होतील अंगदुखी डोकेदुखी गायब होईल.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी साधा-सोपा उपाय

रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी साधा-सोपा उपाय

नसा मोकळ्या होताना तुम्हाला जाणवतात देखील. ज्या ठिकाणी नसा दबलेल्या आहेत तेथे मुंग्या आल्यासारखे वाटतील करंट बसल्यासारखे वाटेल आणि क्षणातच तुमच्या दबलेल्या नसा मोकळ्या होतील. अंगदुखी डोकेदुखी अशा अनेक समस्यांवर हा उपाय लागू पडतो. टाच दुखी कमी होते टाचेला भेगा असतील तर त्या भरून येतील. अशा वेगवेगळ्या वेदनेच्या समस्या गायब होतील. या उपायाचा लाखो लोकांना फायदा झालेला आहे.

मित्रांनो यासाठी एक टब घ्या आणि त्यात पाय ठेऊन, गरम पाणी घ्या, गरम पाणी म्हणजे तुमच्या पायांना सोसेल तितकेच गरम यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळावा आणि चार-पाच कापराच्या वड्या ची पावडर त्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात. मित्रांनो या पाण्यात तुम्ही दोन्ही पाय दहा ते पंधरा मिनिटं बुडवून ठेवा. यामुळे चमत्कारिकरीत्या तुमच्या नसा मोकळ्या होतील आणि तुम्हाला जाणवेल, कारण पाण्यात पाय घातल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला मुंग्या

आल्यासारखा वाटतील करंट बसल्यासारखे वाटेल आणि क्षणार्धात तुमच्या नसा मोकळ्या झालेल्या जाणवतील. मित्रांनो यामागील शास्त्र म्हणजे तुमच्या पायात 272 प्रेशर पॉईंट असतात, जे शरीरातील 72000 नसांना जोडलेले असतात. त्यामुळेच जेव्हा लिंबू आणि कापूर घातलेल्या पाण्यात तुम्ही पाय ठेवता, तेव्हा तुम्हाला करंट बसल्यासारखे वाटते किंवा मुंग्या आल्यासारखे वाटते. म्हणजेच रक्त प्रवाह सुरळीत होतो.

मित्रांनो उपाय तर अगदी साधा आणि सोपा आहे यासाठी लागणारे साहित्य पण आपल्या घरी सहज उपलब्ध असते, या उपायांमुळे तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधाशिवाय दबलेल्या नसा मोकळ्या होतात. अशक्तपणा थकवा जातो, रक्त प्रवाह सुरळीत होतो, टाच दुखी, कंबर दुखी, पाय दुखणे यांसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. मित्रांनो घरी करता येणारा हा सहज सोपा उपाय करून तुमच्या शरीरातील 72000 नसा तुम्ही मोकळा करून घ्या, हा सोपा उपाय तुमच्या मैत्रिणींना मित्रांना नातेवाईकांना जरूर सांगा त्यामुळे त्यांनाही या गोष्टीचा लाभ होईल.

English Summary: A simple solution to improve blood circulation Published on: 18 May 2022, 06:26 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters