1. यांत्रिकीकरण

सोनालिका ट्रॅक्टर ने लॉन्च केले सोनालिका इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पाहू त्याची वैशिष्ट्ये

सोनालिका ही देशातील ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी आहे. सोनालीका ट्रॅक्टर ब्रँड हा भारतामध्ये वेगाने वाढणार ब्रँड असून जगातील युरोप, अमेरिका आणि आफ्रिका सह जवळ जवळ 130 पेक्षा जास्त देशांमध्ये सोनालिका ने आपले हात पाय पसरले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sonalika electric tractor

sonalika electric tractor

सोनालिका ही देशातील ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी आहे. सोनालीका ट्रॅक्टर ब्रँड हा भारतामध्ये वेगाने वाढणार ब्रँड असून जगातील युरोप, अमेरिका आणि आफ्रिका सह जवळ जवळ 130 पेक्षा जास्त देशांमध्ये सोनालिका ने आपले हात पाय पसरले आहेत.

सोनालीका ट्रॅक्टर ने भारतातील पहिले फिल्ड रेडी ट्रॅक्टर टायगर इलेक्ट्रिक  ट्रॅक्टर सादर केले आहे.उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे शेतकर्‍यांना अनुकूल असे ट्रॅक्टर युरोपमध्ये तयार केले गेले आहे तसेच त्याची निर्मिती भारतात देखील करण्यात आली आहे. या टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टरची निर्मिती ही खास करून अधिक शक्ती साठी  तसेच जगभर उत्सर्जन मुक्त आणि आवाज मुक्त शेतीसाठी केली आहे.

हे ट्रॅक्टर भारतीय शेतकर्‍यांसाठी उत्कृष्ट वीज,घरी सहज चार्जिंग,शून्यकार्बन फूटप्रिंट तसेच प्रदूषण मुक्त शेतीसाठी तयार करण्यात आले आहे. ट्रॅक्टर एकदा चार्ज केल्यानंतर आठ तास  शेतात चांगल्या पद्धतीने काम करू शकते.

 या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये

 हे ट्रॅक्टर भारतातील पहिले फिल्ड रेडी ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून सोनालिका टायगर इलेक्ट्रिक अत्याधुनिक IP67 अनुरूप 25.5 किलोवॅट नैसर्गिक कूलिंग कॉम्पॅक्ट बॅटरी द्वारे समर्थित आहे. 

जे ऑपरेशनल कॉस्ट च्या ¼ वा म्हणजेच कमी किमतीत डिझेलच्या शतकांच्या  तुलनेत अधिक सुनिश्चित करते. टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची  अत्याधुनिक आणि हाय अँडबॅटरी सामान्य घर चार्जिंग पॉईंट्स दहा तासात पूर्णपणे चार्ज केली जाते.( स्त्रोत – कृषी योजना )

English Summary: sonalika tractor launch tiger electric tractor Published on: 25 September 2021, 02:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters