1. यांत्रिकीकरण

कोणते मोबाईल ॲप आहेत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त? मिळेल शेती बद्दल उपयुक्त माहिती

आताच्या युगात सगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला आहे. मग ते उद्योग क्षेत्र असो वाशेती क्षेत्र. तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योग, व्यवसाय यामध्ये एक वेगळीच किनार निर्माण झाली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mobile application

mobile application

 आताच्या युगात सगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला आहे. मग ते उद्योग क्षेत्र असो वाशेती क्षेत्र. तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योग, व्यवसाय यामध्ये एक वेगळीच किनार निर्माण झाली आहे.

जर आपण शेतीक्षेत्राचा विचार केला तर शेती मध्ये  अलीकडच्या काळात विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करणे देखील शक्‍य झाले आहे. शेतातील विविध कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने होऊ लागले आहेत. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान आणि चक्रीवादळ, अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस आणि हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे? नेमका हवामानाचा अंदाज काय? हे शेतकऱ्यांना अचूक कळावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध प्रकारचे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहेत.

 या लेखात आपण केंद्र शासनाकडून विकसित करण्यात आलेल्या काही मोबाईल ऍप्लिकेशन्स बद्दल माहिती घेऊ.

 शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आहेत मोबाईल ऍप्लिकेशन्स

  • किसान सुविधा ॲप– याच्या मदतीने आपल्याला शेती संबंधित आणि बरीच काही माहिती मिळते. या आजच्या मदतीने आपण हवामानाचा अचूक अंदाज बांधू शकतो. याशिवाय या ॲपच्या मदतीने पिकांचा बाजार भाव, शेती विषयक सल्ला अशा विविध महत्त्वाच्या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती मिळते. तसेच किसान सुविधा ॲप फोर कृषी तज्ञ आणि जाणकारांकडून विविध प्रकारचे पिकांविषयी चे सल्ले दिले जातात.
  • केळी साठी उपयुक्त बनाना प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ॲप- भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि राष्ट्रीय केळी अनुसंधान केंद्राकडून केळीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपचं नाव आहे बनाना प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ॲप हे होय.
  • या ॲपच्या मदतीने केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामान,माती, केळीच्या रोपांचे व्यवस्थापन व त्यांना पाणी कसे द्यायचे याबाबतची माहिती दिली जाते. हे ॲप हिंदी, इंग्रजी आणि तामिळ भाषेत उपलब्ध आहे.
  • मेघदूत मोबाईल ॲप- या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत शेती विषयी  तपशीलवार  माहिती उपलब्ध करून दिली जाते. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना हवामान, पीक आणि पशुपालनाच्या विविध प्रकारच्या समस्यांचे निराकरण केले जाते. हे भारतीय हवामान विभाग,भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय कृषी समिती यांच्याकडून संयुक्तपणे ॲप चालवली जाते. या ॲपवरील  माहिती ही वारंवार अपडेट केली जाते. (माहिती स्त्रोत – इंडिया दर्पण )
English Summary: mobile application to do help farmer in agriculture Published on: 02 September 2021, 12:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters