1. शिक्षण

अखेर उद्या डिसले गुरुजी अमेरिकेत जाणार! अनेक घडामोडींमधून निघाला मार्ग..

गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल टीचर डिसले चर्चेत आहेत. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व डिसले यांच्यामध्ये झालेल्या दुराव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीही नेमली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Disley Guruji will go to America tomorrow

Disley Guruji will go to America tomorrow

गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल टीचर डिसले चर्चेत आहेत. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व डिसले यांच्यामध्ये झालेल्या दुराव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीही नेमली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी आपला शिक्षक या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची भेट घेतली होती.

असे असताना आता ते सोमवारी अमेरिकेला जाणार आहेत. डिसेंबरपर्यंत ते त्याठिकाणी थांबून पीएस अँड एज्युकेशन या विषयाची पहिली सेमीस्टर पूर्ण करणार आहेत. यानंतर पुढे काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचा संपूर्ण खर्च अमेरिका सरकार करणार आहे.

काळजी घ्या! अमेरिकेत मंकीपॉक्सचा कहर, आरोग्य आणीबाणी जाहीर

त्यांना 2020 मध्ये युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर अ‍ॅवॉर्ड दिला होता. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्काराची रक्कम सात कोटींहून अधिक होती. यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. त्यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानही झाला होता.

महत्वाच्या बातम्या;
अधिक उत्पादनातून भरघोस नफा मिळवून देणारी कारल्याची लागवड, शेतकऱ्यांसाठी ठरत आहे फायदेशीर..
वीज बिल येईल आपोआप कमी, घरातील 'ही' उपकरणे करा बंद
...तरच कांदा उत्पादकांना न्याय मिळेल, राजू शेट्टींनी सांगितला बाजारभाव मिळण्याचा सोप्पा मार्ग

English Summary: Finally, Disley Guruji will go to America tomorrow! The path that took place through many events.. Published on: 07 August 2022, 04:16 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters