1. शिक्षण

Maratha Reservation Related News: मराठा आरक्षण निवडसूचीतील 1064 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मिळणार; मुख्यमंत्री शिंदे

मराठा आरक्षणाच्या विषयी बरेच दिवसापासून विविध प्रकारचे पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणासोबतच विविध प्रकारच्या मागण्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मार्फत विविध पदांसाठी घेतल्या गेलेल्या परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवड सूचीत असलेल्या जवळ जवळ 1064 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या बैठकीत सांगितले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
chief minister eknaath shinde

नक्की वाचा:लातूरमध्ये तब्बल लाख लाभार्थी -केवायसीविनाच! मुदत संपत आली तरीही शेतकऱ्यांची -केवायसीकडे पाठ

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की साधारणपणे दोन हजार पेक्षा जास्त उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत नियुक्त केले जाणार आहेत व यापैकी जवळजवळ 419 उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत.तर उर्वरित 1064 उमेदवारांना तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल व या नियुक्त्या ताबडतोब करण्यासंबंधीचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल.

नक्की वाचा:मंत्रालयावर दोन तरुण आत्महत्या करण्यासाठी गेले, राष्ट्रवादीच्या आमदाराने धावत जाऊन वाचवला जीव...

 702 उमेदवारांसाठी मोहीम

 साधारणपणे 2185 उमेदवार मराठा आरक्षण देऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी 419 उमेदवार शासन सेवेत आधीच रुजू झाले आहेत तर 1064 उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.

तसेच उरलेले 702 उमेदवारांना नियुक्ती देण्यात संबंधित विशेष मोहीम देण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नक्की वाचा:Sudhir Mungantivar: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाल्यास मिळणार 'इतकी' मदत

English Summary: 1064 maratha reservation candidate get appoinment in selected post Published on: 26 August 2022, 11:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters