1. पशुधन

Important! पशुपालकांनो अशा पद्धतीने बनवा घरच्या घरी संतुलित पशुखाद्य

पशुपालन यामध्ये जनावरांचे खाद्य यांना खूप महत्त्व आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी होते. तसेच बऱ्याचदा पशुखाद्याची कमतरता भासते. अशावेळी पशुपालकांनी घरगुती पशुखाद्य जर तयार केले तर दूध उत्पादनात घट येण्याची शक्यता कमी होते तसेच जनावरे सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल. या लेखात आपण घरच्या घरी संतुलित पशुखाद्य कसे तयार करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cow feed

cow feed

पशुपालन यामध्ये जनावरांचे खाद्य यांना खूप महत्त्व आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी होते. तसेच बऱ्याचदा पशुखाद्याची कमतरता भासते. अशावेळी पशुपालकांनी घरगुती पशुखाद्य जर तयार केले तर दूध उत्पादनात घट येण्याची शक्यता कमी होते तसेच जनावरे सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल. या लेखात आपण घरच्या घरी संतुलित पशुखाद्य कसे तयार करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

 100 किलो संतुलित पशुखाद्य बनवण्यासाठी लागणारे घटक

 

  • दाणे-मका, ज्वारी, गहू आणि बाजरी यांचे प्रमाण साधारणता 34 किलो पर्यंत असावे.
  • पेंड( भुईमूग व मूग पेंड)- यांचे प्रमाण साधारणतः 29 किलो आवश्यक आहे. यापैकी कोणतेही एक पेंट दाण्यामध्ये मिसळून घ्यावे.
  • टरफले/ भुसा ( गहू, हरभरा, डाळी, भात ) यांचे प्रमाण साधारणता 34 किलो आवश्यक आहे.
  • खनिज मिश्रण दोन किलो आणि मीठ एक किलो द्यावे.
  • वरील सर्व घटक पदार्थ एकत्र मिसळून व भरडा करावा. हा भरडा जनावरांना संतुलित पशुखाद्य म्हणून देऊ शकतो.

 

भरडा मिश्रित संतुलित पशुखाद्य चे प्रमाण

  • गाईसाठी दीड किलो आणि म्हशी साठी दोन किलो प्रति दिवस
  • जगाई दुधावर आहेत अशा गाईंना एक लिटर दुधामागे 40 ग्रॅम
  • दुधावर असणाऱ्या म्हशी साठी एक लिटर दुधामागे 500 ग्रॅम अधिक संतुलित पशुखाद्य द्यावे.
  • गाबन गाय किंवा म्हैस सहा महिन्यापेक्षा जास्त- दीड किलो प्रति दिवस संतुलित पशुखाद्य द्यावे.
  • वासरांना त्यांचे वय आणि वजन यानुसार साधारणत एक ते अडीच किलो प्रति दिवस पशुखाद्य द्यावे.
  • पाणी गरजेनुसार आणि ऋतूनुसार ऐंशी ते शंभर लिटर प्रति जनावर द्यावे.
  • हिरवा चारा-मका, विशिष्ट गवत व पाने 15 ते 20 किलो प्रति जनावर
  • वाळलेला चारा, कडबा किंवा काड- सात ते आठ किलो प्रति जनावर
  • वाळलेला चारा व हिरवा चारा कुट्टी करून द्यावा.

 

शेळ्या-मेंढ्या साठी संतुलित आहार

  • भुईमुगाची ढेप 25 किलो
  • गव्हाचा कोंडा 33 किलो
  • मका, बाजरी व ज्वारी भरडलेली 40 किलो
  • खनिज पदार्थांचे मिश्रण एक किलो
  • मीठ एक किलो
  • वरील सर्व पदार्थ बारीक भरडून एकत्र करून शेळ्यांना संतुलित खाद्य म्हणून देता येतात.
  • दररोज प्रति शेळी अर्धा किलो संतुलित खाद्य द्यावे.

( संदर्भ- ॲग्रोवन )

English Summary: this process use for animal feed made at home useful for animal Published on: 21 October 2021, 01:41 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters