1. पशुधन

Breeding of fighter fish : फायटर माशांचे प्रजनन

रंगीत मासे पाळणे हा लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांचाच छंद बनलेला आहे. दिवसेनदिवस वाढत चालेल्या मस्यालयाच्या छंदामुळे शोभिवंत माश्याच्या व्यवसायाला सुखाचे दिवस आले आहे. जवळपास १००० पेक्षा जास्त शोभिवंत माश्याच्या जाती जगभरात विकल्या जातात. भारतात ९० % शोभिवंत माश्याची निर्यात कोलकात्यातून होते तर ८ % निर्यात मुंबई तुन आणि २% निर्यात चेन्नईतून होते मुंबईतून सर्वात जास्त प्रकारच्या शोभिवंत माश्याची बिजोउत्पादन होते आणि कोलकत्ता येथे सर्वात जास्त शोभिवंत मासे वाढविले जातात.

Breeding of fighter fish

Breeding of fighter fish

रंगीत मासे पाळणे हा लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांचाच छंद बनलेला आहे. दिवसेनदिवस वाढत चालेल्या मस्यालयाच्या छंदामुळे शोभिवंत माश्याच्या व्यवसायाला सुखाचे दिवस आले आहे. जवळपास १००० पेक्षा जास्त शोभिवंत माश्याच्या जाती जगभरात विकल्या जातात. भारतात ९० % शोभिवंत माश्याची निर्यात कोलकात्यातून होते तर ८ % निर्यात मुंबई तुन आणि २% निर्यात चेन्नईतून होते मुंबईतून सर्वात जास्त प्रकारच्या शोभिवंत माश्याची बिजोउत्पादन होते आणि कोलकत्ता येथे सर्वात जास्त शोभिवंत मासे वाढविले जातात.

• माशाचा परिचय

फायटर (बेट्टा) मासा याचे सामान्य नाव Siamese fighting fish (सीएमएसए फायटिंग मासा) आहे आणि शास्त्रीय नाव Betta splendens (बेट्टा स्प्लेंडेन्स) हे आहे. हा मासा प्रामुख्याने आग्नेय आशिया खंडातील मेकाँग नदीच्या खोर्या मध्ये व तसेच कंबोडिया लाओस , म्यानमार , मलेशिया , इंडोनेशिया , थायलंड आणि व्हिएतनाम या ठिकाणी आढळतो. फायटर (बेट्टा) मासा हा त्याच्या वंशाच्या ७३ प्रजातींपैकी एक आहे, आणि पाळीव प्राणी म्हणून तिच्या जागतिक लोकप्रियतेमुळे "बेट्टा" या नावाने ओळखले जाणारे एकमेव प्रजाती आहे.

त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि रंगीबेरंगी आकारविज्ञानामुळे आणि तुलनेने कमी देखभालीमुळे बेट्टा स्प्लेन्डन्स हे जगातील सर्वात लोकप्रिय मत्स्यालयातील मासाची प्रजाती आहे. हा मासा आक्रमक स्वभावाचा असल्या कारणाने तो एकटाच ठेवावा लागतो आणि त्याला बाजारात १०० ते ५०० रुपये प्रति मासा असा भाव आहे आणि त्याला मोट्या प्रमाणात मागणी आहे. हा मासा ४ ते ६.५ से.मी पर्यंत वाढतो आणि ह्याचे आयुष्य ३ ते ४.५ वर्षयाचे असते.

फायटर (बेट्टा) मासा मधील लैंगिक फरक:

फायटर (बेट्टा) माशाचे लिंग ओळखणे साधारणपणे सोपे असते परंतु काहीवेळा काहीकारणांमुळे नर आणि मादी काहीसे समान दिसतात.नर फायटर (बेट्टा) मासा नर सामान्यतः मादींपेक्षा अधिक जास्त रंग प्रदर्शित करतात, परंतु मादी देखील रंगीबेरंगी असू शकतात. नराचे शरीर जास्त लांबलचक असते जे बाजूने किंचित चपटे होत जाते.

नराचे पाठीवरचे आणि पोटाच्या मागचे पंख जास्त लांब व पोटावरील पंख जाड असतात, आणि मादीच्या पंखांच्या लांबीच्या तीन किंवा चार पटीने जास्त मोठे असतात यांच्या मध्ये गिल प्लेट कव्हरच्या खाली एक पडदा असतो, ज्याला ऑप्युलर मेम्ब्रेन म्हणतात. हा पडदा "दाढी" म्हणून दिसतो आणि जेव्हा मासे त्याच्या गिल प्लेट्स भडकवतो तेव्हा ते प्रदर्शित होते. नर माश्या मध्ये दाढी म्हणजेच ऑप्युलर मेम्ब्रेन खूप मोठी असते, इतकी मोठी की अनेकदा ती गिल प्लेट्स भडकत नसतानाही दिसते.

मादी फायटर (बेट्टा) मासा

जेव्हा मादी फायटर (बेट्टा) प्रजननासाठी तयार असतात तेव्हा त्यांच्या शरीरावर उभ्या पट्ट्या दाखवतात, व पोटावरचे आणि गुदद्वाराच्या पंखांमध्‍ये "अंड्याची जागा" दर्शवतात. हे खरं तर ओव्हिपोझिटर आहे, ज्याचा वापर अंडी घालण्यासाठी केला जातो. तर नर तसे दाखवत नाहीत नर बेटापेक्षा मादी थोड्या लहान आणि अधिक रुंद शरीराच्या असतात

प्रजनन वर्तणूक:

जेव्हा नर बेटा मासा प्रजननासाठी तयार होतो, तेव्हा तो बबल घरटे तयार करतो. हे बुडबुडे घरटे टाकीच्या अगदी वर तरंगतील आणि लहान बुडबुड्यांसारखे दिसतात. एकदा बनवल्यानंतर, नर बेटा मासे बहुतेक वेळा घरट्याखाली राहतात कारण ते मादीच्या सोबतीची वाट पाहतात.

भारतातील राज्यनिहाय माशांची यादी व त्यांचे महत्व

प्रजननासाठी तयार असलेल्या माशांची (ब्रूडस्टॉकची) तयारी:

प्रजननासाठी तयार असलेल्या माशांचे (ब्रूडस्टॉक) व्यवस्थापन मॅनेजमेंटमध्ये ब्रूड स्टॉकच्या सभोवतालच्या पर्यावरणीय घटकांमध्ये फेरफार करणे समाविष्ट आहे. जेणेकरून जास्तीत जास्त जगणे, जननग्रंथीचा (गोनाडल) विकास वाढवणे आणि प्रजननक्षमता वाढवणे. उत्पादन केलेल्या अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि परिपक्वता आणि अंडी फुटण्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

सामाणतः आपण ह्या माश्यासाठी लागणारे जिवंत ख्याद्या उपलब्ध केले पाहिजे जिवंत ख्याद्या मध्ये प्रामुख्याने डासांच्या अळ्या ब्लडवर्म्स टूबीफेक्स वर्म्स डॅफनिया दिले पाहिजे पाण्याचे तापमान २५ ते २६ डिग्री सेलसियस पर्यंत ठेवले पाहिजे. टाकी मध्ये जिवंत झाडे लावावीत व काही पाण्यावर तरंगणारे झाडे लावावीत त्यामुळे नर माश्याला घरटे करायला सोपे जाते.

बदामाच्या पानाचे फायदे :
टाकी मध्ये एक बदामाचे कुजलेल्या अवस्थेत असणारे पान टाकावेत. बदामाचे पान टाकण्या अगोदर पाणी उकळून घ्यावे मग त्यामध्ये बदामाचे कुजलेल्या अवस्थेत असलेले पान टाकावे आणि पाणी थंड झाल्यावर ते प्रजनन टाकी मध्ये टाकावे ह्याचे फायदे खाली दिल्या प्रमाणे:

पीएच पातळी कमी करते
 काळ्या पाण्यातील माशांना प्रजननासाठी गडद वातावरण निर्माण करते बेट्टा मासा हा सुद्धा नदीच्या किनारी कमी उंचीच्या साचलेल्या काळ्या पाण्यात राहतो
 बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत
 प्रजनन करण्यास मदत करते
 लहान मासे अन्न स्रोत म्हणून ह्या पानाला खातात
 ह्या पानापासून पिलांना खावयास लागणारे सुष्मजीव तयार होतात

• प्रजनन टाकी कशी असावी:
प्रजनन टाकी हि किमान १० ते १५ लिटर ची पात्रता असलेले असावी व टाकी मध्ये नर आणि मादी ला फिरणास मोकळी जागा असणे आवश्यक आहे. त्या टाकी मध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर जिवंत झाडे असावीत जर जिवंत झाडे नसतील तर थर्मोकॉल चा तुकडा ठेवावा टाकी मधील पाणी ह्याचा सामू ६.५ ते ८ या मध्ये असावा.

• बेट्टा माश्याचे प्रजनन
सर्व प्रथम प्रजनन टाकी नीट तयार करावी टाकी मध्ये हीटर लावावा व तापमान २५ ते २७ डिग्री सेलसियस ठेवावे आणि नर मासा त्या मध्ये सोडून द्यावा त्याला दिवसातून दोन ते तीन वेळा जिवंत खाद्य द्यावे त्यानंतर नर मासा एक ५ ते १० दिवसात बुडबुड्यांचे घरटे तयार करतो व तेव्हा मादी मासा त्यामध्ये सोडावा व थोडा वेळ त्यांची वर्तवणूक पाहावी कारण काही वेळा नर मासा खूप आक्रमक होतो आणि मादी ला दगा होण्याची शक्यता असते.

असे झाल्यास त्वरित मादी ला वेगळे करावे जर त्या दोघांची वर्तवणूक चांगली असेल तर त्या थोडा वेळ एकट्या मध्ये निवांत सोडावे पण आपण अधून मधून त्याच्यावर लक्ष जरूर ठेवले पाहिजे. त्यापुढील १ ते २ दिवसात त्यांचे प्रजनन होते बेट्टा मासा एका वेळेस १०० ते ३०० अंडी देऊ शकतो आणि आपल्याला त्यांची अंडी बुडबुड्यात दिसतात लगेच मादीला त्या टाकीतून वेगळे केले पाहिजे व नर माश्याला अंड्यांन सोबत ठेवावे. कारण पुढील २ ते ३ दिवस नर मासा त्या अंड्यांची काळजी घेतो ह्या काळात त्याला दिवसातून २ वेळा साधे सुके खाद्य दिले पाहिजे.

Disease Fish : माशांमध्ये रोग उद्भवू नये यासाठी घ्यावयाची काळजी..!

• पिल्लांची घ्यावयाची काळजी:

अंडी दिल्याच्या २४ ते ४८ तासात त्या मधून पिल्ले बाहेर येतात त्यानंतर आता नर माश्याला बाहेर काढावे आपल्याला पिल्ले चक्राकार फिरताना दिसतात त्याच्या पोटाला बलक पिशवी असते आणि ते पुढील २ ते ३ दिवसात संपते तेव्हा त्यांना जिवंत इन्फोसोरिया हे ख्याद्य द्यावे. इन्फोसोरिया हा पाहिले १५ दिवस द्यावा त्यानंतर पुढचे १५ दिवस नुकतेच जन्मलेले अर्टिमिया द्यावे जेव्हा पिल्ले एका महिन्याची होतात तेव्हा त्यांना जिवंत किडे (मायक्रोवोर्म) हे ख्याद्य द्यावे.

त्यानंतर जेव्हा पिल्ले ४५ दिवसाची होतात तेव्हा त्यांना जिवंत किडे (टूबीफेक्स) हे बारीक कापून टाकावे. जेव्हा पिल्ले ६५ ते ७० दिवसाची होतात तेव्हा त्यामधले नर मासे वेगळे करावे. कारण लहानपणा पासूनच हे आक्रमक सभावाचे असतात आणि जेव्हा पिल्ले ८० ते ९० दिवसाची होतात तेव्हा ते प्रौढांसारखे दिसतात.

ह्या पिल्लाना बाजारात ३५ ते ६५ रुपये प्रति मासा असा भाव मिळतो तुम्ही हे मासे तुमच्या जवळच्या शोभिवंत माशांच्या दुकानात विकू शकता जर तुम्ही एका वेळेस किमान ५ जोड्या प्रजाननासाठी लावून यशस्वी प्रजनन केले तर तुम्हाला ९० दिवसात २२ ते २७ हजारांचा फायदा मिळू शकतो व हि क्रिया करण्यासाठी जास्त वेळ सुद्धा द्यावा लागत नाही तुम्ही शिक्षण करत असताना किंवा नोकरी करताना हा व्यवसाय करू शकता.


श्रीतेज सिद्धार्थ यादव, विद्यार्थी, मो. न. ८८०६३३३७६०.
जयंता सु. टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता),
जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मो. न. ८७९३४७२९९४.
मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र.

English Summary: Breeding of fighter fish Published on: 08 January 2023, 04:30 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters