1. कृषीपीडिया

Crop Tips: कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवायचे तर 'या' छोट्या टिप्स ठरू शकतात उपयोगी, वाचा माहिती

शेतकरी बंधू पिकांच्या लागवडीनंतर पिकांचे भरघोस उत्पादन कमी खर्चात येण्यासाठी खूप प्रकारची काळजी व व्यवस्थापन त्या पद्धतीने करतात. यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीच्या उपाययोजना, पाण्याचे व्यवस्थापन व त्यासोबतच काढणीपर्यंतची सगळी कामे व्यवस्थित पद्धतीने करण्याकडे सर्वांचा कल असतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
crop mangement tips

crop mangement tips

शेतकरी बंधू पिकांच्या लागवडीनंतर पिकांचे भरघोस उत्पादन कमी खर्चात येण्यासाठी खूप प्रकारची काळजी व व्यवस्थापन त्या पद्धतीने करतात. यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीच्या उपाययोजना, पाण्याचे व्यवस्थापन व त्यासोबतच काढणीपर्यंतची सगळी कामे व्यवस्थित पद्धतीने करण्याकडे सर्वांचा कल असतो.

परंतु बऱ्याचदा  पीक व्यवस्थापनावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो व त्या मानाने हातात येणाऱ्या आर्थिक उत्पन्न कमी मिळते व आर्थिक फटका बसतो.

या सगळ्या व्यवस्थापनाच्या बाबीं व्यतिरिक्त अजून काही  छोट्या बाबींची जर काळजी घेतली तर पिकांच्या व्यवस्थापनात खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते व साहजिकच त्या दृष्टिकोनातून नफा वाढण्यास मदत देखील होईल. त्यामुळे अशा काही छोट्या परंतु महत्वपूर्ण बाबींची माहिती घेऊ.

नक्की वाचा:इफको नॅनो युरिया (द्रव) खताबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

 'या' गोष्टींवर सर्वप्रथम द्यावे लक्ष

1- दर्जेदार बियाण्याची निवड- बरेचदा आपण बाजारातून जेव्हा बियाणे विकत घेतो त्यावेळेस ते प्रमाणित नसलेले बियाणे बऱ्याचदा खरेदी केले जाते.

याचा फटका उत्पादन कमी होण्यावर होतो. परंतु लागणारा खर्च तेवढाच लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी  प्रमाणित बियाणे खरेदी करण्यावर भर द्यावा. अशा बियाण्यांचे उत्पादन क्षमता इतर बियाणे पेक्षा जास्त असते.

2- आवश्‍यकतेनुसार खतांचा वापर- अजूनही बरेच शेतकरी बंधूंना खतांचा वापर किती करावा ही गोष्ट पुरेशी समजत नसल्यामुळे बऱ्याचदा खतांचा वापर वाढतो व सहाजिकच उत्पादन खर्च देखील वाढतो.

परंतु याबाबतीत जर आपण तज्ञांच्या मताचा विचार केला तर पिकाला दिल्या जाणाऱ्या खतांपैकी केवळ 38 टक्के खत रोपांचे पोषण करते आणि उरलेले खत सिंचना दरम्यान पाण्यात वाहून जाते व काही जमिनीत असलेल्या ओलाव्या  अभावी वातावरणात शोषले जाते.

त्यामुळे खतांचा वापर करताना तो माती परीक्षण करूनच करावा. म्हणजे नको तेवढ्या खतांचा वापर टाळावा. इतर खतांपेक्षा जर शेनखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचा वापर केला तर जमिनीची सुपीकता देखील वाढते व उत्पादनात देखील चांगली वाढ होते.

नक्की वाचा:Vegetable crop: थंडी शेतकऱ्यांच्या फायद्याची, थंडीत 'ही' पिके घेऊन महिन्यात कमवा बक्कळ नफा

3- कीड रोगावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे- आपल्याला माहित आहेच कि पिकांपासून चांगले उत्पादन हवे असेल तर कीड आणि रोगांपासून संरक्षण करणे खूप गरजेचे आहे त्यासाठी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक असते.

परंतु यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त कीटकनाशकांचे प्रमाण नसावे. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात झाले तर पिकांची नुकसान जास्त होते. या उलट जर सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी केली तर फायदा मिळू शकतो.

4- काढणीनंतरचे व्यवस्थापन- बऱ्याचदा पिकांची कापणी यंत्राच्या माध्यमातून केली जाते. अशा परिस्थितीत शेतात पीक काढणीनंतर उरलेले औषध जतन करणे आवश्यक असून शेतकरी लवकर स्वच्छ करण्यासाठी असे अवशेष जाळून टाकतात त्यामुळे वायू प्रदूषण होते.

परंतु या दृष्टीकोनातून शास्त्रज्ञ म्हणतात की, अशा पिकांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी काढणीनंतर जे काही उरले असेल ते नांगरणी करताना शेतातील मातीत मिसळावे किंवा शेताबाहेर काढून खत तयार करण्यासाठी त्याचा वापर करावा. जेणेकरून त्या खताचा वापर आपल्याला पिकांसाठी करता येतो.

नक्की वाचा:Silk Farming! आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी रेशीम शेती आहे फायदेशीर,मिळतो योजनेचा लाभ

English Summary: this is an important small tips for growth produvction of crop Published on: 25 September 2022, 10:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters