1. कृषीपीडिया

पीएसबी जिवाणचे पीक उत्पादनवाढी मधील महत्त्व आणि कार्य

शेतामध्ये पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा उपयोग करतात.पीक उत्पादन वाढीमध्ये रासायनिक खतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व जैविक खतांचे सुद्धा आहे. या लेखात आपण पीएसबी या जिवाणू खताविषयी माहिती जाणून घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
psb fertilizer

psb fertilizer

शेतामध्ये पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा उपयोग करतात.पीक उत्पादन वाढीमध्ये रासायनिक खतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व जैविक खतांचे सुद्धा आहे. या लेखात आपण पीएसबी  या जिवाणू खताविषयी माहिती जाणून घेऊ.

नेमके पीएसबी काय आहे?

 प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम रीतीने स्फुरद विरघळणारे जिवाणू ची वाढ करून योग्य माध्यमात मिसळून तयार केला जाणारा खताला पीएसबी म्हणजे स्फुरद विरघळणारे जिवाणू खत असे म्हणतात.

अद्रव्य स्फुरदाचे विघटन करण्यासाठी कोणते सूक्ष्मजीव कार्य करतात?

 जमिनीमधील स्फुरद विरघळवून पिकांना मिळवून देण्यासाठी बॅसिलसमेघ्याथेरीयमसारखे अनु जीव,अस्परजिलससारख्या बुरशी,स्ट्रेप्टोमायसीनसारख्या अॅक्टीनोमाइसिट्स व व्ही मायकोरायझा यासारखे व इतर काही सूक्ष्मजीव कार्य करीत असतात.

विविध पिकांमध्ये पीएसबी जिवाणू खत वापरण्याची पद्धत

 एसबीआय जिवाणू खताचा वापर बीज प्रक्रियेद्वारे,शेणखतामध्ये एकत्र मिसळून जमिनीत किंवा योग्य प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध असणाऱ्या जमिनीत द्रवरूप पीएसबी या जिवाणू खताचा वापर फळ, भाजीपाला व हळदीसारख्या पिकात ठिबक सिंचनाद्वारे तसेच रोपांच्या मुळांवर अंतरक्षीकरण पद्धतीने गरजेनुसार शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाऊ शकतो.

पीएसबी जिवाणू खताचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?

  • पीएसबी किंवा इतर कोणतीही जिवाणू संवर्धक घरी आल्यानंतर त्याचा वापर शक्य तितक्या लवकर करावा जिवाणू संवर्धके थंड आणि कोरड्या जागी साठवावा.
  • पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करताना रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायचे असेल तर रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया प्रथम करावी व नंतर पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

 रायझोबियम या जिवाणूसंवर्धक का बरोबर पीएसबी या जिवाणू खताचे मिश्रण करून बीजप्रक्रिया करता येते.

  • रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केल्यास पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया चे प्रमाण शिफारशीपेक्षा दीडपट ठेवावे.
  • कोणत्याही रासायनिक खतासोबत पीएसबी किंवा इतर जिवाणूसंवर्धन मिसळू नये.
  • पीएसबी किवा इतर जिवाणूसंवर्धक घरी आणल्यानंतर शक्य तितक्या लवकर वापरावीत. तसेच बीज प्रक्रिया केल्यानंतर सावलीत बियाणे  वाळवून  ताबडतोब पेरणी करावी.

गहू, हरभरा सारख्या महत्वाच्या रब्बी पिकात पीएसबी जिवाणू खताचा वापर बीजप्रक्रिया द्वारे कसा करावा?

  • हरभरा व इतर निर्देशित पिकात अडीचशे ग्रॅम पीएसबी प्रति दहा किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी
  • द्रवरूप स्वरूपात पीएसबीउपलब्ध असल्यास 250 मिली पीएसबी प्रति 30 किलो हरभरा बियाण्यास म्हणजेच आठ ते दहा मिली द्रवरूप पीएसबी प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
  • बीजप्रक्रिया करताना 30 किलो हरभरा पातळ ताडपत्रीवर पसरवून त्यावर 250 मिली पीएसबी या द्रवरूप जिवाणू खताचा शिडकावा द्यावा आणि आवश्यक वाटल्यास तोडायच्या गुळाच्या पाण्याचा शिडकावा द्यावा.
  • बियाणे जास्त ओले करू नये हाताने बियाण्याला चोळू नये. सावलीत 15 ते 20 मिनिटे वाळवावे व नंतर पेरून घालावे
  • फार पूर्वी बीजप्रक्रिया करून बियाणे ठेवू नये व बीज प्रक्रिया केल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणीकरावी.
English Summary: the important role psb becteria in crop yeilding and more production Published on: 03 February 2022, 01:57 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters