1. कृषीपीडिया

कृषी निविष्ठा खरेदी करताना अशी घ्या काळजी.

आज आपण शेतीसाठी लागणारी कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक व खते यांच्या बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कृषी निविष्ठा खरेदी करताना अशी घ्या काळजी.

कृषी निविष्ठा खरेदी करताना अशी घ्या काळजी.

सगळीकडे सोशल मीडिया माध्यम आहे आणि त्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याचा अद्रक प्लॉट किंवा इतर पिकाचा प्लॉट चांगला दिसला कि फोटो काढून ग्रुपवर टाकले जातात आणि आमच्या प्रॉडक्टमुळे हा प्लॉट असा झाला आहे. असे अनेक कंपन्या सांगतात व आपली दिशाभूल करतात. वास्तविक पाहता त्या प्लॉटमध्ये त्या शेतकऱ्याची खूप मेहनत असते लागवडीचा कालावधी आणि अनेक गोष्टी अवलंबून असतात.

जर फक्त एका प्रॉडक्टमुळे उत्पादन मिळाले असते तर ते प्रॉडक्ट वापरलेले प्रत्येक प्लॉट एक सारखे असायला हवे होते पण असे होत नाही. त्यामुळे कुठेही कोणतेही फोटो पाहून कोणत्याही एका प्रॉडक्टला शेतकऱ्यांनी बळी पडू नये आपल्या मातीचा प्रकार आपल्या खताचे नियोजन व एकूण पीक व्यवस्थापन आणि त्या पिकाचे आपल्याकडे असलेले सखोल ज्ञान यावर पिकाचे उत्पादन अवलंबून असते.

निश्चितच आपल्याला इतर निविष्ठा देखील खरेदी कराव्या लागतात परंतु त्या उच्च दर्जाच्या असणे गरजेचे असते हे देखील आपण लक्षात असू द्यावे. अनेक कंपन्या असा दावा करतात की अद्रकला आलेला पिळा (कोम वाकडातिकडा होणे) आमच्या औषधाने नीट होतो. अशा भूलथापांना बळी पडू नये. पिळा ही अद्रक पिकातील नदुरुस्त होणारी विकृती आहे.तसेच कंदकुज या रोगासाठी आतापर्यंत हमखास असे औषध बाजारात उपलब्ध नाही.

त्यावर तात्पुरता उपाय म्हणून बुरशीनाशके वापरता येतात. तापमान आणि पाऊस कमी झाला की ते आपोआप थांबते. आपल्या अद्रक पिकात दररोज एक चक्कर मारला गेलाच पाहिजे त्यामुळे पिकाची भाषा आपल्याला समजायला लागते आणि त्याला होणारी कमतरता ओळखणे सोपे जाते.तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी शेती विषयी भरपूर वाचन देखील केले पाहिजे.आपल्या अद्रक पिकात काही समस्या असल्यास आपण जरूर कॉल करू शकता. फक्त आपले म्हणणे थोडक्यात असावे. 

 

 लक्ष्मण काळे खुलताबाद

मो.9890250890

English Summary: Take care when buying agricultural inputs. Published on: 14 May 2022, 11:43 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters