भारतात दिवसेंदिवस शेती क्षेत्रात मोठा बदल घडत आहे, याच पार्श्वभूमीवर भारतात सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना पीक पद्धतीत मोठा बदल घडवून आणण्याचे आवाहन करीत आहेत, तसेच शेतकरी बांधवांना आता पीक पद्धतीत बदल करण्याची गरज भासत असल्याने मोठ्या प्रमाणात देशात नगदी तसेच औषधी पिकांची लागवड बघायला मिळत आहे. पारंपारिक पीक पद्धतीत मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च करावा लागतो, आणि त्यापासून प्राप्त होणारे उत्पन्न हे खूप नगण्य असते. त्यामुळे पारंपरिक पीक पद्धतीत उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांची सांगड बसत नसल्याने शेतकरी बांधव आता नगदी पिकांकडे विशेषता औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळले आहेत.
आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी काही ठराविक अश्या औषधी वनस्पतींची माहिती घेऊन आलो आहोत. या औषधी वनस्पतींची लागवड करून शेतकरी बांधव चांगला मोठा नफा अर्जित करू शकतात. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
अश्वगंधाची शेती
अश्वगंधा एक झुडूप औषधी वनस्पती आहे. या औषधी वनस्पतीची फळे, बिया आणि साल अनेक औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात. याच्या मुळाला घोड्यासारखा वास येतो म्हणून ह्या वनस्पतीला अश्वगंधा असं संबोधित असतील असे सांगितले जाते. अश्वगंधा मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने याची मागणी बारामही बनलेली असते. त्यामुळे याची लागवड शेतकरी बांधवांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते.
लेमनग्रासची शेती
या वनस्पतीला सामान्य भाषेत लेमन ग्रास असंच म्हणतात. मराठीत अनेक लोक याला गवती चहा म्हणून संबोधित असतात. औषधी वनस्पती ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे जनावरांना खायला आवडत नाही, त्यामुळे या पिकाला जनावरांपासून कुठलाच धोका नाही. या वनस्पतीच्या पुनर्रोपणानंतर, फक्त एकदाच तण काढणे आवश्यक आहे. या वनस्पतीसाठी पाणी देखील नगण्य लागते. याला वर्षातून 4 ते 5 वेळा पाणी द्यावे लागते. हे पीक एकदा लावले की, या पिकातून 4 ते 5 वर्षे सलग नफा प्राप्त केला जाऊ शकतो.
अकरकराची शेती
ही एक अति महत्त्वाची औषधी वनस्पती आहे, या वनस्पतीची बारामही मागणी बघायला मिळते. आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी अकरकराच्या देठाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या वनस्पतीच्या बिया आणि देठाची मागणी नेहमीच असते. एवढेच नाही याचे लाकूड देखील बाजारात मोठे महागडे विकले जाते, एक किलो लाकूड बाजारात 300 ते 400 रुपयांना विकले जाते. त्यामुळे या वनस्पतीची लागवड करून शेतकरी बांधव नक्कीच चांगला मोठा नफा अर्जित करू शकतात.
Share your comments