1. कृषीपीडिया

सोयाबीन : व्यवस्थापन ४५-५५ दिवसाचे, जास्त झालेला पाऊस, वाढ कमी, फुल गळ व आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या महत्वाच्या बाबी

सोयाबीन लागवड होऊन जवळपास ४५ ते ५५ दिवस पूर्ण होत आहेत,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सोयाबीन : व्यवस्थापन ४५-५५ दिवसाचे, जास्त झालेला पाऊस, वाढ कमी, फुल गळ व आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या महत्वाच्या बाबी

सोयाबीन : व्यवस्थापन ४५-५५ दिवसाचे, जास्त झालेला पाऊस, वाढ कमी, फुल गळ व आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या महत्वाच्या बाबी

सोयाबीन लागवड होऊन जवळपास ४५ ते ५५ दिवस पूर्ण होत आहेत, काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे त्याच सोयाबीन पीकाला सततच्या पावसामुळे अन्नद्रव्ये कमतरता जाणवत आहे व पिकाची वाढ कमी आहे,गेली ३५-४० दिवस म्हणजे ५-७ जुलै पासून सारखा पाऊस पडतो आहे,काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, काही ठिकाणी अजून पीक चांगली आहेत, अशा परिस्थितीत जमिनीत पाणी साचून राहिल्यास कापूस तसेच सोयाबीन पीक वाढीवर परिणाम होतो व

अपेक्षीत वाढ आपल्याला दिसून येत नाही,We don't see the expected growth.सुरवातीच्या काळात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत शेतकरी मित्रांना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, अशा परिस्थितमध्ये पिकाचे नुकसान जास्त प्रमाणात होत असते कारण पीक पेरून १० दिवस झाले असताना जास्त प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल यांची वाढ कमी होते व जास्त वेळ पाणी थांबून राहिले तर मूळ कुज तसेच इतर रोगांचे प्रमाण वाढत, अन्नद्रव्ये कमतरता जाणवते व सोयाबीन पिवळे पडते.

जास्त पाऊस झाला असेल आणि सोयाबीन पिवळे पडले असेल तर अमोनियम सल्फेट द्यावे, तसेच झिंक आणि फेरस सल्फेट द्यावे फवारणी करताना Ammonium sulphate, Zinc sulphate, फेरस सल्फेट आणि अमिनो एसिड, Cytokinine based टॉनिक चा वापर करावा तसेच अमिनो अँसिड यांचा वापर करावा परंतु आता सोयाबीन पिकाला फुले लागत आहेत व वाढ कमी आहे अशा ठिकाणी खत देणे शक्य नाही त्यामुळे फवारणी द्वारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे .जर सोयाबीन पिक हे जास्त प्रमाणात पाऊस झाला

असल्यामुळे स्ट्रेस मद्ये असेल तर Ortho silicic acid २५-३० ml प्रती पंप तसेच ०;५२:३४ किंवा १४:४०:१३ १०० gm याप्रमाणे फवारणी करू शकताअशा परिस्थितीत जास्त प्रमाणात पाऊस पडला असल्याने मूलद्रव्ये वाहून जातात तसेच सुक्ष अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे, अती पाऊस झाल्याने आपण दिलेले खते योग्य प्रमाणात पिकाला उपलब्ध होणार नाहीत किंवा झाली नाहीत, त्यामुळे आपलयाला आता योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, पीक ३०-३५ दिवसांचे असताना एकरी २०-२५ किलो २४:२४:० किंवा DAP किंवा

१०:२६:२६ सोबत झिंक सल्फेट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिक्स करुन द्यावे ( परंतु आता पीक ४५ दिवसांचे समोर गेले आहे त्यामुळे खत देणे योग्य नाही त्याचा आता फायदा ही होणार नाही) ज्यांची सोयाबीन मागची आहे ३०-३५ दिवसांची आहे त्याने हा उपाय करावाजास्तीचा पाऊस झाला असेल, तसेच चुनखडी जमीन असेल तर एकरी १५-२० किलो अमोनिअम सल्फेट टाकावे.तसेच अशा परिस्थितीत फवारणी करताना @

Ammonium sulphate ३० gm # ०:५२:३४ किंवा १३:४०:१३ किंवा १२:६१:०० १०० gm # Zinc oxide २५ मिली किंवा झिंक / फेरस २५ gm किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये २५ gm तसेच अमिनो एसिड/ Cytokinine असलेले टॉनिक आपण वापरू शकता. आणि ortho silicic acid चा सुध्दा आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनी आपले सोयाबीन वाढ कमी आहे म्हणून वाढ व्हावी यासाठी खूप खर्च करू नये कारण त्याचे कारण हे जास्त झालेला पाऊस आहे व सतत चे ढगाळ वातावरण व जमिनीमध्ये असलेला ओलावा यामुळे वाढ कमी च राहणार त्यामुळे त्यावर जास्त खर्च करू नये

बऱ्याच ठिकाणी Yellow Mosaic Virus दिसून येत आहे, पिवळे patches असलेले पाने तसेच कोकडलेली पाने व रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो तेव्हा त्या ठिकाणी अशी झाडे उपटून बाहेर टाका व एकरी १५-२० चिकट सापळे लावावे, तसेच रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशक फवारणी करावी,जर खूपच जास्त प्रमाणात व्हायरस असेल तर @ Copper Oxychloride ३० gm प्रती पंप व सोबत streptomycin sulfate २ gm किंवा ( antibiotic / Virucide ) यांचा वापर करावा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे yellow mosaic virus हा सोयाबीन ची वाढ जास्त प्रमाणात झालेली असेल, सोयाबीन दाट असेल किंवा पाने कवळी व लसलशित असतील तर अशा ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून येतो, तसेच सततचा पाऊस व सूर्यप्रकाश कमतरता असल्यामुळे सुध्दा सोयाबीन ची नवीन पाने पिवळी पडू शकतात, कारण प्रकाश संश्लेषन क्रियेवर परिणाम होतो व त्यामुळे Chlorophyl ची कमतरता जाणवते व त्याच बरोबर अन्नद्रव्ये uptake होत नाही व आपले पीक पिवळे पडते, वाढ कमी होते व आपल्याला वाटले yellow mosaic virus आहे, असा गैरसमज करून घेऊ नका व्यवस्थित निरीक्षण करा व व्यवस्थापन करा. 

बरेच शेतकरी मित्रांचे सोयाबीन पीक चांगली वाढ झालेले आहे, त्यामुळे शेतकरी वाढ रोखण्यासाठी Pachlobutarazole ( Taboli / Cultar ) किंवा Mapiquate Chloride ( चमत्कार ) लिहोसिन यांचा वापर करतात किंवा केला आहे अशा वेळी हे वाढ रोधक आपण वापरल्याने पिकाचे Biochemical Process बदलतात अशा परिस्थितीत, पिकातील Gebrelic acid/ Auxin/ Cytokinine चे प्रमाण कमी होते व ABA व Ethelyne चे प्रमाण वाढते त्यामुळे, प्रकाश संश्लेषन कमी होते व अशा वेळी कवळी पाने जरगट होतात पिवळी पडतात व खरबडी दिसू

लागतात त्यावेळी हा परिणाम वाढ रोधकाचा आहे, ( तो yellow mosaic virus नाही हे लक्षात घ्यावे) व त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, वाढ रोधाकाचा वापर जर खरचं आवश्यकता असेल तरच करावा व योग्य सल्ला घेऊनच करावा त्याचा डोस जर चुकला तर पिकाला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सुध्दा होऊ शकते.सद्य परिस्थितीत चक्री भुंगा व आळी दोन्ही चे नियोजन करणे सुध्दा खूप महत्वाचे आहे @ कोणतेही कीटक नाशक वापरले तरी आपल्याला १०० टक्के नियत्रंण मिळणार नाही कारण चक्री भुंगा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला २ फवारणी मद्ये कमी दिवस

ठेवून नियोजन करणे आवश्यक आहे, जास्त महागडी औषधे वापरून फायदा होईल असे पण नाही, साधी कीटक नाशके सुध्दा चांगले नियंत्रण देतात @ निबोळी अर्क सुध्दा आपण वापर करू शकता@ तसेच चक्री भुंगा कीटकाने कट केलेला शेंडा किंवा पान दिसून आल्यास त्या कापाच्या खालून कट करून ते नष्ट करावे यामुळे नुकासन होणार नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही कीटकनाशक फवारणी करताना २ पेक्षा जास्त active ingredient एकत्र करून फवारणी करू नका @ कोणतेही एकच

कीटकनाशक फवारणी साठी वापरावे # जास्तीचे रसायने एकत्र करून फवारणी केल्यास आपल्याला चांगला रिझल्ट तर मिळत नाहीच वरून आपला खर्च वाढतो हे लक्षात घ्यावे,@ कीटक नाशके Indoxacarb + Novaluron किंवाEmamectin benzoate + Novaluron किंवाFlubendamide + Deltamethrin किंवाChlorantraniprole + Lambdacyhlothrin किंवाEmamectin benzoate + profenophos किंवाProfenophos + Cypermethrin कोणतेही एकच @ बुरशीनाशके 

Hexacanazole किंवाPropicanazole किंवाTebucanzole किंवाTebucanzole + Sulfur किंवाTebucanzole + Azoxystribin किंवाThaiphanate methyle किंवाAzoxystribin + Difenocanazole किंवाPyrachlostrobin यापैकी एक गरजेनुसार व पिकाच्या परिस्थितीनुसार वापर करावा फुल गळ होत असेल तर १३:४०:१३ किंवा ०:५२:३३ सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि Gebrelic acid चा वापर करावा.वाढ खूपच जास्त असेल आणि सोयाबीन वेलावली असेल तरच वाढ रोधाकचा वापर करावा 

फुल गळ होत असेल तर १३:४०:१३ किंवा ०:५२:३३ सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि Gebrelic acid चा वापर करावा.वाढ खूपच जास्त असेल आणि सोयाबीन वेलावली असेल तरच वाढ रोधाकचा वापर करावा पीक स्ट्रेस मद्ये असेल असे वाटत असेल तर Ortho silicic acid आणि अमिनो एसिड चा वापर करावा याप्रमाणे आत्ताच्या अती पाऊस झालेल्या परिस्थितीत व्यवस्थापन करावे कृपया जास्त प्रमाणात खर्च वाढणार नाही याकडे सुध्दा लक्ष द्यावे.

फवारणी करताना तऔषधांची मिश्रण क्षमता ( compitabilty) बघून च वापर करा, एक पेक्षा जास्त कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र करू नका, कारण त्याचा परिणाम कमी होतो व त्याचा उलट परिणाम सुध्दा होऊ शकतो.शेतकरी उपयुक्त माहिती अनुभव व शास्त्र आधारावर लिहिली आहे संदर्भ म्हणून वापर करू नये.

 

Dr Anant Ingle 

Ph.D. Genentics and Plant Breeding MPKV Rahuri

संचालक: विदर्भ शेती विकास संस्था चिखली बुलडाणा

English Summary: Soybean : Management 45-55 days, Important matters to be done in case of excessive rainfall, low growth, flower drop and emergency situations. Published on: 18 August 2022, 02:37 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters