1. कृषीपीडिया

News: हळद पिकाला बसत आहे कंदमाशीचा मोठा फटका, अशा पद्धतीने करा व्यवस्थापन तरच होईल फायदा

जर सध्या आपण परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांना चहू बाजूकडून संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे नुकसान तर होतच आहे परंतु जे काही पिके नैसर्गिक संकटातून वाचले आहेत त्यांना विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
insect management in turmuric crop

insect management in turmuric crop

जर सध्या आपण परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांना चहू बाजूकडून संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे नुकसान तर होतच आहे परंतु जे काही पिके नैसर्गिक संकटातून वाचले आहेत त्यांना विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे.

हीच बाब हळद पिकाच्या बाबतीत दिसून येत असून हळद पिकावर विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग तसेच करपा, कंदमाशी इत्यादीचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान होत आहे.

ही परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात दिसत असून शेतकऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले आहे.

नक्की वाचा:शेतकरी बांधवांनी वाढणार डोकेदुखी, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा, वाचा सविस्तर

 अशी ओळखायची कंदमाशी

यावेळी  बोलताना त्यांनी सांगितले की, हळद पिकावर नुकसान करणारी कंदमाशी ही प्रमुख कीड असून या माशीच्या प्रौढ सारखा परंतु मुंगळाप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो व या प्रौढ माशीचे पाय तिच्या शरीरापेक्षा लांब असतात व पुढील टोक पांढऱ्या रंगाचे असते. तसेच दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असतात व पंखांवर राखाडी रंगाचे दोन ठीपके असतात.

ज्या ठिकाणी जमिनीत हळदीचे कंद बाहेर आलेले असतात त्या ठिकाणी प्रौढ माशी अंडी देते व अशा अंड्यांमधून भरपूर अळ्या बाहेर पडून त्या गड्ड्यात शिरतात व त्यावर उपजीविका करतात. अश्या प्रादुर्भाव झालेल्या गड्ड्यामध्ये नंतर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. शेतकरी बंधूंनी यामध्ये वेळीच लक्ष दिले नाही तर कमीत कमी 45 ते 50 टक्के नुकसान होण्याची शक्यता असते.

नक्की वाचा:केळी उत्पादकांनो सावधान! केळीवर घसा चोकिंग रोगाचा पादुर्भाव; करा उपाय अन्यथा मोठे नुकसान

 अशा पद्धतीने करा व्यवस्थापन

1- जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान 15 दिवसांच्या अंतराने क्विनोलफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30% 10 मिली प्रती 10 लिटर पाणी व चांगले स्टिकर मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

2- जमिनीच्या बाहेर जो काही कंद आलेले असतात त्यावर माती व्यवस्थित पसरवून ते कंद झाकून घ्यावेत व वेळेवर व्यवस्थित भरणी करून घ्यावी.

3- त्यासोबतच क्विनॉलफॉस  पन्नास टक्के 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात ड्रेचिंग करावी. एका महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्याला आळवणी करून घ्यावी.

4- जर कंदमाशी मुळे कंदांची कुज होत असेल तर मुख्य कीटकनाशका सोबत एक बुरशीनाशक तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी.

5- त्यासोबतच प्रति एकर दोन ते तीन पसरट तोंडाचे भांडी घ्यावी तो यामध्ये एरंडीचे 200 ग्राम भरडलेले बी घेऊन त्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी ओतावे. आठ ते दहा दिवसांनंतर या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व  त्यात पडून मरतात.

नक्की वाचा:Crop Tips: शेतकरी बंधूंनो! ज्वारीचे 'हे'वाण देईल पशुसाठी पौष्टिक हिरवा आणि वाळलेला चारा, वाचा डिटेल्स

English Summary: so many disease and insect influance on turmuric crop in some part in maharashtra Published on: 04 October 2022, 09:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters