1. कृषीपीडिया

हळद आणि आले पिकांचा हा कृषी सल्ला लक्षात ठेवा, फायदा होईल

हळद पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर ३ ते ४ आठवडे (लागवड ते उगवण)

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हळद आणि आले पिकांचा हा कृषी सल्ला लक्षात ठेवा, फायदा होईल

हळद आणि आले पिकांचा हा कृषी सल्ला लक्षात ठेवा, फायदा होईल

हळद पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर ३ ते ४ आठवडे (लागवड ते उगवण) या अवस्थेमध्ये दोन समान हप्त्यांमध्ये ३ किलो नत्र, ३ किलो स्फुरद व १.५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी ४.९ किलो १२:६१:००, ५.२ किलो युरीया व ३ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.लागवडीनंतर ५ ते १४ आठवडे (शाखीय वाढ) या अवस्थेमध्ये दहा समान हप्त्यांमध्ये ३ किलो नत्र, ०.९ किलो स्फुरद

०.६ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी १.५ किलो १२:६१:००, ६ किलो युरीया व १.२ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.आले - आले पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर ३ ते ४ आठवडे (लागवड ते उगवण) या अवस्थेमध्ये दोन समान हप्त्यांमध्ये १.८ किलो नत्र, २.२५ किलो स्फुरद व १.१३ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खातांद्वारे देण्यासाठी ३.७ किलो १२:६१:००, २.९ किलो युरीया व २.३ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.

हळद पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर ३ ते ४ आठवडे (लागवड ते उगवण) या अवस्थेमध्ये दोन समान हप्त्यांमध्ये ३ किलो नत्र, ३ किलो स्फुरद व १.५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी ४.९ किलो १२:६१:००, ५.२ किलो युरीया व ३ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.लागवडीनंतर ५ ते १४ आठवडे (शाखीय वाढ) या अवस्थेमध्ये दहा समान हप्त्यांमध्ये ३ किलो नत्र, ०.९ किलो स्फुरद व ०.६ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. 

या अवस्थेमध्ये दोन समान हप्त्यांमध्ये १.८ किलो नत्र, २.२५ किलो स्फुरद व १.१३ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खातांद्वारे देण्यासाठी ३.७ किलो १२:६१:००, २.९ किलो युरीया व २.३ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.लागवडीनंतर ५ ते १४ आठवडे (शाखीय वाढ) या अवस्थेमध्ये दहा समान हप्त्यांमध्ये १.८ किलो नत्र, ०.६८ किलो स्फुरद व ०.४५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी १.१ किलो १२:६१:००, ३.६ किलो युरीया व ०.९ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.

English Summary: Remember this agricultural advice of turmeric and ginger crops, will benefit Published on: 23 June 2022, 08:57 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters