1. कृषीपीडिया

लाल रंगाची भेंडी ठरतेय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर,या आजारांवर सुद्धा लाभदायक

आजच्या युगात शेतकरी वर्ग पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपल्याला चित्र दिसत आहे. जे की आधुनिक शेतीमधून शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त उत्पादन भेटते त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतो.

किरण भेकणे
किरण भेकणे
lady finger

lady finger

आजच्या युगात शेतकरी वर्ग पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपल्याला चित्र दिसत आहे. जे की आधुनिक शेतीमधून शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त उत्पादन भेटते त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतो.

कमी खर्चात मोठा फायदा :

भोपाळ मधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये लाल भेंडी लावण्याचा प्रयोग केला होता जो प्रयोग यशस्वी झाल्याने तेथील परिसरात या शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. ही भेंडी खूप अनोखी तसेच स्वादिष्ट असल्याने तेथील परिसरात जास्तीत जास्त ग्राहकांच्या मनात या भेंडीचे एक वेगळेच स्थान राहिले आहे.मागील काही दिवसात मिश्रिलाल राजपूत हे शेतकरी बनारस येथील भारतीय भाजीपाला संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी राजपूत यांनी तिथे लाल भेंडी ची माहिती मिळवली होती. ज्यावेळी तिथून त्यांनी पूर्ण माहिती घेतली त्यानंतर त्यांनी तेथून १ किलो लाल भेंडीचे बियाणे आणले त्यासाठी त्यांना २४०० रुपये खर्च करावा लागला होता.

हेही वाचा:दोन कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा हप्ता थांबला, जाणून घेऊ त्यामागची कारणे

शेतकऱ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय:

राजपूत या शेतकऱ्याने यावर्षी च्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या शेतीमध्ये लाल भेंडीचे बियाणे लावले होते जे की अत्ता त्याचे पीक येऊ लागले आहे. ज्यावेळी याची कापणी झाली त्यानंतर तेथील आसपासच्या परिसरात या शेतकऱ्याचे कौतूक च सुरू झाले जसे की तेथील लोकांनी पहिल्यांदाच  लाल भेंडी चे  पीक पाहिले  होते. ज्यावेळी मिश्रिलाल राजपूत या शेतकऱ्याची TV9 या न्यूज चॅनल ने मुलाखत घेतली त्यावेळी त्या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले की हे लाल भेंडीचे जे मी पीक घेतले आहे ते पीक सामान्य बाजारात विकले जाणार नाही कारण याला बाजारात मागणी नाही.मात्र हे पीक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप पोषक आहे त्यामुळे मॉल मध्ये जर हे पीक विकायला ठेवले तर अगदी सहजपणे विकले जाऊ शकते. या पिकाची किमंत राजपूत यांनी अजून ठरविले नाही मात्र बाजारात याची किमंत प्रति किलो ३५० ते ४०० रुपये असणार आहे.

लाल भेंडीबद्दल जाणून घ्या:

लाल भेंडी या पिकाचे एक विशेष म्हणजे याचा रंग लाल असतो आणि यामुळे या पिकावर डास, सुरवंट तसेच इतर प्रकारचे कीटक नसतात. मात्र ज्या हिरवे भाज्यापाला असतात त्यामध्ये क्लोरोफिल असते आणि ते कीटकांना आवडते. ही लाल रंगाची भेंडी आहे आणि हा लाल रंग असल्याने कीटकांना ही भेंडी आवडत नाही.दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या लाल रंगाच्या भेंडीमध्ये अँथोसायनिन या नावाचा एक घटक असतो, जे की या घटकामुळे गर्भवती महिलांना तसेच मुलांचा जो मानसिक विकास असतो त्यास फायदा होतो तसेच आपली जी त्वचा असते त्यास सुद्धा हे खूप लाभदायक असते. ज्या व्यक्तींना हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाची समस्या आहे त्या व्यक्तींनी नक्की लाल भेंडी आपल्या आहारात ठेवावी.एका बाजूला जर सामान्य हिरवी भेंडी घेतली तर त्याच्या तुलनेत लाल रंगाच्या भेंडीचे पीक फक्त ४० ते ४५ दिवसात तयार होते. तसेच एक एकर मध्ये जर याची लागवड केली तर यामधून लाल भेंडीचे उत्पादन ४० ते ५० क्विंटल येते आणि जर हवामान चांगल्या प्रकारे लाभले तर जवळपास ८० क्विंटल उत्पादन कुठेच गेले नाही.

English Summary: Red lady finger is beneficial for farmers, it is also beneficial for these diseases Published on: 05 September 2021, 07:54 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters