1. कृषीपीडिया

Sprey On Crop:असेल पाण्याचा दर्जा चांगला तर येईल फवारणीचा रिझल्ट चांगला, वाचा सविस्तर माहिती

शेतकरी पिकांवर विविध रोगांचा आणि किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करतात. परंतु फवारणी करताना किटकनाशकांचा अपेक्षित परिणाम येण्यासाठी बऱ्याच गोष्टी सुसंगत असावे लागतात. आपल्याला माहित आहेच कि कीटकनाशकांची फवारणी करताना आपण पाण्याचा वापर करतो

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
quality of water is so important in pesticides sprey on crop

quality of water is so important in pesticides sprey on crop

शेतकरी पिकांवर विविध रोगांचा आणि किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करतात. परंतु फवारणी करताना किटकनाशकांचा अपेक्षित परिणाम येण्यासाठी बऱ्याच गोष्टी  सुसंगत असावे लागतात. आपल्याला माहित आहेच कि कीटकनाशकांची फवारणी करताना आपण पाण्याचा वापर करतो

परंतु बऱ्याचदा आपण पाण्याचा दर्जा कडे अक्षम्य दुर्लक्ष करतो. त्यामुळे पिकांवर करण्यात आलेली फवारणीचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

त्यामुळे पिकांवर जर किटकनाशकांचा अपेक्षित परिणाम हवा असेल तर पाण्याचा दर्जा याकडे लक्ष देणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. पाण्याचा दर्जा आणि कीटकनाशकांची फवारणी यांचा परस्पर संबंध पाहू.

 फवारणी आणि पाण्याचा दर्जा

 आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पाण्याचा दर्जा म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये दोन गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते.

पहिला म्हणजे आपण फवारण्यासाठी वापरत असलेले पाणी किती स्वच्छ आहे आणि दुसरे म्हणजे त्या पानांची रासायनिक परिस्थिती कशा प्रकारचे आहे हे बघणे महत्त्वाचे आहे. जर आपल्याला फवारणीचा अपेक्षित परिणाम हवा असेल तर या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.

नक्की वाचा:केळीच्या बेवड मधील ऊसामध्ये पोक्का बाईंगची समस्या आणि उपाय

1- पाण्याची दुष्फेनता- दुष्फेन पाणी म्हणजे जर पाण्यामध्ये  आपण साबणाचा फेस केला तर तो सहजपणे होत नाही. त्याला आपण दुष्फेन पाणी म्हणू शकतो. यामध्ये धनभारित खनिजांचे प्रमाण हे गरजेपेक्षा जास्त असते.

याबाबतीत जर आपण कीटकनाशकांचा विचार केला तर उदाहरणाद्वारे आपण याला  समजू शकतो. जसे की लोह, कॅल्शियम, सोडियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे जास्त असली तर तननाशकातील ( ग्लायफोसेट,2-4D)

रेणूंना जोडली जातात व तणनाशकांचा तनावर होणारा प्रभाव तो अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाही. पाण्याची दुष्फेनता 350ppm पेक्षा कमी असेल तर तणनाशकांची चांगले परिणाम दिसून येतात.

2- पाण्याचा टीडीएस- पाण्याचा टीडीएस हा जास्त असणे म्हणजे पाण्यामध्ये सर्वच प्रकारचे क्षार यांचे प्रमाण हे गरजेपेक्षा जास्त असणे होय.

नक्की वाचा:दर 3 वर्षांनी सोयाबीनवर प्रादुर्भाव होणाऱ्या 'शंख गोगलगाई'चा प्रादुर्भाव का होतो? त्यामुळे काय नुकसान होते? वाचा सविस्तर

3- सोडियम तथा कॅल्शियम बायकार्बोनेट- पाण्यामध्ये सोडियम तसेच कॅल्शियम बायकार्बोनेट चे प्रमाण जास्त असेल तरीदेखील तणनाशकांचा अपेक्षित परिणाम दिसत नाही उलटा या मुळे काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो.

4- पाण्याचा सामू अर्थात पीएच- जर आपण पाण्याचा सामू अर्थात पीएच बद्दल विचार केला तर तो साडेचार ते सातचा असणे योग्य समजले जाते.

यामध्ये काही कीटकनाशके अर्थात पेस्टिसाइड्स  साडे चार पेक्षा कमी पिएचला पाण्यात चांगले विरघळतात तर काही सात पेक्षा जास्त पिएचला अधिक कार्यक्षम आणि प्रभावी ठरतात. तर काही कीटकनाशके जास्त पीएच असेल तर एवढे प्रभावी ठरत नाहीत.

5- पाण्याची स्वच्छता-पाण्याचे स्वच्छतेवर देखील पेस्टिसाइडचा  प्रभाव अवलंबून असतो. त्यामुळे फवारणी करण्यासाठी पाणी घेताना ते आपण कुठून घेतो हे देखील बघणे तितकेच गरजेचे आहे. स्वच्छ पाणी घेणे खूप महत्त्वाचे आहे. शक्य असेल तर पाण्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे उत्तम असते.

नक्की वाचा:शेती तंत्र:'प्रिसिजन फार्मिंग' संकल्पना उपयुक्त आहे पिकांचे उत्पादन उत्पादकता वाढविण्यासाठी, वाचा सविस्तर माहिती

English Summary: quality of water is so important in pesticides sprey on crop Published on: 18 July 2022, 11:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters