1. कृषीपीडिया

Fertilizer: शेतकरी बंधूंनो! पीएसबी जिवाणू खताचा 'या' पद्धतीने करा वापर आणि वाढवा पिकाचे उत्पादन

रासायनिक खतांमध्ये खूप वेगळ्या प्रकारची खते असून शेतकरी पिकांच्या वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर करत असतात. खतांमध्ये काही रासायनिक खते तर काही जिवाणू व सेंद्रिय खतांचा वापर शेतकरी करतात. परंतु यामध्ये जिवाणू खते देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपण पीएसबी या जिवाणू खताविषयी माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
psb fertilizer

psb fertilizer

 रासायनिक खतांमध्ये खूप वेगळ्या प्रकारची खते असून शेतकरी पिकांच्या वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर करत असतात. खतांमध्ये काही रासायनिक खते तर काही जिवाणू व सेंद्रिय खतांचा वापर शेतकरी करतात. परंतु यामध्ये जिवाणू खते देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपण पीएसबी या जिवाणू खताविषयी माहिती घेणार आहोत.

पीएसबी जिवाणू खत म्हणजे काय?

 प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरीत्या स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूंची वाढ करून त्यांना योग्य माध्यमात मिसळून तयार केल्या जाणाऱ्या खताला पीएसबी म्हणजे स्फुरद विरघळणारे जिवाणू खत असे म्हणतात. आता या खताचा उपयोग माहीत करून घ्यायच्या अगोदर त्याच्याशी संबंधित असलेली महत्त्वाची माहिती समजून घेणे गरजेचे आहे.

स्फुरद म्हणजे फास्फोरस हे प्राथमिक अन्नद्रव्य पिकांना खूप गरजेचे आहे. याचा आपण विविध खतांच्या माध्यमातून  पुरवठा करत असतो. परंतु डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा इतर कोणत्याही मिश्रखतामध्ये दिलेले फॉस्फरस पूर्णपणे पिकांना लागू होत नाही.

कारण त्याचे बऱ्याच प्रमाणात फिक्सेशन म्हणजेच स्थिरीकरण होते. परंतु यामध्ये जर आपण पीएसबी हे जिवाणू खत वापरले तर खतातील मित्र सूक्ष्मजीव जमिनीतील स्थिरीकरण झालेला स्फुरद बऱ्याच प्रमाणात विरघडवून पिकाला मिळवून देण्याचे काम करतो.

नक्की वाचा:Gypsum Benifit: पिकांची वाढ आणि चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी 'हा' घटक आहे महत्त्वपूर्ण,वाचा तपशील

कोणत्या पिकांसाठी पीएसबी वापरता येते?

याचा वापर तुम्ही सोयाबीन,तुर,कपाशी, उडीद, मुग, ज्वारी, हरभरा, गहू, मका तसेच हळद व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विविध भाजीपाला पिके व फळ पिकांमध्ये देखील शिफारसीनुसार वापर केला जाऊ शकतो.

 पीएसबीचा वापर करण्याची पद्धत

 याचा वापर शेतकरी बंधू बियाण्याची  बीजप्रक्रियाच्या माध्यमातून,शेणखतामध्ये एकत्र मिसळून जमिनीत किंवा योग्य प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध असणाऱ्या जमिनीत द्रवरूप पीएसबी या जिवाणू खताचा वापर फळ,भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तसेच रोपांच्या मुळावर आंतररक्षीकरण पद्धतीने गरजेनुसार शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाऊ शकतो.

वर ज्या आपण काही  पिकांचा उल्लेख केलेला आहे त्या पिकांमध्ये अडीचशे ग्रॅम पीएसबी प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे उत्तम ठरते. जर तुम्हाला द्रव्य स्वरूपात उपलब्ध असेल तर 250 मिली पीएसबी प्रति 30 किलो सोयाबीन म्हणजेच 8 ते 10 मिली द्रवरूप पीएसबी प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

नक्की वाचा:भारीच की! आता शेतकरी घरबसल्या विकू शकणार आपला शेतीमाल; अशी आहे प्रक्रिया

 सोयाबीनसाठी पीएसबी जिवाणू खताची बीजप्रक्रिया कशी करावी?

 सोयाबीनला पीएसबी बीजप्रक्रिया करायचे असेल तर आगोदर 30 किलो सोयाबीन पातळ ताडपत्रीवर पसरवून त्यावर 200 मिली पीएसबी या द्रवरूप जिवाणू खताचा हलकासा शिडकावा द्यावा.

गरज वाटली तर थोड्याशा गुळाच्या पाण्याचा शिडकावा द्यावा. परंतु सोयाबीन बियाणे जास्त ओले करू नये. तसेच हाताने हे बियाण्याला चोळू नये. सावली 15 ते 20 मिनिटे वाळवावे नंतर पेरून घालावे. फार अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे तसेच ठेवू नये. बीज प्रक्रिया केल्याबरोबर शक्य तितक्या लवकर पेरणी करावी.

 पीएसबी जिवाणू खताचा वापर करताना ही काळजी घ्या

1- पीएसबी किंवा इतर कोणतेही जिवाणू संवर्धक आणल्यानंतर त्याचा वापर जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करावा. त्याची साठवण थंड किंवा कोरड्या जागी करावी.

2- समजा तुम्हाला पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करायची असेल व रासायनिक बुरशीनाशकाची सुद्धा बीजप्रक्रिया करायचे असेल तर आगोदर रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया प्रथम करावी

व नंतर पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली असेल तर पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रियाचे प्रमाण शिफारशीपेक्षा दीडपट ठेवावे.

3- कोणत्याही रासायनिक खतासोबत पीएसबी एकत्र करू नये.

निळे-हिरवे शेवाळ खत तयार करण्याची कृती आणि पद्धत जाणून घ्या फायदा होईल

English Summary: psb bacteriel fertilizer is so important for crop growth and more production Published on: 29 August 2022, 05:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters