1. कृषीपीडिया

'पोटॅशियम शोनाइट' आहे पीक उत्पादन वाढीतील महत्त्वाचे खत, जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि वापरायची पद्धत

शेतकरी शेतीमध्ये पिक उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करतो. रासायनिक खतांमध्ये आपण विचार केला तर नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य खूप महत्त्वाचे आहेत. परंतु यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये तितकेच महत्त्वाचे असतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pottasium shonite

pottasium shonite

शेतकरी शेतीमध्ये पिक उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करतो. रासायनिक खतांमध्ये आपण विचार केला तर नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य खूप महत्त्वाचे आहेत. परंतु यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये तितकेच महत्त्वाचे असतात.

मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या संतुलित प्रमाण म्हणजे माती परीक्षण जर केलेले असेल तर त्या अहवालानुसार प्रमाण ठेवले तर नक्कीच उत्पादन वाढीस मदत होते.

यामध्ये जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विचार केला तरी यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक इत्यादी महत्त्वाची अन्नद्रव्य सांगता येतील.

परंतु यापैकी पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. या लेखात आपण पोटॅशियम शोनाइट या खता बद्दल माहिती घेणार आहोत.

 काय आहे नेमके पोटॅशियम शोनाइट?

 पोटॅशियम शोनाइट हे पोटॅशियम व मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांच्या डबल सॉल्ट आहे. हे वॉटर सोलबल  म्हणजेच पाण्यात शंभर टक्के विद्राव्य असून त्याचा वापर पिकांसाठी फवारणीद्वारे तसेच ड्रीपच्या माध्यमातून देखील करता येतो.

नक्की वाचा:बातमी खतांची:पुढच्या वर्षापासून 'नॅनो डीएपी' वापरता येणार शेतकऱ्यांना,देशात तीन प्लांटमध्ये होणार उत्पादन सुरु

 पोटॅशियम शोनाइट मधील जर घटकांच्या प्रमाणाचा विचार केला तर यामध्ये 23 टक्के पोटॅश, दहा टक्के मॅग्नेशिअम व 15 टक्के गंधक ही  महत्त्वाचे अन्नद्रव्य समाविष्ट असतात.

आपल्याला माहित आहेच की, जेव्हा पिकाचा परिपक्वतेचा काळ असतो, त्यावेळी पिकाला संतुलित पणे सगळ्या अन्नद्रव्यांची गरज असते. मॅग्नेशियम व पोटॅश यांच्या देखील गरज मोठ्या प्रमाणावर लागते.

कारण हे दोन्ही घटक पिकाच्या पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचय क्रियेत भाग घेतात. भारतात यांची कमतरता भासली तर फळांची वाढ आणि दर्जा यावर अनिष्ट परिणाम संभवतो.

त्यामुळे फळे किंवा भाजीपाला पक्वतेच्या  अगोदरच्या स्थितीत जर पोटॅशियम शोनाइट ग्रुपच्या माध्यमातून किंवा फवारणीतून तसेच जमिनीतून दिले तर फळबागांमध्ये फळांची उगवन व भाजीपाला पिकांमध्ये साखर निर्मिती होण्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

तसेच यातील मॅग्नेशियम या घटकामुळे पिकाच्या पानांचा हिरवा रंग  व त्याची कार्यक्षमता टिकून राहते. पोटॅशियम शोनाइट मध्ये असलेले पोटॅशियम व मॅग्नेशिअम ही अन्नद्रव्ये पिकासाठी अन्नद्रव्यांची उपलब्धता व त्याचे मुळाकडून होणारे अन्नद्रव्यांचे शोषण वाढण्यास मदत करते.

नक्की वाचा:ऊस पिकात वाढतोय अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळीच करा नियंत्रण

 पोटॅशियम शोनाइट वापरण्याची पद्धत

1- जमिनीतून द्यायचे असल्यास- फळबागा व भाजीपाला पिकासाठी जेव्हा फळांचे सेटिंग होईल तेव्हा एकरी 25 किलो एकदा द्यावे.

2- ठिबकच्या माध्यमातून- फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतेचा कालावधी आधी तसेच जेव्हा तोडणी चालू होते त्या काळात एकरी तीन ते पाच किलो आठवड्याला चार ते पाच वेळा सोडावे.

3- फवारणीतून द्यायचे असल्यास- ड्रीपची सोय नसल्यास फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतेआधी आणि तोडणीच्या काळात द्यावे.

4- स्फुरदयुक्त खतामध्ये तसेच कॅल्शिअम व सल्फर सारख्या खतांमध्ये मिसळून फवारणीसाठी वापरू नये.

नक्की वाचा:या' उपाययोजना करा आणि 'नत्राची' उपयोगिता वाढवा, पिक उत्पादनवाढीत होईल फायदा

English Summary: pottasium shonite is so important water soluble fertilizer for crop Published on: 29 June 2022, 02:05 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters