1. कृषीपीडिया

बदलत्या हवामानामध्ये भुईमूग पिकासाठी उपयुक्त आहे प्लास्टिक आच्छादन

तेलबिया पिकांमधील प्रमुख पीक म्हणजे भुईमूग हे होय भुईमुगाची खाद्य तेलाला खूप महत्त्व आहे तसेच जनावरांसाठी सकस चारा, जमिनीची सुपीकता वाढविणे तसेच औद्योगिक उत्पादनासाठी कच्चामाल तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हे नगदी पीक आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
groundnut crop

groundnut crop

तेलबिया पिकांमधील प्रमुख पीक म्हणजे भुईमूग हे होय भुईमुगाची खाद्य तेलाला खूप महत्त्व आहे तसेच जनावरांसाठी सकस चारा, जमिनीची सुपीकता वाढविणे तसेच औद्योगिक उत्पादनासाठी कच्चामाल तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हे नगदी पीक आहे.

 भुईमूग पिकाच्या मशागतीच्या पारंपारिक पद्धती मुळे दुष्परिणाम अधिक प्रमाणात होतो. भुईमूग उत्पादनामध्ये जमीन, पाणी  हे महत्त्वाचे व पायाभूत नैसर्गिक घटक आहेत.हे पीक उष्ण कटिबंधातील असल्यामुळे याच्यावर तापमान, पर्जन्यमान व सूर्यप्रकाश यांचा पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर प्रत्यक्ष परिणाम होतो. लेखामध्ये आपण वाढत्या तापमानात भुईमुगासाठी प्लास्टिक आच्छादनाचे उपयोग या बद्दल माहिती घेऊ.

 भुईमूग पीक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत तापमानाचा होणारा परिणाम….

1 भुईमूग बियाण्याची उगवण- जमिनीतील तापमानाचा परिणाम हा बियाण्याच्या उगवण, अंकुर व रोप वाडी वर होतोजमिनीतील तापमान 15 अंश सेंटिग्रेड व वातावरणातील तापमान 18 अंश सेंटिग्रेड पेक्षा अधिक अनुकूल असते. यापेक्षा कमी तापमान असेल तर उगवण उशिरा व कमी होते.जर तापमान 54% एकापेक्षा अधिक असेल तरबियाण्याची उगवण होत नाही

 रोपांची वाढ- वातावरणातील 20 ते 30 अंश सेंटिग्रेड तापमानामध्ये रोपांची वाढ जलद गतीने होते.

3- फुलधारणा- वातावरणातील तापमान 24 ते 27 अंश सेंटिग्रेड असेल तर फुलधारणा अधिक होते.तसेच वातावरणातील तापमान सतत ते 30 अंश सेंटिग्रेड पेक्षा अधिक असेल तर फुलातील परागकण यांच्या सजीव क्षमतेवर परिणाम होतो.त्यामुळे फुलांमध्ये वंध्यत्व निर्माण होऊन शेंगा लागत नाही.

4-शेंगधारणा- जमिनीतील तापमान 30 ते 34 अंश सेंटिग्रेड असल्यास शेंगांची वाढ व पोषण चांगले होते. फुलधारणा ते पक्वता या कालावधीत जमिनीतील व वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास शेंगांच्या प्रमाणात  घट होते.

5-सूर्यप्रकाशाचे महत्व- या पिकासाठी भरपूर सूर्यप्रकाश मानवतो.सूर्यप्रकाशाच्या पानाच्या प्रकाशसंश्‍लेषण वरपरिणाम होतो. दिवसा सूर्यप्रकाशाचा कालावधी दहा तास असल्यास झाडाची वाढ जोमदार होते. जास्त तासाचे दिवस असल्यास  झाडांना फुलधारणा कमी होते. आकाशामध्ये स्वच्छ व निरभ्र  सूर्यप्रकाश असल्यास फुल व आऱ्यांच्यासंख्येत वाढ होते. शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते व दाणे आकर्षक व टपोरे होतात.

आच्छादनाचे फायदे

 अधिक तापमान यापासून संरक्षण व पाण्याची बचत या साठी पालापाचोळा, गव्हाचे काड, लाकडाचा भुसा,भाताचे तूस, उसाचे पाचट इत्यादी आच्छादनासाठी उपयोग करण्याच्या पारंपारिक पद्धती आहेत.  तथापि प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर सुलभरीत्या करता येतो. त्याचे फायदे अनेक आहेत.

  • शेंगा व चाऱ्याचे उत्पादन अधिक व दर्जेदार मिळते.
  • बियाण्यांची उगवण हे दोन ते तीन दिवस साधी तसेच पिकाचा पक्व काळसात ते दहा दिवस लवकर होतो.
  • आंतर मशागत करण्याची गरज पडत नाही त्यामुळे खर्चात बचत होते.
  • पाण्याचे बाष्पीभवन कमी होते त्यामुळे गादीवाफे च्या पृष्ठभागावर सतत वाफसा अवस्था म्हणजे ओलावा राहतो व पाण्याची बचत होते.
  • खुरपणी करण्याची गरज नसते त्यामुळे मजुरांसाठी लागणाऱ्या खर्चात बचत होते व तन नियंत्रणात राहते.
  • रासायनिक खतांचा वापर पूर्ण क्षमतेने होतो.
  • गादीवाफे च्या पृष्ठभागावर जमिनीमध्ये रवाळपणा वाढतो.यामुळे झाडाच्या मुळापर्यंत खोलवर हवा खेळती राहते. झाडाची वाढ जोमदार होते.
  • सशक्त आऱ्या जमिनीत घुसतात. जमीन भुसभुशीत असल्याने आऱ्या जमिनीत जलदगतीने घुसतात. शेंगांची वाढ व पोषण चांगले होते तसेच दाण्याच्या दर्जामध्ये व तेलाच्या प्रमाणात वाढ होते.
  • प्लास्टिक मुळे सूर्यप्रकाशाचे परावर्तन होते. त्यामुळे वातावरणातील किडींचा उपद्रव कमी होतो तसेच वातावरणातील किडी व विषाणूचा जमिनीत घुसण्याचा अटकाव होतो.
  • पावसाळ्यामध्ये गादीवाफ्यावरील प्लास्टिकचा छत्रीसारखा उपयोग होतो.झाडाभोवती पाणी साठा होत नाही.
  • गादीवाफे च्या पृष्ठभागावर जमीन भुसभुशीत असल्याने काढणी करणे सोपे जाते.
English Summary: plastic mulching or cover is useful for groundnut crop for more production Published on: 11 January 2022, 05:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters