1. कृषीपीडिया

निंबोळी पावडर पिकांसाठी संजीवनी, जाणून घ्या फायदे

सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक अशा सर्व शेती प्रकारामध्ये वापरण्यात येणाऱ्या निंबोळी पावडर चे कार्य व अनेक फायदे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
निंबोळी पावडर पिकांसाठी संजीवनी ! जाणून घ्या फायदे

निंबोळी पावडर पिकांसाठी संजीवनी ! जाणून घ्या फायदे

सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक अशा सर्व शेती प्रकारामध्ये वापरण्यात येणाऱ्या निंबोळी पावडर चे कार्य व अनेक फायदे असून ते वापरण्यास सुरक्षित आहे .सध्या रासायनिक निविष्ठांना सुयोग्य पर्याय म्हणून निंबोळी पावडर चा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करत आहेत . पाहुयात निंबोळी पावडर चे कार्य व फायदे .

निंबोळी पावडरचे फायदे

अॅझाडीरेक्टीन’ घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.

निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.

निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते.

निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.

निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.

निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.

निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.

निंबोळी पावडर कसे वापराल

सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी 200 किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे.

फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास 500 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे.

सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक अशा सर्व शेती प्रकारामध्ये वापरण्यात येणाऱ्या निंबोळी पावडर चे कार्य व अनेक फायदे असून ते वापरण्यास सुरक्षित आहे .सध्या रासायनिक निविष्ठांना सुयोग्य पर्याय म्हणून निंबोळी पावडर चा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करत आहेत . पाहुयात निंबोळी पावडर चे कार्य व फायदे .

English Summary: Nimboli powder best for crops know about benifits Published on: 13 February 2022, 10:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters