1. कृषीपीडिया

Technology: 'मेटिंग डिस्टर्बन्स तंत्राने' होईल गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण,जाणून घेऊ हे तंत्रज्ञान

महाराष्ट्र मध्ये कापसाची लागवड फार मोठ्या प्रमाणात बऱ्याच भागांमध्ये केली जाते. विदर्भ तसेच खानदेशच्या बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंडअळीचे संकट कापूस पिकावर मोठ्या प्रमाणावर आले असून कापूस उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट यामुळे येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pink bollworm

pink bollworm

 महाराष्ट्र मध्ये कापसाची लागवड फार मोठ्या प्रमाणात बऱ्याच भागांमध्ये केली जाते. विदर्भ तसेच खानदेशच्या बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून  गुलाबी बोंडअळीचे संकट कापूस पिकावर मोठ्या प्रमाणावर आले असून कापूस उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट यामुळे येते.

बऱ्याच प्रकारच्या उपाययोजना करून देखील अपेक्षित प्रमाणात या किडीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित रहावा यासाठी मेटिंग डिस्टर्बन्स तंत्रज्ञानाचा अवलंब प्रायोगिक तत्वावर देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्य असलेल्या 23 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यासाठी हैदराबाद येथील एका खासगी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.

नक्की वाचा:कापुस पीकासाठी विद्राव्य खते ड्रीपद्वारे वापरन्याचे वेळापत्रक

काय असेल नेमके हे तंत्र?

 या तंत्रज्ञानामध्ये केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समिती मान्यताप्राप्त आणि हैदराबाद येथील संबंधित खासगी कंपनी यांनी विकसित केलेले गंध रसायन यामध्ये वापरले जाणार असून हे ल्युर वॅक्स स्वरूपात असणार आहे. हे रसायन झाडाच्या विशिष्ट भागांमध्ये लावल्यानंतर गुलाबी बोंड अळीच्या मादी पतंगाच्या गंधाने अर्थात वासाने नर ज्या ठिकाणी हे गंध रसायन लावले आहे त्या भागाकडे आकर्षित होतील.

परंतु त्या ठिकाणी हे नर आल्यानंतर त्या ठिकाणी  वारंवार जाऊन देखील मिलनासाठी मादी पतंग न मिळाल्यामुळे ते परत जातील. नेमके यामुळे त्यांची मिलन प्रक्रिया आणि अंडी घालण्याची क्रिया यामध्ये व्यत्यय निर्माण होईल.

नक्की वाचा:'गुलाबी बोंड अळी' नियंत्रणा करिता तिची ओळखच महत्त्वाची'

त्यामुळे या तंत्राने बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण शक्‍य होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील प्रमुख कापूस उत्पादन करणाऱ्या राज्यातील 23 जिल्ह्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर या वर्षी राबवला जात आहे.

यासाठी प्रति 5 मीटर अंतरावर एका एकरात 400 पॉईंट्स ल्युरचे राहतील. याचा जेव्हा वापर करणे सुरू होईल तेव्हा लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनंतर पहिले,

त्यानंतर प्रत्येकी 30 ते 35 दिवसांनी दुसरा व तिसरा वापर व त्यानंतर 30 ते 35 दिवसांनी गरजेनुसार चौथा वापर अशी शिफारस आहे. महाराष्ट्र मध्ये बीड, औरंगाबाद आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी खूषखबर,आता शेतकऱ्यांना किटकनाशके फवारणी करण्याची गरज नाही

English Summary: meting disturbunce technology useful in control of pink bollwarm Published on: 07 July 2022, 12:22 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters