1. कृषीपीडिया

जाणून घ्या हळद आणि आले पिकातील कंदमाशी आणि तिचे नियंत्रण

कंदमाशी ही माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या हळद आणि आले पिकातील कंदमाशी आणि तिचे नियंत्रण

जाणून घ्या हळद आणि आले पिकातील कंदमाशी आणि तिचे नियंत्रण

कंदमाशी ही माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात.पायाची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात.दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून,त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.अळी पिवळसर असून, तिला पाय नसतात.कंदमाशीच्या अळ्या जमिनीतील गड्ड्यात शिरून गड्डे पोखरून खातात. प्रथम अवस्थेतील लहान अळ्या विशेषतः

कोवळ्या खोडातून गड्ड्यात शिरतात. पोखरलेल्या गड्ड्यामध्ये बुरशीजन्य रोगांबरोबरच सूत्रकृमींचाही प्रादुर्भाव वाढतो.परिणामी खोड व गड्डे मऊ बनतात. गड्ड्यांना पाणी सुटून ते कुजतात. झाडांची पाने पिवळी पडतात व शेवटी पूर्ण झाड वाळून जाते.The leaves of the trees turn yellow and eventually the whole tree dies.कंदमाशीच्या अळ्यांनी संपूर्ण गड्डे पोखरून फस्त केल्यामुळे शेवटी गड्ड्यांची माती होते. हंगामात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

उपाययोजना - कंदमाशी शेतामध्ये दिसायला सुरवात झाल्यानंतर, क्विनॉलफॉस २ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पावसाची उघडीप न मिळाल्यास, फोरेट (१० सीजी) दाणेदार एकरी ८ किलो याप्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरावे.उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर आल्याची भरणी करावी.

एकरी दोन मातीची अथवा प्लॅस्टिकची पसरट भांडी घ्यावीत. त्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम अधिक १.५ लिटर पाणी मिसळून शेतात ठेवावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात. कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाश्या मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.

हळद कंदमाशी ही माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायाची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून,त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.अळी पिवळसर असून, तिला पाय नसतात. कंदमाशीच्या अळ्या जमिनीतील गड्ड्यात शिरून गड्डे पोखरून खातात. प्रथम अवस्थेतील लहान अळ्या विशेषतः

कोवळ्या खोडातून गड्ड्यात शिरतात. पोखरलेल्या गड्ड्यामध्ये बुरशीजन्य रोगांबरोबरच सूत्रकृमींचाही प्रादुर्भाव वाढतो. परिणामी खोड व गड्डे मऊ बनतात. गड्ड्यांना पाणी सुटून ते कुजतात. झाडांची पाने पिवळी पडतात व शेवटी पूर्ण झाड वाळून जाते. कंदमाशीच्या अळ्यांनी संपूर्ण गड्डे पोखरून फस्त केल्यामुळे शेवटी गड्ड्यांची माती होते. हंगामात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

उपाययोजना - कंदमाशी शेतामध्ये दिसायला सुरवात झाल्यानंतर, क्विनॉलफॉस २ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पावसाची उघडीप न मिळाल्यास, फोरेट (१० सीजी) दाणेदार एकरी ८ किलो याप्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरावे.उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.

एकरी दोन मातीची अथवा प्लॅस्टिकची पसरट भांडी घ्यावीत. त्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम अधिक १.५ लिटर पाणी मिसळून शेतात ठेवावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात. कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाश्या मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.

English Summary: Know Turmeric and Ginger crop borer and its control Published on: 12 August 2022, 06:18 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters