1. कृषीपीडिया

या पिकांसाठी नाजूक अवस्था जाणून करा असे सिंचन व्यवस्थापन

यंदा अपुऱ्या पावसामुळे पिकांसाठी पाणी उपलब्धता कमी आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
या पिकांसाठी नाजूक अवस्था जाणून करा असे सिंचन व्यवस्थापन

या पिकांसाठी नाजूक अवस्था जाणून करा असे सिंचन व्यवस्थापन

यंदा अपुऱ्या पावसामुळे पिकांसाठी पाणी उपलब्धता कमी आहे. अशावेळी रब्बी पिकांच्या संवेदनशील अवस्थेच्या वेळा जाणून सिंचनाचे नियोजन करावे. उत्पादन वाढण्यास मदत होईल.हरभरा - जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात केली असल्यास उपलब्ध ओलाव्याचा फायदा पिकास झाला असेल. मात्र, जमिनीत ओलावा कमी असल्यास देशी हरभऱ्याचे बियाणे पाण्यामध्ये 4 तास भिजवून व पेरताना रायझोफॉसची 150 मिलि प्रति 10 किलो बियाणे (नत्र

व स्फुरदकरिता) बीजप्रक्रिया करावी. - भीज पद्धतीने पाणी दिल्यास मुळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतात पाणी साचून राहणार नाही,If irrigation is given by irrigation method, water will not accumulate in the field to prevent the spread of root rot disease. याची काळजी घ्यावी.

कृषी महाविद्यालय अकोला येथे क्रांतिवीर भगतसिंग जयंती आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरी

 सूर्यफूल - सूर्यफूल पिकाच्या रोपअवस्था (15 ते 20 दिवस), फुलकळी अवस्था (45 दिवसानंतर), फुलोऱ्याची अवस्था (60 दिवसांपर्यंत) व दाणे भरण्याची अवस्था (90 दिवसांनी) या चार अवस्था महत्त्वाच्या आहेत. या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये; अन्यथा सूर्यफुलातील दाणे पोकळ राहून उत्पादनात घट येऊ शकते. 

- सूर्यफुलावर फूल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर 10 दिवसांपर्यंत बोरॅक्‍स 2 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते.- पीक फुलोऱ्यावर असताना कीटकनाशकांची फवारणी करू नये. तूर - तूर हे जास्त कालावधीचे पीक आहे. जर पिकास जास्त कालावधीचा ताण पडल्यास संरक्षित पाणी द्यावे. खरिपातील 50 दिवसांच्या ताणामुळे पीकवाढीवर विपरित परिणाम दिसून आला आहे.- इतर जमिनीच्या तुलनेत भारी जमिनीतील तुरी सध्या फुलोऱ्यावर आल्या आहेत. त्यामुळे शक्‍य

असल्यास तुरीच्या नाजूक अवस्थेत म्हणजेच फुले धरण्याच्या वेळेस व शेंगा भरण्याच्या वेळेस पिकास पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. या सिंचनामुळे उत्पन्नात 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होऊ शकते.भुईमूग - या पिकाच्या सिंचनासाठी तुषार पद्धतीचा अवलंब करावा. 30 ते 35 टक्के पाण्याची बचत साध्य होतानाच शेंगाचे पोषण चांगले होते. नियंत्रित पाणी दिल्यामुळे शेंगातील दाणे प्रवाही पद्धतीतील

शेंगापेक्षा गच्च भरतात. उत्पादनात वाढ होते.रब्बी हंगामातील हवामान या पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेत पूरक असते. उन्हाळी हंगामापेक्षा जास्त उत्पादन रब्बीतून मिळवता येते.- या पिकाच्या महत्त्वाच्या चार संवेदनशील अवस्थेत पाणी देणे आवश्‍यक आहे. 120 दिवसांचे पीक असल्यामुळे कोणत्याही अवस्थेत जमिनीतील ओलावा मर्यादेपेक्षा कमी होता कामा नये, याची काळजी घ्यावी.गहू - बागायत गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या

पंधरवड्यात झाली असेल. उशिरा पेरणी केलेल्या गव्हास थंडीचा फायदा होत नाही. दाणे भरण्याच्या अवस्थेत (जानेवारी - फेब्रुवारी) तापमान वाढल्याने गहू दाण्याचा आकार तुलनेने कमी पडतो. - साधारणपणे मध्यम जमिनीमध्ये 20 दिवसांच्या अंतराने पाच ते सहा पाणी गव्हास द्यावे लागते. या पिकाच्या महत्त्वाच्या संवेदनशील अवस्था सहा आहेत.- किमान चार-पाच पाणी देणे शक्‍य नसल्यास गहू पिकाऐवजी इतर पिकाचा विचार करणेच सद्यस्थितीत योग्य राहील.

 

अधिक माहितीकरिता संपर्क -

डॉ. गणेश गायकवाड, 02452-225843 

(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

English Summary: Irrigation management that is sensitive to these crops Published on: 29 September 2022, 01:20 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters