1. कृषीपीडिया

कापसाचे चांगले बियाणे वाणाची माहिती

कापसाचे बंपर उत्पादन घ्यायचे असेल तर कापसाची सर्वोत्तम व्हेरायटी निवड करणे खूप महत्वाचे आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कापसाचे चांगले बियाणे वाणाची माहिती

कापसाचे चांगले बियाणे वाणाची माहिती

शेतकरी दर वर्षी टॉप कापूस व्हेरायटी शोधत असतो. आज रोजी शेकडो व्हेरायटी बाजारात उपलब्ध आहे. पण शेतकरी सर्वच वान लावू शकता नाही, त्या पैकी कोणची बेस्ट कापूस व्हेरायटी आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे असते.कधी कधी एखादी नवीन व्हेरायटी बाजारात येते आणि तिची शहा निशा न करता आपण ती पेरतो पण ती बोगस निघते आणि आपला वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे या लेखात आपण फक्त कुणाकडून ऐकून वाणाची निवड न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अनुभवातून जे कापसाचे वान खरच चांगले आहे ते जाणून घेणार आहोत.काल १ जून पासून बाजारात कापसाचे बियाणे विक्री साठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कापसाचे वाण निवड करण्या आधी शेतकऱ्यांनी काही गोष्टी बघणे महत्वाचे आहे. आपल्या जमिनीचा प्रकार कोणता आहे? जमीन हलकी आहे की भारी? आपल्या कडे पाण्याची व्यवस्था आहे का? हवामान कसे आहे? लागवड दाट करायची की मोकळी? इ. गोष्टींचा विचार करूनच कापूस व्हेरायटीची निवड करावी.

आपण कापसाच्या वानाबद्दल जाणून घेताना त्याचा कालावधी किती आहे? झाडाची वैशिष्ट्ये काय आहे? एका बोंडाचे वजन किती भरते? जमिनीचा प्रकार, सिंचन व्यवस्था, लागवडीचे अंतर इ. गोष्टी जाणून घेणार आहोत…1) राशी 659कालावधी : १६०-१७० दिवस जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : बागायत उत्पादन : १०- १६ क्विंटल/ एकर लागवड अंतर : ४×२, ५×१बोंडाचे वजन : ६-७gmइतर वैशिष्ट्ये : उशिरा येणारी व्हेरायटी,रसशोषक किडींना सहनशील,मोठे बोंड, जास्त उत्पादन -शेतकऱ्यांची सर्वात जास्त पसंतीची.(2) US Agriseeds US 7067कालावधी : १५५-१६० दिवस जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : बागायत, कोरडवाहू उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर लागवड अंतर : ४×१, ५×१बोंडाचे वजन : ६-६.५ gmइतर वैशिष्ट्ये : लवकर येणारी, दाट लागवडी साठी सर्वोत्तम,रसशोषक किडींना सहनशील,मोठे बोंड, जास्त उत्पादन. 

(3) राशी मॅजिक कालावधी : १५०-१६० दिवस जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : बागायत उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर लागवड अंतर : ४×१, ५×१बोंडाचे वजन : ६-६.५ gmइतर वैशिष्ट्ये : रसशोषक किडींना सहनशील,मोठे बोंड, जास्त उत्पादन.(4) Supercott (प्रभात)कालावधी : १६०-१७० दिवस जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : बागायत, कोरडवाहू उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर लागवड अंतर : ४×२, ५×१बोंडाचे वजन : ६.५-६ gmइतर वैशिष्ट्ये : रसशोषक किडींना सहनशील,मोठे बोंड, जास्त उत्पादन,शेंड्यावर जास्त बोंड.(5) मोक्ष कालावधी : १५५-१६० दिवस जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : बागायत, कोरडवाहू उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर लागवड अंतर : ४×२, ५×१बोंडाचे वजन : ६-६.५ gmइतर वैशिष्ट्ये : रसशोषक किडींना सहनशील,मोठे बोंड, बोंडाचे जास्त वजन,वेचायला सोपी.  

(6) मनी मेकर(कावेरी)कालावधी : १५५-१६० दिवस जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : बागायत, कोरडवाहू उत्पादन : ८- १६ क्विंटल/ एकर लागवड अंतर : ४×२, ५×१बोंडाचे वजन : ६-६.५ gmइतर वैशिष्ट्ये : रसशोषक किडींना सहनशील,मोठे बोंड, जास्त उत्पादन.(7) धनदेव( मायको )कालावधी : १६०-१७०जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : बागायत, कोरडवाहू उत्पादन : ८-१४ क्विंटल/एकर लागवड अंतर : ४×२, ५×२बोंडाचे वजन : ६ gmइतर वैशिष्ट्ये : जास्त फांद्या, डेरेदार झाड, मोठे बोंड, लांब रेषा.(8) अजित १९९कालावधी : १४५-१६० दिवस जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : बागायत उत्पादन : ८-१६ क्विंटल/एकर लागवड अंतर : ४×१.५, ५×१.५बोंडाचे वजन : ६-६.५ gmइतर वैशिष्ट्ये : रोग, रस शोषक किडींना सहनशील, पाने लाल होत नाही,वेचायला चिकट.   

(9) Volvo plus( Alp giri)कालावधी : १५०-१६० दिवसजमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : कोरडवाहू, बागायत उत्पादन : ८-१४ क्विंटल/एकर लागवड अंतर : ४×१.५, ५×२बोंडाचे वजन : ६.५-७ gmइतर वैशिष्ट्ये : हे वाण किडींना मध्यम मध्यम स्वरूपाचे सहनशील, हे वाण फरदड घेण्यासाठी उत्तम आहे.(10) पंगा( तुलसी सीड्स )कालावधी : १५५-१६० दिवस जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी सिंचन : कोरडवाहू, बागायत उत्पादन : ८-१४ क्विंटल/एकर लागवड अंतर : ४×२, ५×२बोंडाचे वजन : ६ gmइतर वैशिष्ट्ये : हे वाण दाट लागवडीसाठीउत्तम आहे, बोंडांचा आकार मोठा, वेचणीला सोपा, भरगोस उत्पादन शेतकरी बांधवांनो वरील टॉप १० वानांपैकी आपण आपल्या जमिनीला योग्य ती व आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचन सोयी नुसार वाणाची निवड करावी. तसे सर्वच कापसाचे वाण चांगले आहे. कापसाची चांगली काळजी घेऊन योग्य त्या खतांचा वापर करून नक्कीच शेतकरी राजा विक्रमी कापसाचे उत्पादन मिळवू शकतो.

English Summary: Information on good seed varieties of cotton Published on: 03 June 2022, 01:17 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters