1. कृषीपीडिया

मधमाशी वैशिष्ट्ये आणि शेती भवितव्य

फुलांना होनारा मधमाशी चा स्पर्श म्हणजेच लोखंडाला परिसाचा स्पर्श होण्यासारखाच असतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
मधमाशी वैशिष्ट्ये आणि शेती भवितव्य

मधमाशी वैशिष्ट्ये आणि शेती भवितव्य

फुलांना होनारा मधमाशी चा स्पर्श म्हणजेच लोखंडाला परिसाचा स्पर्श होण्यासारखाच असतो. फुलांना मधमाशी चा स्पर्श हा परिसस्पर्शा ईतकाच सामर्थशाली असतो.यासाठी शेतातून सतत सोने पिकवायचे असेल तर मधमाशांची काळजी घेणे गरजेचे आहे.

     आपण सर्वच शेतकरी स्वता शेतीचे सर्वच कामे करत असतो. शेतीमंध्ये मेहनत करुन सोन्यासारखे पिके तयार करून त्यामधुन ऊत्पादने घेत असतो मात्र आपल्याला ऊत्पादने घेण्यासाठी व शेती करण्यासाठी मुंग्या, मधमाशा, मित्र किटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीवजंतू मदत करत असतात. परंतु ह्या सर्वांमध्ये मधमाशा आघाडीवर असतात.

 मधमाशी नष्ठ झाली तर ०४ ते १० वर्षांपासून पुढे मानव जात ही नष्ठ होण्यास सुरुवात होईल.कारण मधमाशा विविध प्रकारच्या वनस्पतींचे परागीभवन (pollination) करीत असतात. अनेक फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला पिके व धाण्यपिके यांचे परागीभवन फक्त मधमाशी च करु शकते. विशेष म्हणजे जे अण्ण् परागीभवन होऊन येत नाही ते अण्ण् खाण्यासाठीही पौष्टीक नसते. 

      आपण अलिकडे अणेक डाळिंब बागायतदार मधमाशांच्या पेट्या बागेत ठेवतात असे बघतो. कारण की सफरचंद, डाळिंब व ईतर निंबुवर्गिय तत्सम पिके यांचे परागीभवन फक्त आणि फक्त मधमाशी च करु शकते. डाळिंबातील नर फुले व मादी फुले वेगवेगळी असतात. मधमाशी नर फुलातील पराग उचलुन मादी फुलावर सोडतात . यामुळे डाळिंबातील मादी फुले फलीत होऊन फळात रूपांतर होते.जितक्या वेळेस मधमाशी नर फुलातील पराग मादी फुलावर आणुण सोडेल तीतक्या प्रमाणात डाळिंबाचे फळे आकाराने मोठी होतात. 

हे आज आपल्याला समजले आहे मात्र मधमाशांना काय आवडते हे आपल्याला अजुनही माहीत नाही किंवा आपण समजाऊन घेण्याचा प्रयत्न करत नाही. मधमाशांना पोळे तयार करायला कुठले झाडे आवडतात. जसे - बोर , बाभुळ . मधमाशांना मकरंद गोळा करण्यासाठी काय आवडते. जसे - सुर्यरफुल.

       सेंद्रीय शेतीचा व जैवीक शेतीचा गाभा म्हणजेच मधमाशी होय. मधमाशांनी जास्त वेळा फुलांना स्पर्श केला तर अशा फुलापासून तयार होणाऱ्या फळावर रोग आणि किडी यांचा प्रादूर्भाव ही कमीच असतो. मधमाशांनी अनेक वेळा स्पर्श केलेल्या फुलापासून तयार होणाऱ्या फळांची आंतरीक संरचना सद्रूढ असते. आणि कोणत्याहि सद्रुढ वनस्पतीवर रोगाचा प्रादूर्भाव कमीच असतो. मधमाशीचा फुलांना झालेल्या स्पर्शावरच फळांचा आकार, रंग , स्वाद आणि दर्जा अवलंबून असतो. स्वपरागीभवना पेक्षा मधमाशा द्वारे परागीभवनातून (pollination) निर्मान होणारे फळे , वनस्पती जोमाने, भरदार, ऊंच व सद्रुढ वाढलेली असतात. यावरुन मधमाशांचा फुलांना केलेला स्पर्श किती महत्वाचा आहे हे लक्षात येते. मधमाशांनी जितक्या जास्त वेळा फुलांना स्पर्श केला तर तीतक्या प्रमाणात डाळिंबाच्या फळांच्या आकारात वाढ होऊन ऊत्पादनात वाढ मिळते. म्हणुनच मधमाशी शिवाय ऊत्पादनात वाढ होऊच शकणार नाही हे प्रथमता स्विकारने गरजेचे आहेठेवतात मानवजातीला निसर्गाने निसर्गातील जैवीक विविधता आबाधीत राहावी म्हणून मधमाशी च्या रूपाने जैवीक- परिस बहाल केला आहे. मात्र हा जैवीक परिस ऊपलब्ध असुनही तो वापरण्याचे ज्ञान व कौशल्य मानवजातीने आत्मसात न केल्यामुळे पीक ऊत्पादन वाढीचे सर्व प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहे.

   निंबुवर्गिय झाडांच्या फुलांचे फळात रूपांतर करण्यात मधमाशा आघाडीवर असतात. सफरचंद , डाळिंब व तत्सम निंबुवर्गिय फळे जोपर्यंत पृथ्वीवर मधमाशा आहे तोपर्यंतच आपण बघु शकतो. ज्यावर्षी पृथ्वीवरून मधमाशा नष्ठ होतील त्याचवर्षी पृथ्वीवरून हे फळे देखिल कायम स्वरुपी नष्ठ होतील. हे आपण शेतकऱ्यांनी वेळीच लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे. माणसामुळे मधमाशांच्या जीवनशैलीत मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. मधमाशांनी नैसर्गीक आधीवासामंध्ये बदल केला आहे आणि तोही फक्त आणि फक्त माणसांच्या चुकामुळेच. म्हणुन ईथुन पुढे जगण्यासाठी मधमाशा वाचवणे हे मानवजाती पुढील मोठे आव्हान असनार आहे. 

    जेव्हा झाडांना फूले येतात व त्या फुलांचे फळात रूपांतर होते हा कालावधी २० ते ३० दिवसांचा असतो ह्या कालावधीमंध्ये झाडावर कुठलंही रासायनीक किटकनाशक फवारणी करु नये. रासायनीक किटकनाशकामुळे मधमाशा मरतात व काही रासायनीक किटकनाशकामुळे मधमाशींचा स्मृतीभ्रंश होतो त्यावेळी त्यांना ज्या पोळातून आल्या आहेत त्या पोळाचा रस्ता सापडत नाही. म्हणुन झाडांच्या फुल निघे पासुन ते फुलाचे फळात रूपांतर होनार्या २० ते ३० दिवसांच्या कालावधीत मधमाशांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. ह्याचबरोबर अलिकडे polly house व शेडनेट मधील शेती वाढत आहे. अशा polly house व शेडनेट मधील शेतीमंध्ये परागीभवनासाठी मधमाशा असणे ही महत्वपुर्ण गरज आहे. म्हणून शेतकरी मधमाशांचे पोळ किंवा पेटी आपल्या polly house किंवा शेडनेट मध्येदेखील ठेवतात. त्यातच किटकांच्या प्रादूर्भावा पासून बचावासाठी YELLOW STICKY PAD ही वापरतात ह्या YELLOW STICKY PAD ला अडकून मधमाशा मरतात . म्हणून मधमाशांचे पोळ किंवा पेटी ठेवलेल्या POLLY HOUSE किंवा शेडनेट मध्ये YELLOW STICKY PAD लाऊ नयेत.  

मधमाशा मधपेटी किंवा पोळा पासून २ ते ३ कि. मी. अंतरावर जाऊन मध गोळा करत असतात व एका फेरीत १० फुलापासुन ते मकरंद ऊपलब्धते नुसार १०० किंवा त्यापेक्षा जास्त फुलावर बसत असतात. मधमाशा राणी माशी, नर माशी व कामकरी माशी अशा प्रकारात असतात. व प्रत्येकाची कामे ठरलेली असतात. थंडी वाढली की मधमाशा काम करत नाही कारण की पोळामधील पिलांना थंडीपासून ईजा होऊ नये तसेच पोळामधील वातावरण स्थिर राहावे म्हणुन ऐकमेकांच्या शरीराची उब निर्मान होईल ह्यासाठी पोळावर गर्दी करुन बसतात . ह्या कालावधीमंध्ये गोळा केलेल्या मधावरच मधमाशा गुजरान करीत असतात. निसर्गतःच निसर्गातुन थंडी आणि कडक ऊन्हाळ्यात मधमाशांना अण्ण् ऊपलब्ध होऊ शकत नाही. तेव्हा पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत रसायण विरहीत गुळाचा पाक करुन मधमाशांच्या पोळापासून १० ते ५० फूट अंतरावर ठेवावा. 

     ईथे प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवने गरजेचे आहे. मधमाशा ह्या पाझरणारेच पाणी पीतात किंवा गाळातील पाणी पीतात. प्रत्यक्ष पाण्यात ऊतरून मधमाशी कधीही पाणी पीत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये कृत्रीम पाणवठे निर्मान करायला शिकले पाहीजे.

    फळपिकांचे अर्थकारण मधमाशी भोवतीच फिरते म्हणुन मधमाशांची काळजी घेणे गरजेचे आहे.

English Summary: Honeybees specifications and future related to agriculture Published on: 17 February 2022, 10:59 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters